savitalote2021@bolgger.com

गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

baba... ❤❤



1

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार एक क्रांती... 


           डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्व अनेक पैलूने व्यापलेले आहे. विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. डॉ. आंबेडकर  यांनी सामाजिक राजकीय व आर्थिक न्याय धर्म इतिहास शिक्षण कला साहित्य क्रीडा विविध विषयांवर आपले विचार मांडले आहे.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर विचारवंत होते दलित शोषित पीडितांचे कैवारी होते बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व महान होते.... ते समाज सुधारक होते.... थोर शिक्षक तज्ञ होते.... भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. बाबासाहेब यांना ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही पुरुषांसाठीच नाही तर स्त्रियांनाही तितकेच महत्वाचे आहे. असे त्यांना वाटत होते.


       बाबासाहेब लोकशिक्षक होते. या नात्याने त्यांनी अनेक शैक्षणिक कार्य करून आपले शिक्षण विषयक विचार मांडणे त्यांचे विचार हे समता बंधुता स्वातंत्र्य न्याय या न्याय तत्वावर  आधारित होते. भारतीय इतिहासात सर्व समाज सुधारकांनी शिक्षणाला समाज सुधारण्याचे मूळ मानले आहे.

      शिक्षण मन परिवर्तना सोबतच समाज परिवर्तन सुद्धा घडवून आणत असे सर्व समाजसुधारकांना वाटत होते. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ,"शिका" हा मोलाचा संदेश समाज बांधवांना दिला. कारण संघटित होऊन संघटन शक्ती मजबूत करून संघर्षाकडे जाण्यासाठी लोकांना बाबासाहेबांनी  शिक्षण हा एकमेव मार्ग आहे असे वाटत होते.

      आज ते विचार सामाजिक क्रांती बरोबरच शैक्षणिक क्रांती ही तितकीच महत्त्वाची प्रगतीसाठी आहे हे तंतोतंत आज समाजामध्ये दिसून येत आहे .

                भारतीय समाज व्यवस्था चातुर्य वर्णव्यवस्थेच्या इतक आहारी गेला होता की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला गेला होता. बाबासाहेब म्हणतात आपल्यातील माणूस जागा होणार नाही तोपर्यंत आपण संघर्ष करू शकत नाही आणि संघर्ष करण्यासाठी माणूस म्हणून जगण्यासाठी एकच मार्ग तो म्हणजे ",शिक्षण."

   डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या शैक्षणिक विचार यासंबंधी मार्गदर्शन करतांना सांगितले की, " विजेचा गोळा (बल्ब) कळ दाबताच जसा अंधार नष्ट करून स्वतःचे प्रकाशमान साम्राज्य निर्माण करतो त्याप्रमाणे शिक्षण होय."

         भारतातील प्रत्येक समाजात शिकलेल्या लोकांनी शिक्षणाचा अवलंब करून पारंपारिक रहाटगाडयात(रूढी प्रथा परंपरा ज्या विकास मार्गामध्ये अडथळे म्हणून काम करतात) हातपाय बांधून ठेवलेल्या भारतीय संस्कृतीचे खरी मुक्तता होणार आहे. असे झाले तरच भारताला उत्कर्षप्राप्तीसाठी वाटचाल करता येईल.

              डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात," तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचं ते शिकवेल."  मानवी प्रवृत्ती हे बदलत चाललेला परिस्थितीनुसार बदलत असते तरी पण शिक्षण त्या बदलत्या परिस्थितीतही खूप मोठे योगदान मानवी विचार स्वभावामध्ये योगदान देते. 'बुद्धीमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे असे बाबासाहेब म्हणतात."

          शिक्षणाचे महत्त्व सांगताना बाबासाहेब म्हणतात,"देशातील विषमता नष्ट करणारा एकमेव उपाय म्हणजे शिक्षण होय." विषमता जर नष्ट करायची असेल तर शैक्षणिक क्षेत्र सर्व जाती धर्मासाठी खुले व्हायला हवे प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व स्तरावर शिक्षण हे मोफत सक्तीचे असावे.

          शिक्षण हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे. त्याचा योग्य उपयोग झाला तरच समाजाची प्रगती होईल. त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे जो समाज अशिक्षित असतो तो शिक्षणाअभावी सर्वस्व गमावलेलं असतो शिक्षणाने माणसात कर्तव्य आणि हक्काची जाणीव निर्माण होते. जबाबदारी निर्माण होते. आपल्या शिक्षणापासून वंचित समाजाला शिक्षणाचे महत्त्व अत्यंत सोप्या भाषेत कळविणे समजावून सांगताना, डॉ. बाबासाहेब म्हणतात," शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो पाषाण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही."

             शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो. त्याला सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय आदी क्षेत्रातील ज्ञान अवगत होते. काय चूक काय बरोबर हे समजून घेण्याची पात्रता निर्माण होते. आपले अधिकार... आपल्या जबाबदाऱ्या या सर्वाची जाणीव शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये निर्माण होते.शिक्षण हे  वाघिणीचे  दुध ...गुरगुरल्याशिवाय राहणार नाही  याची प्रचिती आज आपल्याला समाजामध्ये पावलोपावली दिसून येते.

         डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  वंचित दलित समाजाच्या शिक्षणासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या शिक्षण संस्थेचे धोरण जाहीर करताना स्पष्ट केले की," पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे धोरण शिक्षण प्रसार करण्याचे नसून भारतात बौद्धिक  नैतिक आणि सामाजिक लोकशाहीच्या ज्यादारे विकास होईल अशी मनोवृत्ती घडवून आणण्याचे कार्य तिला शिक्षण प्रसाराच्या माध्यमातुन करावयाचे आहे आजच्या भारताला याच गोष्टीची गरज आहे आणि भारताविषयी सदिच्छा बाळगणार्‍या सर्व लोकांनी ही गोष्ट देशात घडवून आणली पाहिजे." शिक्षण म्हणजे फक्त अक्षरओळख नव्हे तर त्यातून सामाजिक आर्थिक नेतिक बौद्धिक लोकशाही आणि इतर गोष्टींचा सुद्धा विकास व्यक्तीमध्ये व्हावा हे शैक्षणिक कार्याचे खऱ्या अर्थाने काम आहे जो या क्षेत्रात आपले योगदान देता है देणार आहे त्यांनी या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना विद्यादान द्यावे शिक्षण संपादन केलेल्या प्रत्येक माणसाने समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी उपयुक्त ठरले पाहिजे.

        मुंबईला 20.6.1946 सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला 1950 साली मिलिंद महाविद्यालय सुरु केले. त्यामुळे दलित समाजामध्ये शिक्षणाची क्रांती घडवून आणली. तेवढेच मागासवर्गीयांच्या शिक्षणासंदर्भात बाबासाहेबांनी जे चिंतन केले ते ही आमुलाग्र स्वरूपाची आहे.शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत.    

         शिक्षणामुळे व्यक्ती आणि समाजाची प्रगती होते. शैक्षणिक अधिकार नाकारणे म्हणजे माणूस म्हणून त्यांचे अस्तित्व नाकारून त्यांच्या क्षमता नष्ट करणे होय. म्हणून बाबासाहेबांची शिक्षण विषयक धोरण मांडतांना म्हणतात,"अस्पृश्यांच्या घराघरात ज्ञान गंगेचा प्रवाह नेणे हा माझा उद्देश आहे."

       शैक्षणिक क्षेत्रात अस्पृश्य आघाडीवर असले तरी काही दिवसात योग्य ती प्रगती करू शकतील असा आत्मविश्वास आहे. आज शिक्षणामुळे सामाजिक स्तर उंचावला सोबत शैक्षणिक अधिकार मिळाल्यामुळे उच्च शिक्षणाचे दारीही उघडे झाले त्या जोरावर आज सामाजिक मागास समजले जाणारे जाति वर्ग उच्च पदावर अधिकारपदावर आपले योग्य प्रकारे योगदान देत आहे.

        भारतीय समाजातील प्रत्येक स्तरावरील विद्यार्थ्यां स्वाभिमानाने शिक्षणाच्या वाटेवर एक एक पाऊल पुढे जात आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचाराचे मूल्य तत्वज्ञान ध्येय धोरण महत्त्व हे प्रत्यक्षात उतरविता आहे. नवा समाज निर्माण करत आहे. अपमानास्पद वागणूक त्यामुळे कमी होत आहे. 

      शिक्षणाची दोर ज्यांनी हातात घेतली. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून येणाऱ्या परिस्थितीवर संकटांवर समस्यांवर मात करीत स्वाभिमानाने यशोगाथा सांगताना दिसतात. आणि हीच यशोगाथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होते.

         मिलिंद विद्यालयाच्या शिलान्यास प्रकरणी बोलताना बाबासाहेब म्हणूनच म्हणतात,"हिंदू समाजाच्या अगदी खालच्या स्तरातून आल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व किती आहे हे मी जाणतो खालच्या समाजाची उन्नती करण्याचा प्रश्न आर्थिक असल्याचे मानण्यात येते पण हे चूक आहे कारण हिंदुस्थानातील दलित समाजाची उन्नती म्हणजे अन्न वस्त्र निवारा यांची सोय करून पूर्वीप्रमाणे त्यांना उच्चवर्गीयची सेवा करण्यास भाग पाडणे नव्हे. खालच्या वर्गाची प्रगती मारून त्यांना दुसऱ्याचे गुलाम व्हावे लागत असल्यास त्यांच्यात निर्माण होणारा न्यूनगंड नाहीसा करणे हे खरे शिक्षणाची ध्येय आहे. आमच्या सर्व सामाजिक दुखण्यावर उच्च शिक्षण हेच एकमेव औषध आहे."

               भारतीय समाजव्यवस्थेत निसर्ग वादाचे शैक्षणिक प्रारूप कष्टमय पद्धतीने रुजविले. शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे भारतीय राज्यघटनेत असा कायदा केला. हजारो वर्षाची शैक्षणिक मक्तेदारी मोडून काढत बाबासाहेबांनी शिक्षणावर व्यक्तीची योग्यता ठरते... जातीवर नाही..!! हा विचार त्यांनी भारतीय चातुर्यवर्णीय समाजव्यवस्थेत रुजविला.

       शिक्षणासाठी जात धर्म वय लिंग हे भेदभाव पुसून काढले. शिक्षणाचा हक्क नाकारणे म्हणजे निसर्ग नियमांचे उल्लंघन करणे होय. व्यक्ती विकासाच्या महत्वपूर्ण वैशिष्ट म्हणजे शिक्षणामुळे व्यक्तीचे नावलौकिक वाढविणे योग्यता वाढविणे हे शिक्षणामुळे सहज साध्य होते.

       डॉ. बाबासाहेब म्हणतात,"आपली पुस्तके मागणे म्हणजे आपला प्राण मागण्यासारखे आहे." पुस्तक हेच माझे मित्र आहे." असे म्हणतात. 

       तात्पर्य हेच की, पुस्तकासारखा खरा मित्र आयुष्यात व्यक्तीला दुसरा मिळत नाही. अनुभवाची शिदोरी पुस्तकांमुळेे आपल्या आयुष्याला मिळते. काय चांगले काय वाईट यातील भेद कळतो. आयुष्याला मार्गदर्शन करण्याचे काम पुस्तके करतात.

        डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "केवळ बाराखडी शिकवणे म्हणजे शिक्षण नव्हे तर मुलांची मने सुसंस्कृत करणारे दर्जेदार शिक्षण शाळांनी दिले पाहिजे." इतके सूक्ष्म विचार बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षणाबाबत केला होता.

        शिक्षण हेच खऱ्या अर्थाने जीवनाच्या प्रगतीकरिता महत्वाची बाब आहे. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करणे राष्ट्रीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे.

             20 जुलै 1942 रोजी नागपूर येथील आयोजित डिप्रेस्ड क्लासेस वुमेन्स कॉन्फरन्स मध्ये महिलांना उद्देशून केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजीत असतो म्हणूनच हा समुदाय पाहिल्यावर मला खात्री वाटते व आनंद होतो की आम्ही प्रगती केली आहे." डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टीकोन प्रगल्भ होता.    

          घरातील स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब हे सुशिक्षित होते. हा त्या वेळचा दृष्टीकोण आजही शंभर टक्के लागू पडतो.  

              स्त्री पुरुष समानता हे गुण डॉ. बाबासाहेबांच्या शैक्षणिक विचारातून प्रकर्षाने जाणवतं तसेच शैक्षणिक विकास करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य हक्क आहे. हे या विचारातून दिसून येते. शिवाय शिक्षणातील विषमता आर्थिक विषमता या विचारातून कमी होऊ शकते.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान शिक्षणतज्ञ होते. एवढेच नव्हे तर बहिष्कृत हितकारीशी सभा,दलित वर्ग शिक्षण संस्था, पीपल्स एज्युकेशन सोसायटी अशा विधायक संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार केला.

        भारतीय शिक्षण विषयक स्वातंत्र व अधिकारांचे खरे व खंबीर भक्कम संरक्षण सुद्धा ठरतात. "शिका संघटित व्हा संघर्ष करा"  उद्धाराचा राजमार्गच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारतीयांना दिला.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (संदर्भ माझी आत्मकथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर संपादक ज गो संत) पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने औरंगाबाद येथे 1950 साली मिलिंद महाविद्यालय स्थापन केले. कॉलेजच्या कोनशिला समारंभासाठी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे 1 सप्टेंबर 1951 रोजी औरंगाबादला आले होते त्याप्रसंगी भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींचे आपल्या संस्थेच्या व स्वतः च्या वतीने स्वागत केल्यावर डॉ. आंबेडकरांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व कथन करताना सांगितले की," हिंदू समाजातील खालच्या वर्गातून मी आल्यामुळे शिक्षणाला किती महत्व आहे याची मला पूर्ण कल्पना आलेली आहे. खालच्या वर्गातील लोकांना सुधारण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, हा विचार होत असताना या वर्गाच्या आर्थिक प्रश्नांचाच विशेष उल्लेख होतो. किंबहुना खालच्या वर्गाचे आर्थिक प्रश्न सोडविण्यात त्यांची खरी प्रगती आहे असे मानले जाते. परंतु केवळ तसेच मानले तर ती एक घोडचूक ठरले. भारतातील खालच्या वर्गांना उत्कर्षाच्या व मुक्तातेच्या मार्गाला आणावयाचे म्हणजे या देशातील प्राचीन काळाप्रमाणे त्यांची खाण्यापिण्याची व कपड्याल्याची फुकट सोय करून उच्चवर्णीयांच्या सेवेसाठी तत्पर ठेवणे हे नव्हे! तर माणसामाणसामधील उच्च नीच व श्रेष्ठ कनिष्ठ भेदभावाच्या ज्या न्यूनगंड तत्त्वज्ञानाने त्यांची वाढच खुंटवून दुसऱ्याचे गुलाम व्हायला त्यांना लावले होते, त्या विषारी परंपरेतून त्यांची सुटका करणे म्हणजेच त्यांचा खरा उद्धार करणे होय! यासाठी खालच्या  थरातील लोकांच्या मनात विवेक जागवून व्यक्तिगत व राष्ट्रीय जीवनाचे महत्व पटवून दिले पाहिजे आणि आतापर्यंत ज्या समाजव्यवस्थेत ते जगत होते त्या समाज जीवनाने त्यांची कशी फसवणूक केली आहे हे समजावून दिले पाहिजे. असे कार्य या देशात उच्च शिक्षणाशिवाय केव्हाच शक्य होणार नाही. म्हणून माझ्या मते भारतातील सर्व प्रकारच्या सामाजिक प्रश्नांवर शिक्षणप्रसार हाच एकमेव आणि सर्वश्रेष्ठ तोडगा आहे."

           डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्यात सर्वोच्च स्थान हे शिक्षणाला दिले शिक्षणामुळे मानवी मेंदू प्रगत होतो. ज्ञानाचा विस्तार होतो. चांगला वाईटाची कल्पना प्रगत होते. शिक्षणामुळे सामाजिक उद्दिष्टांची परिपूर्ती करण्यासाठी व्यक्ती सामाजिक कर्तव्यांबाबत नेहमी सजग राहतो.

        डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात शैक्षणिक विचार मांडतांना म्हणतात.... 

1.शिक्षणाचा हक्क 

अ.  21 क. राज्य हे सहा वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरविल्यानुसार शिक्षण (पान 8)

२. विवक्षित शैक्षणिक संस्थांत धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वतंत्र (पान 11 )

28.(1) पूर्णत: राज्याच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही.

(2) जी शैक्षणिक संस्था राज्याकडून प्रशासली जात असेल परंतु धार्मिक शिक्षण देणे आवश्यक करणारा कोणताही दान निधी किंवा न्यास याखाली ती स्थापन झालेली असेल तिला खंड(१) मधील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.

(3) राज्याने मान्यता दिलेल्या किंवा राज्याच्या पैशातून सहाय्य मिळत असणार्‍या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत ते काही धार्मिक शिक्षण दिले जाईल, त्यात भाग घेण्यास अथवा अशा संस्थेत किंवा तिच्याशी संलग्न असलेल्या कोणत्याही जागेत, जी काही धार्मिक उपासना चालविली जाईल तिला उपस्थित राहण्यास,अशा संस्थेत जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, किंवा अशी व्यक्ती अज्ञान असल्यास तिच्या पालकाने, आपली संमती दिली असल्याखेरीज अशा व्यक्तीस तसे करणे आवश्यक केले जाणार नाही.

३. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क

अ. अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण

29.(१) भारताच्या राज्यक्षेत्रात किंवा त्यांच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या ज्या कोणत्याही नागरिक गटाला आपली स्वतःची वेगळी भाषा, लिपी व संस्कृती असेल त्यांना ती जतन करण्याचा हक्क असेल.

(२) राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात,भाषा या किंवा यांपैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही.

आ.  अल्पसंख्याक वर्गाच्या शक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क

३०.(१) धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल.

१((१क) खंड (१) मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे एखाद्या अल्पसंख्याक वर्गाने स्थापन केलेल्या व प्रशासलेल्या शैक्षणिक संस्थेची कोणतीही मालमत्ता सक्तीने संपादन करण्याची तरतूद करणारा कोणताही कायदा करताना राज्य, अशा मालमत्तेच्या संपादनाबद्दल अशा कायद्याने निश्चित केलेल्या किंवा त्याखाली ठरवलेल्या रकमेमुळे, त्या खंडा खाली हमी दिलेला अधिकार निर्बंधित किंवा निराकृत होणार नाही, अशा प्रकारची ती रक्कम आहे याबद्दल खात्री करून घेईल.)

(२) शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्य, एखादी शैक्षणिक संस्था ही, धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्यांक असलेल्या एखाद्या वर्गाच्या व्यवस्थापनाखाली आहे, या कारणावरून तिला प्रतिकूल होईल अशा प्रकारे भेदभाव करणार नाही. (पान 11)

4. कामाच्या शिक्षणाचा आणि विवक्षित       बाबतीत लोकसहाय्याचा हक्क..

अ. (४१) राज्य हे, आपली आर्थिक क्षमता व विकास यांच्या मर्यादीत कामाचा, शिक्षणाचा हक्क आणि बेकारी, वार्धक्य, आजार व विकलांगता यांनी पीडित अशा व्यक्तींच्या बाबतीत आणि काहीही अपराध नसताना हलाखीचे जिणे ज्यांच्या वाट्याला आले आहे अशा व्यक्तींच्या बाबतीत लोकसहाय्याचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी परिणाम कारक तरतूद करील.

5. 16 वर्षाखालील मुलांचे संगोपन व शिक्षणासाठी तरतूद

४५. राज्य हे, बालकांचे वय सहा वर्षाचे होईपर्यंत, त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील.

6. अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक त्यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन

४६. राज्य जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाति यांचे शैक्षणिक व आर्थिक हे तसं वर्धन विशेष काळजीपूर्वक करील, आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण या पासून त्यांचे रक्षण करील. (पान 18)

7. आंग्लभारतीय समाजाच्या लाभाकरता शैक्षणिक अनुदानांबाबत विशेष तरतूद

३३७. आंग्लभारतीय समाजाच्या लाभाकरिता 31 मार्च 1948 रोजी संपणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेली होती अशी काही अनुदाने तर,तीच अनुदाने या संविधानाच्या प्रारंभानंतर पहिल्या तीन वित्तीय वर्षात संघराज्य व प्रत्येक राज्य यांच्याकडून दिली जातील.

     दर तीन वर्षाच्या अनुवर्ती कालावधीत लगतपूर्व तीन वर्षांच्या कालावधीतील अनुदानांहून ती दहा टक्क्यांनी कमी असू शकतील.

परंतु या संविधानाच्या प्रारंभापासून दहा वर्षाच्या अखेरीस अशी अनुदाने, जेथवर ती आंग्लभारतीय समाजाला विशेष सवलत म्हणून असतील तेवढ्या व्याप्तीपुरती, बंद होतील.

परंतु आणखी असे की, कोणतीही शिक्षण संस्था, तिच्यात द्यावयाच्या वार्षिक प्रवेशांपैकी कमीत कमी 40 टक्के प्रवेश आंग्लभारतीय समाजाहून अन्य समाजातील व्यक्तींना उपलब्ध केल्याखेरीज, या अनुच्छेदाखाली कोणतेही अनुदान मिळण्याला  हक्कदार होणार नाही. (पान १४३)

8. प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून             शिक्षणाच्या सोयी

३५० क. प्रत्येक राज्य आणि राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकारी, भाषिक अल्पसंख्यांक समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या पर्याप्त सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील, अशा सोयी पुरवणे शक्य व्हावे, यासाठी राष्ट्रपती आवश्यक किंवा योग्य वाटतील असे निदेश कोणत्याही राज्याला देऊ शकेल. (पान 150)

9. आंध्रप्रदेशात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना

३७१ डः संसदेला आंध्र प्रदेश राज्यात विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कायद्याद्वारे तरतूद करता येईल.

            शिक्षणामुळे बालमनावर शिक्षणाचा प्रभाव योग्य प्रकारे व्हावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षणाला प्रथम महत्व दिले आहे. कारण चांगला व्यक्ती घडविण्यासाठी शिक्षण आणि महत्त्वाची भूमिका निभावते.

           शिक्षण त्याग,मानवता, विनम्रता दुसऱ्याची जाणीव नैतिकता अशी मानवी मूल्ये विद्यार्थी मनावर रुजविले जाता. शिक्षण व वैचारिक समतेचा व्यक्तीमत्त्वाचा विकास व्हावा असे बाबासाहेबांना सतत वाटत होते. म्हणून त्यांनी भारतीय संविधानामध्ये प्राथमिक शिक्षणाला महत्त्व दिले आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे आणि क्रांतीचे प्रभावी साधन आहे.

          डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या बदलत्या तांत्रिक काळातही ते अतिशय महत्वाचे आणि मार्गदर्शक ठरतात. शिक्षणाचे लोकशाही करण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. ते स्वप्न आजही पूर्ण झालेले नाही तरीपण शिक्षणाचे लोकशाहीकरण होण्याच्या मार्गावर आहे.  

           डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली शैक्षणिक वाटचाल देशात अजूनही आलेली नाही ती यावी से वाटत असेल तर शैक्षणिक धोरण राबविणाऱ्या शासनाच्‍या मानसिकतेमध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे. कारण समाज सतत बदलत्या भूमिकेत आहे. वाढत्या तंत्रज्ञानामुळे शैक्षणिक महाक्रांती येत आहे आणि या कोरोना महामारी मध्ये खऱ्या अर्थाने शैक्षणिक महाक्रांती झालेली आहे.

       ऑनलाइन शैक्षणिक वर्ग मुळे तळागाळातील जनतेपर्यंत शिक्षणाकडे पाहण्याचा उद्देश बदललेला आहे. दृष्टिकोन बदललेला आहे. त्यामुळे शैक्षणिक धोरण राबवताना फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा आता शैक्षणिक बदलताक्रांती कडे लक्ष देऊन राबवावी लागेल. आणि बाबासाहेबांना हेच अभिप्रेत होते की बदलत्या काळानुसार शैक्षणिक धोरणांमध्ये बदल व्हावा कारण शिक्षण समाजपरिवर्तनाचे आणि समाज व्यवस्था सुरळीत चालविण्याची एकमेव साधन आहे....मार्ग आहे !!!

        डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार विश्लेषण करतांना एकच मुद्दा प्रकर्षाने जाणवतो तो म्हणजे मानवी जीवनाला यशस्वी आणि  प्रतिष्ठापूर्ण  जगण्यासाठी," शिक्षण "हा अविभाज्य घटक असल्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. शिक्षण विकासाची गुरुकिल्ली आहे... समाजपरिवर्तनाची गुरुकिल्ली आहे... समाजक्रांतीची  गुरुकिल्ली आहे....  ",शिका संघटित व्हा संघर्ष करा"  आणि समाज परिवर्तनाच्या क्रांती उच्चशिक्षित होऊन आपले योगदान द्या आणि देशाला प्रगतीच्या दिशेने एक पाऊल समोर घेऊन जा..!!


क्रांतीची मशाल आहे शिक्षण 

परिवर्तनाची ढाल आहे शिक्षण  

अन्यायाच्या महाज्योतीत 

ज्योत आहे शिक्षण 

विकासाच्या सर्वोच्च शिखरावर 

मशाल आहे शिक्षण..!!

              आपली परिस्थिती कशी असो शिक्षण हे कधीही सोडू नका. बाबासाहेबांनी शिक्षणाच्या जोरावर भारतामध्ये महाक्रांती घडवून आणली. त्यांचे व्यक्तिमत्व महान आहे.  त्यांचे विचार कधीही समाज बाह्य होणार नाही. त्यांनी त्यांच्या शिक्षणामुळे देदीप्यमान इतिहास निर्माण केला हे विसरून चालणार नाही. 

            ✍️🏻सविता तुकाराम लोटे 



आजच्या लेखा संबंधीची माहिती तुम्हाला आवडली असल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका.माझे पेज कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 

        तुमची येण्याची जाणीव प्रतिक्रिया असतात. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...!!❤💕 धन्यवाद!!!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे  

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .





-------------------------------------

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री  कामगार विचार

          भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक थोर विचारवंत  शिक्षणतज्ञ , कायदेपंडित , संसदपटू  संपादक ,लेखक ,वकील, प्राध्यापक , समाज सुधारक , घटनाकार ,एक अभ्यासू आमदार  खासदार  अशा  पदांना भूषविलेले व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब ! त्यांच्या या कार्याची दखल सर्वांनीच घेतली.

         १९३६  साली स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. या पक्षाचे ध्येय धोरणे कुठल्याही जाती धर्मासाठी नव्हते तर कष्टकरी समाज वर्गासाठी होते. आर्थिक-सामाजिक राजकीय हक्कांसाठी होते. यातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शोषित कामगारा विषयीची तळमळ लक्षात येते. १५ ऑगस्ट 1१९३६ धोरणाचे ध्येय धोरणे अतिशय साध्या पद्धतीने आणि सूक्ष्मसखोल विचार पद्धतीने मांडले.

         कष्टकरी समाज वर्ग सत्ता संपत्ती पासून वंचित होता वाटेल तसे राबविले जात होते त्यामानाने मोबदला मात्र अल्प द्यायचे बारा बलुतेदार पद्धती समाजमान्य होते दलित अस्पृश्यांची स्थिती दयनीय होती शोषित कष्टकरी कामगार वर्ग गुलामीचे जीवनमान जगत होते.            १८७३ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाज चळवळीने पारंपारिक समाजात चौकट उद्ध्वस्त केले या चळवळीने समाजातील अस्पृश्यांचे जीवन शैली दाखवून दिले या चळवळीमुळे अस्पृश्य समाज वर्गाला  जीवन जगण्याची  नवीन पद्धत प्राप्त झाली जीवनाला धैर्य प्राप्त करून दिले रोजगार शिक्षण जगण्याचे सामाजिक मूल्य इत्यादी बळ दिले.

             डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या स्वीकारला त्या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये  आपला ठसा उमटवलेला आहे १९४२ते १९४६ या काळात केंद्रीय श्रम व रोजगार ऊर्जामंत्री म्हणून कार्यरत असताना आपले मत रोख ठोक पद्धतीने मांडले ते म्हणतात," आता काळ बदलला आहे. सत्तेच्या व कायद्याच्या जोरावर कामगार वर्गाला दडपणे शक्य नाही. कामगार हा माणूस आहे. त्यांना मानवाचे हक्क मिळाले पाहिजेत. सध्या सरकार पुढे तीन प्रश्न  आहेत एक तडजोडीचा, कामगाराची निश्चित वेतन , कामगार मालक यांच्यातील सौहादपूर्ण संबंध कामगारांचे राहणीमान उंचावले पाहिजे. आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. मी नेहमीच कामगार वर्गाच्या बाजूने उभा राहीन.” आपली कार्यपद्धती ही कामगारांच्या बाजूने आहे हे त्यांनी मांडले. 

     २९ मार्च १९४५ स्त्री कामगारांचे स्त्रियांसाठी प्रसूतीचा काळ विश्रांतीची तरतूद, रोख मदत करणे, चार आठवडे प्रसूती भत्ता मिळावा तसेच गैरहजर असताना पगारी सुट्ट्या मिळाव्यात. खाण कामगारांना शॉवर बॉथची योजना सुद्धा अंमलात आणली होती.

     डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खाण मजुरांसाठी आपले विचार भाषणातून  व कायद्यातून मांडताना दिसतात. स्त्री कामगार अन बद्दलची आत्मीयता त्यांच्या कौटुंबिक समस्या संसार विषयी चिंता त्यांच्या जीवनाचा उन्नतीचा मार्ग हा आर्थिक परिस्थिती सुधारेल तेव्हाच सुकर होईल.  

     बाबासाहेब यांनी १९४५ आली महागाई भत्ता निर्णयामुळे अर्थ मजूर मंत्री असताना बाबासाहेबांचे निर्णय हे कुठल्याही विशिष्ट जातीला समोर न ठेवता समाजातील सर्व जाती धर्मातील कामगारांच्या हितांचे असतील असे निर्णय घेतले स्वातंत्र्य समता बंधुभाव या सूत्रांनी बांधणारी भारतीय राज्यघटना दिली. देश एकसंघ ठेवला.

          ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत असे त्यांचे मत होते. कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करणे, मालक आणि कामगार यांच्यात औद्योगिक विवाद झाल्यास दोघात समेट घडवून आणण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे, कामगार आणि मालक यांच्या कोणत्याही वाटाघाटीसाठी तरतूद करणे, वर्षातून किमान 240 दिवस काम, कामगारांना दिवसभरात आठ तास काम, नोकरीत असताना जर  कामगाराचं अपघात व मृत्यू झाला तर मालकांकडून कामगाराला नुकसान भरपाई देणे. असे मत त्यांनी दिल्ली येते जॉईंट लेबर कॉन्फरन्स(Joint Labour Conference 1942) मध्ये कायद्यात एकवाक्यता असावी असे मत व्यक्त केले.  

        त्यांनी स्त्री कामगारांना कायद्यान्वये रात्री काम करण्यासाठी बंदी , स्त्रियांना प्रसुती काळात भर पगारी सुट्टी, बारमाही कामगारांना हक्काची भरपगारी सुट्टी,सक्तीची तडजोड , लवादा हे तत्व कामगारांच्या न्यायासाठी कायमस्वरूपी केले. त्यांचे हक्क वेतन विमा आरोग्य संरक्षण कामाचे तास इ. 

आधुनिक समाजव्यवस्था बदलता आहे. जागतिककरण आले औद्योगीकरण सुरू झाले नवीन वसाहत वादाला शहरी-ग्रामीण भागाचा विकास होत आहे. ग्रामीण भागांचे शहरीकरण होत आहे शहर महानगरात परिवर्तित होत आहे; त्यामुळे सांस्कृतिक सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक यासर्व मध्ये बदल होत आहे. प्रगतीचे नवीन मार्ग खूले होत आहे.

       समाज भारतीय राज्यघटनेने दिलेले अधिकार मूलभूत तत्व समानता स्वातंत्र त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव आहे. लोकशाही ही आपली जीवनशैली बनवली आहे . बहुराष्ट्रीय कंपनी धोरणामुळे, वाढत चाललेल्या खाजगीकरणामुळे, नवीन समस्या निर्माण होत आहे. नवीन वसाहतवाद निर्माण होतो. साम्राज्यवाद निर्माण होत आहे. सांस्कृतिक दहशतवाद निर्माण होत आहे. माणसाच्या घामाची जागा आता यंत्राने घेतली आहे. श्रीमंत श्रीमंत तर गरीब हा अधिक गरीब होत आहे. सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक मूल्यांची घसरण होत आहे. भारतीय कामगार कायदे पुरेसे आहे पण समाधानकारक रीतीने योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली जात नाही त्यामुळे जो कायदा कामगाराच्या फायद्याचा असतो तो निराशाजनक पद्धतीने पदरात पडताना दिसतो .

            सविता तुकाराम लोटे

---------------------------------




माझे गुरु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री विषयक विचार..!!



          माझे गुरु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री विषयक विचार

                        डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार राजकारणी, तत्वज्ञ, न्यायशास्त्रज्ञ, बहुजनाचे उद्धारकरता, भारताचे भाग्यविधाता, समानतेचा पुरस्कार करणारे होते.  त्यांनी देशाच्या विविध क्षेत्रात आपले योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माता असे संबोधले जाते. "शिक्षण जितके पुरुषांसाठी आवश्यकता आहे. तितकेच महत्त्वाचे स्त्रियांना सुद्धा आहे ''.  हेे बाबासाहेबांचे विचार आज समाजामध्येेे तंतोतंत जुळत आहे. डॉ. बाबासाहेब म्हणतात,"ज्या समाजात स्त्रिया पुढे तो समाज ज्या देशात महिलांची प्रगती होते तोच देश प्रगतिशील असू शकतो."

                   डॉ.  बाबासाहेब आंबेडकर स्त्रीमुक्तीचे  समर्थक होते. डॉ. बाबासाहेब यांच्या कार्यावर महात्मा ज्योतिराव फुले यांचा अतिशय महत्त्वाचा प्रभाव होता. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा ध्यास घेऊन समाजातील अंधाऱ्या वाटेवर असणाऱ्या स्त्रियांना उजेडात आणले.  त्यांना अक्षर ओळख देऊन प्रगतीचा पहिले किरण त्यांनी दाखविले.  ती आत्मनिर्भर राहावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्त्रीला कायदेशीर हक्क मिळवून दिले.  

                त्यांच्या मते बुद्ध हेच स्त्री स्वातंत्र्याची आद्य पुरस्कार होते तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे कार्य स्त्रियांसाठी केले ते अलौकिक आहे. समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे यावरून ठरविता येते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी आग्रही भूमिका घेतली.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून तिथे मुलींना सुद्धा प्रवेश दिला.


                डॉ. बाबासाहेब म्हणतात," समाजाची प्रगती ही फक्त पुरुषप्रधान संस्कृतीवर आधारित नसून त्या समाजातील स्त्रियांची महत्त्वाची भूमिका असते. समाजाचे मूल्यमापन केवळ पुरुष प्रगतीवर अवलंबून असते. स्त्रियांची देखील होणे गरजेचे असते. याचे भान ठेवणे आवश्यक आहे."

                       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी,"स्त्री एक स्वातंत्र्य व्यक्तिमत्व आहे आणि तिला स्वातंत्र्य मिळाला हवे".  

                 सर्व क्षेत्रात म्हणून त्यांनी स्त्री वर्गांसाठी भरपूर सुविधा केल्या. जसे मजुरांनी कष्टेकरी स्त्रियांसाठी 21 दिवसाची किरकोळ रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई, कोळसा खाण कामगार स्त्रियांना प्रसूती भत्ता व रजा मिळावा यासाठी आग्रही भूमिका असणारे पहिले व्यक्ती म्हणजे बाबासाहेब होते.  कामगार पुरुष कामगारांना जितकं वेतन दिल जात तितकेच वेतन स्त्रियांना सुद्धा मिळावे, वीस वर्षाची सेवा संपल्यानंतर सेवानिवृत्ती वेतन यासारखे महत्त्वाचे निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांसाठी दिले.


                भारतीय जातीव्यवस्था आणि भारतीय पुरुष प्रधान संस्कृतीला आळा बसावा यासाठी सतत बाबासाहेबांच्या विचारांमध्ये स्त्री ही अग्रेसर राहिलेली आहे.  कारण स्त्री आणि शूद्र यांच्या वर सतत अन्याय होत राहिला आहे.  हे दोन्ही घटक शोषित आहे. त्यांना स्वातंत्र्य मिळायला हवे, म्हणून जठर विवाह पद्धती, केशवपन पद्धती, बालविवाह पद्धती, सती पद्धती अशा विविध समाजमान्य पद्धती कायद्याने नष्ट व्हाव्या अशी आगरी भूमिका बाबासाहेबांची होती.

        स्त्री पिढ्याने- पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिली. आर्थिक स्वावलंबन संपत्तीवरील समान मालकी हक्क निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रगतीच्या वाटा बंद असलेल्या स्त्रियांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1947 मध्ये कायदामंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिल प्रस्ताव लोकसभेत सादर केला.

                     अस्पृश्यतेचे उच्चाटन स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार, स्त्री - पुरुष समानता, वारसा हक्क स्त्रियांना देण्याची तरतूद होती. त्यांच्या मध्ये सामाजिक न्यायाचा लढा यशस्वी होण्यासाठी हिंदू समाजाच्या वैयक्तिक कायद्यामध्ये जातिव्यवस्था आणि पुरुषप्रधानता यांना नकार देऊन समान वैयक्तिक संबंधाची पायाभरणी करणे आवश्यक आहे.

                 हिंदू कोड बिल बाबासाहेबांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. डॉ. बाबासाहेब म्हणतात ,"हिंदू कोड बिल हा देशातील विधिमंडळाद्वारे घेतलेला सर्वात मोठा सामाजिक सुधारण्याचा निर्णय आहे. असा कायदा जो  याआधी झाला नाही आणि नजीकच्या भविष्यकाळात देखील. येणाऱ्या कुठल्याही कायद्याची त्याची तुलना होणे शक्य नाही.  वर्ग वर्गात असलेली विषमता आणि वर्ग अंतर्गत सुद्धा स्त्री पुरुष असा असणारा लिंगभेद हाच हिंदू समाजाचा आत्मा राहिलेला आहे. हा भेद ही विषमता मिटविल्याशिवाय आर्थिक सुधारणेबाबत कायदे करणे म्हणजे शेणाच्या ढिगार्‍यावर भारतीय संविधानाचा अवाढव्य महाल बांधण्याचा खोटा दिखावा करण्याइतका दांभिक प्रकार आहे."

                डॉ. बाबासाहेब म्हणतात," समाज व्यवस्था ही एका विशिष्ट समाजापुरते निगडित नसून ती संपूर्ण समाजातील घटकांवर अवलंबून असते. त्यांच्या प्रगतीवर अवलंबून असते.  स्त्री हा त्या समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. म्हणून जातीय अन्याय आणि स्त्रियांवर होणारे अन्याय हे दोन्ही एकमेकांमध्ये गुंतलेले आहे.  स्त्री ही आपल्या कुटुंबाचे योग्य पद्धतीने नियोजन करू शकते तसेच स्त्री समाजातही त्या ज्ञानाचा उपयोग करून आपले योगदान देऊ शकते.

                 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला. कारण भारतीय स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार द्यावा हा त्याकाळी वादग्रस्त मुद्दा होता. कारण एका विशिष्ट समाज व्यवस्थेमध्ये समाज रचना असल्यामुळे समाजातील काही वर्ग प्रगती आणि विकासापासून वेगळी होते आणि हीच गोष्ट त्याकाळी असलेल्या समाज व्यवस्थेला अभिमानाची वाटत असावी. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा हक्क सहज समाजातील प्रत्येक व्यक्तीला मिळावा म्हणून मतदानाचा अधिकार दिला. भारतीय संविधानाने आर्टिकल 326 नुसार वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार दिला. तो स्वातंत्र्यपूर्वे आपल्याला नव्हता.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये स्त्रियांच्या प्रगतीला विकासाला अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. एखाद्या समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील स्त्रियांची प्रगती किती झाली आहे; हे मी मोजतो.''

                    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 1927 चा महाड चवदारतळ सत्याग्रह, 1930 चा नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह आणि 1942 च्या नागपुरातल्या महिला परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.  बाबासाहेब म्हणतात ,''मुलींच्या प्रगतीमध्ये लग्न हे अडचणीचे कारण होऊ नये म्हणून मुलांसारखेच मुलींच्याही मताला महत्त्व द्यावे. जेणेकरून लग्नानंतर स्त्रियांना समान अधिकार मिळेल. त्यांच्या आवडीनिवडी त्यांना जपता येईल. पुरुषप्रधान संस्कृतीला कुठेतरी त्या कारणाने आळा बसेल आणि नवीन पिढी नवीन संस्कृतीमध्ये स्वतःला नवीन पद्धतीने समाजापुढे मांडेल.''

                    आजची स्त्री सुशिक्षित आहे. शिक्षित आहे. स्वतंत्र विचारसरणीची आहे. स्वावलंबी आहे. त्यांचे संपूर्ण श्रेय सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना जाते तसेच आजची स्त्री स्वतःच्या हक्कासाठी जागरूक आहे तिला तिचे अधिकार माहित आहे. तिला तिचे हक्क माहित आहे. तिला तिच्या जबाबदाऱ्या माहित आहे म्हणून तिला कुठल्याही क्षेत्रात आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा आणि योग्य न्याय मागण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेशीर रित्या दिला. डॉ. आंबेडकरांनी स्त्री पुरुष समानतेला स्थान दिले. हिंदू कोड बिल हे सर्वोत्तम उदाहरण आहे. स्त्रीमुक्तीचा ध्यास हा डॉ आंबेडकर यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यामध्ये दिसतो तसेच त्यांनी त्यांच्या विचारांमध्ये स्त्री पुरुष समानतेला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. 

                 ती सक्षम आणि साक्षर बनविण्याचे सर्वोत्तम कार्य बाबासाहेबांनी स्त्रियांना दिले. आज स्त्री स्वातंत्र्य विचारसरणीची आहे. ती समाजातील कुठल्याही परिस्थितीला समोर जाण्याची ताकद तिच्यामध्ये निर्माण केलेली आहे हे सर्व फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या कायदेशीर रित्या संरक्षणामुळे होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व चळवळी समाजातील महिलांच्या नेतृत्वाचा पाय भक्कम करण्यासाठीच होत्या.


             डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1924 - 25 पासून सर्व आंदोलनांमध्ये स्त्रियांना समाविष्ट करून घेतले. यामुळे बाबासाहेबांना कट्टर समाजाकडून विरोध होत होता. महिलांचे प्रश्न, दलित महिलांचे प्रश्न, समाजातील सर्व स्त्रियांचे प्रश्न, दलितांचे अधिकार आणि हक्क, दलित व स्त्रियांना मंदिर प्रवेश यासारखा प्रश्नांवर बाबासाहेबांनी समाजाचे लक्ष वळविले. पण कधीही या प्रश्नांसाठी सनातनी लोकांनी मदत केलेली नाही.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 जुलै 1942 रोजी नागपूर येथे आयोजित, ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वुमन्स कॉन्फरन्स मध्ये 25 हजार स्त्रियांना उद्देशून केलेला भाषणात म्हणतात," स्त्रीची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून समाजाची प्रगती मी मोजीत असतो.  म्हणून मला खात्री वाटते व  आनंद होतो की आम्ही प्रगती केली आहे .कारण त्या सभेला प्रचंड महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला होता 


        आजही समाजातील काही त्याच विचारसरणीचे लोक मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश महिलांना नाकारतात. हे भारतीय समाजाचे सत्य आहे. कारण बाबासाहेबांनी कायदेशीर रित्या कितीही स्वातंत्र्य स्त्रियांना दिली असले तरी,जोपर्यंत सामाजिक स्वातंत्र्य स्त्रियांना मिळत नाही तोपर्यंत कायद्याची कितीही स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही.हे भारतीय समाज व्यवस्थेने सिद्ध केलेले आहे. ही एक शोकांतिकाच आहे.

        कारण आजही कायद्यासमोर विशिष्ट विचारसरणीला इतके महत्त्व का दिले जाते. हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्नच आहे.

               स्त्रीला जातिव्यवस्था रूढी, प्रथा, परंपर, संस्कृती या मध्ये अडकविले आणि आजही अडकू पाहत आहे. स्त्री कुटुंबवत्सल आहे. पण आज ती स्त्री पुरुषप्रधान संस्कृतीच्या वेदना सोडून आज उच्च पदावर कार्यरत आहे. आज स्त्री पुरुष समानतेचे स्वप्न सत्यात उतरत आहे. जगाच्या इतिहासात स्त्रियांचे योगदान अमूल्य आहे.

               आधुनिक स्त्रीची वाटचाल सकारात्मक आणि आशादायक आहे. बाबासाहेबांनी लावलेले या रोपट्याला आता फुले- फळे येत आहे. स्त्रीचे योगदान हे कुणीही कानाडोळा करू शकत नाही. कारण बाबासाहेबांनी आधुनिक समाजाचे जे चित्र रेखाटले होते ते चित्र आपल्या चारही बाजूने दिसत आहे. आज स्त्री शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा, संरक्षण इत्यादी क्षेत्रात सक्षम झालेली आहे. सक्षमीकरणाचा नारा काय असतो हे दाखवून दिले आहे. हे सर्व फक्त बाबासाहेबांमुळे स्त्रियांच्या मिळाले आहे. 

            बाबासाहेबांनी बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असे न करता त्यांनी स्वतःही रमाबाईंना या चळवळीत येण्यास प्रोत्साहन दिले. रमाबाईंनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या कार्यामध्ये योगदान दिले. बाबासाहेब हे केवळ बोलते समाज सुधारक नव्हते तर ते करून दाखविणारे समाज सुधारक होते.  आज स्त्री फक्त पुरुषाच्या पाठीमागे यशस्वी पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतीक न राहता स्वातंत्र्य यशस्वी स्त्री झालेली आहे. याचे सर्व श्रेय बाबासाहेबांना द्यावे लागेल.

          कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो .पण आधुनिक भारताच्या स्त्रियांच्या मागे त्यांच्या प्रगती मागे त्यांच्या आजच्या यशोगाथा मागे फक्त एकाच महापुरुषाचा हात आहे तो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय.

             बाबासाहेबांनी ज्या सुविधा सामाजिक स्तरावर स्त्रियांना मिळाव्या असे वाटत होते त्या सर्व सुविधा त्यांनी कायदेशीर रित्या भारतीय संविधानात दिला. आज स्त्री काही प्रमाणात असुरक्षित वाटत असली तरी बाबासाहेबांनी दिलेले कायदेशीर हक्क जर तंतोतंत लागू झाले तर समाजामध्ये असलेली विषमता आणि असुरक्षित भावना कमी होईल. 

                 स्त्री समाजामध्ये सुरक्षित राहील.   कारण स्त्री सुरक्षित राहिली तर समाज सुरक्षित राहील आणि समाज सुरक्षित राहील तर प्रगतीच्या नवनवीन वाटा सर्वांसाठी खुल्या होते. आपण महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात, शोषितांच्या वेदनांची जाणीव होऊ द्या स्वातंत्र्य,  समता,   बंधुता ,सामाजिक न्याय या मूल्यांचा उपयोग करा. यावरच आजच्या समाजाची प्रगती आहे आणि उद्याचे भविष्य आहे."

                          डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांच्या हक्काप्रती असलेले विचार आजही समाजासाठी दिशादर्शक आहे.

भारतीय स्त्रियांना हक्क मिळवून देण्यात सर्वात मोठे योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. आज समाजातील सर्व क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत आहे. ज्या स्त्रीला फक्त गुलामासारखे आणि उपभोग वस्तू म्हणून वापरले जात होते. ती स्त्री समाजात अर्थ, धर्म ,राज्य, सुरक्षा इत्यादी क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे.  हे सर्व बाबासाहेबांनी त्यांना संविधानात्मक दर्जा प्राप्त करून दिला. त्यांच्या हक्कासाठी म्हणून पूर्णत्वास येत आहे. समाजात मान सन्मान मिळत आहे. स्त्री म्हणजे पायाची दासी नसून विविध क्षेत्रात पुरुषांबरोबर आपलं योगदान देत आहे.

            चूल आणि मूल ही संकल्पनेला आळा देत घराचा उंबरठा ओलांडून जगभरात आपले कर्तव्य गाजवीत आहे आणि हे सर्व फक्त बाबासाहेबांमुळे स्त्रियांच्या वाटेला आलेले आहे.  स्त्रियांना मिळालेली आहे जर बाबासाहेब नसते तर कदाचित हा प्रश्नच अंगाला काटे आणणार आहे.  कारण स्त्री कुठे सुरक्षित असती.

        महिलांना पुरुष समान अधिकार मिळाली नसते तर? 

स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला नसता तर ?हिंदू कोड बिल मध्ये सुविधा मिळाल्या नसत्या तर??? 

तिला घटस्फोटाचा अधिकार मिळाला नसता तर? 

स्वातंत्र्य विचारसरणीचे अधिकार मिळाले नसते तर? 

रूढी प्रथा परंपरा मान्यच करा असे कायदेशीर गुलामगिरी लादली असती तर? 

        अशी कितीतरी प्रश्न स्त्रियांसमोर असते. पण आज हे प्रश्न स्त्रिया समोर नाही याचे सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते. महिलांना नैसर्गिक मानवी हक्क बाबासाहेबांनी मिळून दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण समाज व्यवस्थेला जी गुलाम बंदिस्त परंपरा रूढी प्रथा परंपरा ब्राह्मण संस्कृतीने तेही स्वार्थी यात बंदिस्त होती ती स्वातंत्र्य करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यामध्ये केले 


     भारतीय विषमतेच्या प्रश्नाला  जसे वर्णव्यवस्था जातिव्यवस्था अवलंबून होते तेच सर्व स्त्रियांसाठी सुद्धा होते. अशा स्त्रियांना मुक्त करण्याचे काम बाबासाहेबांनी केले त्यांच्या या कार्याला शब्दात मांडावे इतके शब्दही माझ्याकडे नाही कारण एक स्त्री म्हणून मी आज आशावादी आहे एक स्त्री म्हणून प्रगतीच्या प्रत्येक वाटेवर एक एक पावले चालत आहे. सुरक्षितता हा माझा कायदेशीर अधिकार आहे हे मला बाबासाहेबांमुळे कळले नैसर्गिक रित्या मी स्वातंत्र्य व्यक्तिमत्व आहे हे मला बाबासाहेबांमुळे कळले. मी एक स्त्री इतिहासाच्या पुस्तकात गुलाम होती वर्णव्यवस्था जातिव्यवस्थेत  बंदिस्त होती आज मी स्वातंत्र आहे हे मला बाबासाहेबांमुळे कळले.

        मी मुक्त विचारसरणीने मी आपले मत मांडू शकते हे मला बाबासाहेबांमुळे कळले आणि स्त्री मुक्त सुद्धा आहे हे सुद्धा बाबासाहेबांमुळे कळले. बाबासाहेबांनी लावलेले हे रोपटे आज गोड फळांनी बहरलेले आहे आणि ते फळ खाण्यासाठी मला संघर्ष करावा लागतो यातच कुठेतरी समाजव्यवस्था अजूनही वर्णव्यवस्थेतले जात आहे का? हा प्रश्न महिलांना पडत आहे.

     अजूनही आम्ही गुलामच होऊ का? हाही प्रश्न कधी कधी मनात येऊन जातो पण या प्रश्नाचे सर्व उत्तरे नकारात्मक असतात. कारण बाबासाहेबांनी जे कार्य संपूर्ण समाज व्यवस्थेसाठी करून ठेवले ते कोणीही नष्ट करू शकत नाही किंवा त्यांचे योगदान कमी लेखू शकत नाही. बाबासाहेब म्हणजे एक स्वातंत्र्य विद्यापीठ आहे. विचारांचे समानतेचे प्रतिष्ठेचे शिक्षणाचे राजकारणाचे अर्थकारणाचे शैक्षणिक करण्याचे आणि जातीय व्यवस्थेचे सुद्धा म्हणून बाबासाहेब माझे गुरु आहे.

        कारण मला जे अधिकार मिळाले एक स्त्री म्हणून ते सर्व फक्त फक्त बाबासाहेबांमुळे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाजाचे दुःख समजून घेतले नाही तर महिलांचे सुद्धा दुःख त्यांनी समजून घेतले आणि स्त्री नैसर्गिक दृष्ट्या स्वातंत्र्य व्यक्तिमत्व आहे हे जगापुढे पहिल्यांदा मांडले आणि त्यांच्यासाठी संविधानात्मकरीत्या खूप काही देऊन गेले लिहून गेले आणि समाजात ठेवून गेले.

     डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेले चळवळ जगाच्या इतिहासात मानवी मुक्तीचा लढा ठरला आहे. भारतीय समाज व्यवस्थेला मुळापासून नष्ट करण्याचे काम बाबासाहेबांच्या चळवळीमुळे झाले.

         शिक्षणाचे अखंड ज्योत बाबासाहेबांनी पेटवली. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. आपल्या हक्कासाठी संघर्ष करा कारण समाजात सर्व एकच आहे इथे कोणीही मोठा किंवा कोणीही लहान नाही. समता बंधुत्वा न्याय स्वातंत्र्य  संपूर्ण समाजाला दिली.         ...........राज्यघटनेचा खरा शिल्पकार महामानव माझे गुरु माझे मार्गदर्शक मला स्त्री म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्य व्यक्तिमत्व स्त्रियांना मानवी हक्क देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा मानाचा मुजरा.


              नव्हती आम्हा जगण्याची मुभा नव्हती आम्हा चालण्याची मुभा नव्हती आम्हा शिक्षणाची मुभा बाबासाहेबांमुळे आज सर्वोच्च पदावर जाण्याची मुभा सुरक्षितता प्रदान करण्याची मुभा सुरक्षा देण्याची मुभा शिक्षण घेण्याची मुभा आणि स्वातंत्र्य उपभोगण्याची मुभा...!!!


आजच्या लेखा संबंधीची माहिती तुम्हाला आवडली असल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका.माझे पेज कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 

        तुमची येण्याची जाणीव प्रतिक्रिया असतात. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...!!❤💕 धन्यवाद!!!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे  

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .



✍️©️®️सविता सूर्यकांत तुकाराम लोटे 

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 



❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤



मंगळवार, ११ एप्रिल, २०२३

प्रेम चारोळी (मराठी चारोळी)

सांगायचे आनंद झाल्याचे 
फुललेला गुलाब मोगरा सुगंधाच्या 
सुगंध दळवळा मनाचा 
तुझ्या सोबतीने हातात हात घेत

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

          आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
--------------------------------------------------------------------------
 Glad to say
 Blooming Rose Mogra fragrance
 The fragrance of the mind
 Holding hands with your partner

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

        Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.



-------------------------------------

सोमवार, १० एप्रिल, २०२३

चारोळी (मराठी प्रेम चारोळी)

एकटेपणाच्या शांततेत तुझा झालेला स्पर्श 
तुझ्या आठवणीन पेक्षाही मोगरा फुलवितो 
मनात तुझी टिकली दोन नयनांची सोबती 
धाव करतात हृदयाला एकटेपणाच्या शांततेत

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

          आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

=============================

Your touch in the silence of loneliness
Mogra blooms more than your memories
 The companionship of two Nayans remained in your mind
 Runs the heart in the silence of loneliness

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

-------------------------------------

उजेडातील प्रकाश (काव्यसंग्रह) "एक विचारधारा समानतेची"Light in the Light (Anthology) "An Ideology of Equality"


उजेडातील प्रकाश (काव्यसंग्रह) 
        "एक विचारधारा समानतेची"

Light in the Light (Anthology)
 "An Ideology of Equality"

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

काव्यसंग्रह शीर्षक :- उजेडातील प्रकाश  
                    "एक विचारधारा समानतेची"


           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

-------------------------------------


              *** प्रस्तावना ***
                  " Preface"

       काव्य / कविता हे विशिष्ट एका भावनेवर आधारित असते. कविता विचारसरणीवर आजूबाजूच्या परिस्थितीवर आधारित असते. आजूबाजूच्या परिस्थितीचा कवितेवर/ काव्यावर परिणाम होतो. हे नक्की!!
   " उजेडातील प्रकाश," एक विचारधारा समानतेची!!! हा काव्यसंग्रह ,"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांच्या विचारसरणीवर आधारित आहे.
( Light in the Light," An Ideology of Equality!!! This anthology, "Dr.  It is based on the ideology of Babasaheb Ambedkar".)

      काव्य ही कला नसून प्रतिभा आहे", ती जोपासावी लागते. ती रुजवावी लागते. नवनवीन शब्द ...नवनवीन पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मनाला उत्तेजना मिळते. शक्ती मिळते. अलौकिक प्रफुल्लित आनंद मिळतो. सर्जनशील शक्तीला नवीन उगम मिळतो. 

("Poetry is not an art but a talent", it has to be cultivated. It has to be inculcated. New words...are tried in new ways. It stimulates the mind.)

        कवितेमधून सामाजिक,राजकीय,आर्थिक इ. विषयावर लिहिले जाते. कविता हे विश्व फार व्यापक आहे. या विश्वात एखादा तरी मोती आपल्याला मिळावा इतकीच अपेक्षा असते.
        काव्य/ कविता शब्दात मांडताना नेहमी लक्षात ठेवावे लागते," शब्द हे तलवारी सारखे आहे". लेखणी सोबत आल्यास एक नवीन इतिहास घडू शकतो.
          लेखणी आणि शब्द हा इतिहास लिहीत असतो. आज लिहिलेल्या शब्द उद्याचा इतिहास होतो. हे नेहमी लक्षात ठेवून कवितेची निर्मिती करावी लागते.

      ( While putting Kavya/poetry into words one should always remember, "Words are like swords".  A new history can be made if the pen comes along.
 Pens and words write history.  Words written today become history tomorrow.  Poetry has to be created keeping this in mind.)

      शब्दांना एका विशिष्ट कवितेमध्ये आणि काव्यसंग्रहात  संग्रहित करताना सुद्धा खूपदा गणिते शब्दांचे चुकतात तरीही शब्द प्रेरणा देत असतात. आणि नवीन कवितेच्या स्वरूपात ते कागदावर उमटतात नवीन प्रतिभेने...!🌹
      नवीन शब्दरुपी माळे मध्ये गुंफण्यासाठी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शब्द अलौकिक स्वरूपात आपल्याकडून लिहिले जाते. 
       लेखक समाजाच्या भावभावनांना, आशा - आकांक्षांना आणि सुखदुःखांना शब्दरूप देत असतो. 
   (The writer gives expression to the feelings, hopes and aspirations of the society.)
        काव्य /कविता लेखन निर्मिती हे वाचकांसाठीच असते. किंबहुना वाचकांसाठीच लिहिलेले असते. काव्य प्रोत्साहित करीत असते. नवीन यशोशिखर गाठण्यासाठी प्रेरणा देत असते.

     कधी कधी विशिष्ट विचारधारेवर कविता लिहिताना त्या विचारधारेचा अभ्यास असावा लागतो आणि तो अभ्यास खऱ्या अर्थाने त्या काव्यसंग्रहाला जिवंतपणा देत असतो.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या जयंतीनिमित्त हा काव्यसंग्रह ऑनलाइन प्रकाशित करीत आहे. बाबासाहेब यांचे विचार समानतेवर आधारित आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचे सर्व अधिकार बाबासाहेबांनी मिळून दिले.

         स्वतः उपाशी राहून बाबासाहेबांनी शिक्षण पूर्ण केले. त्या शिक्षणाचा संपूर्ण उपयोग समाज विकासासाठी आणि परिवर्तनासाठी शेवटच्या क्षणापर्यंत केला. त्यांचे विचार अंधारात प्रकाशाचा उजेड शोधत असणाऱ्या समाजाच्या तळागाळापर्यंत गेला. 

        समाज क्रांती झाली एकही रक्ताच्या थेंब जमिनीवर येऊ न देता ही क्रांती झाली. आज आपण हरवलेली वाट नाही. आज आपण प्रगतीच्या दिशेने चाललेली वाट आहे.  
    बाबासाहेबांच्या सकारात्मक विचारसरणीवर आज समाज विकास प्रवाहात आपल्या प्रवास ध्येयापर्यंत पोहोचत आहे.                 काव्यसंग्रह त्यांच्या त्या प्रवासाचा त्यांच्या त्या संघर्षाला शब्दात थोडाफार व्यक्त करण्याचा प्रयत्न. चुकल्यास माफी असावी. कारण मी फक्त त्यांचे विचार त्यांचे कार्य काव्यामध्ये गुंफण्याचा प्रयत्न करीत आहे.
        "उजेडातील प्रकाश",एक विचारधारा समानतेची...! हा काव्यसंग्रह बाबासाहेबांच्या विचारधारेवर आधारित आहे.
                           
 *** दोन शब्द काव्यसंग्रहाबद्दल ***

        "उजेडातील प्रकाश", हा काव्यसंग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित आहे. डॉ. बाबासाहेब नसते तर अस्पृश्य समाज आजही अस्पृश्य असतात. समता,न्याय,बंधुत्व, स्वातंत्र्य व शिक्षण यासारखे कितीतरी शब्द आपल्या वाटेला आले नसते.            आजही आपल्याला दलित हा शब्द वापरला जातो.वंचित समाज हा शब्द वापरला जातो. हे शब्द का वापरले जातात माहित नाही? आज अस्पृश्य समाज त्या सर्व पदांवर जाऊन पोहोचला आहे तिथे जाणे कधी स्वप्नातही विचार केला नसेल.
       आज आपल्याजवळ सर्व काही आहे आणि हे सर्व असण्याचे श्रेय फक्त "डॉ. बाबासाहेब आंबेडकर," यांना जाते. त्यांनी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून शिक्षणाचा वसा घेतला. त्या सर्व ज्ञानाचा उपयोग बाबासाहेबांनी आपल्या समाजाच्या उत्क्रांतीसाठी लावला.
        समाजाच्या प्रगतीसाठी  विकासासाठी सतत धावणारे बाबासाहेब आपल्या मध्ये नसले तरी त्यांचे विचार हे आपली शिदोरी आहे. जन्माची ती कधीही संपणार नाही. इतकी मोठी शिदोरी बाबासाहेबांनी आपल्याला दिली आहे.          आज रूढी, प्रथा, परंपरा, अनिष्ट चालीरीती या पिंजऱ्यातून आपली सुटका झाली आहे. आधुनिक विचारसरणीचा धम्म आपल्याला दिला. बाबासाहेबांचे ऋण कधीही आपण फेडू शकत नाही.आणि ते कोणी फेडण्याचा प्रयत्नही करू नये.
        डॉ. बाबासाहेबांचे विचार अंधाकारांमध्ये प्रकाशाची ज्योत आहे. दिव्याचा प्रकाश आहे. सूर्याचा उदय आहे. पौर्णिमेचा चंद्र आहे. प्रकाशित तारांचा प्रकाश आहे. बाबासाहेब अथांग महासागराचे पाणी आहे. महासागराच्या आत काय असते किती विश्व असते हे अजून पर्यंत संशोधकांना माहित पडले नाही तसेच बाबासाहेबांचे विचार त्यांच्या विचारांना कुणीही संपूर्णपणे ओळखू शकले नाही.
         संविधानात कितीही संशोधन झाले तरी संविधान बदलू शकले नाही. संविधान हा भारताचा मूळ पाया लोकशाहीच.
बाबासाहेबांची संपूर्ण ज्ञान तिथेच एकवटले असावे. असे कधी कधी वाटून जाते.
        माझ्या बालबुद्धीला समजेल इतके शब्द मी वापरत आहे. कारण बाबासाहेब एका शब्दात किंवा काही शब्दात मांडावे इतके बाबासाहेब अजून मलाही समजले नाही. कारण बाबासाहेब माझ्या बाबांचे ही बाबा होते माझ्या आजोबांचेही बाबा होती आणि माझेही बाबा आहे. बाबा हा शब्द खूप मोठा असतो तो कोणत्या शब्दात पूर्णपणे मांडता येत नाही. तरीही माझ्या परीने बाबासाहेब सतत मांडत असते. सांगत असते त्यांच्याबद्दल लिहीत असते. त्यांचे विचार माझ्या विचारांना बळ देतात. आत्मविश्वास देतात.
         आज मी जे आहे ते फक्त बाबासाहेबांमुळे. हे मी कधीही विसरत नाही आणि मी कधी कुणाला विसरून देणार नाही. कारण बाबासाहेबांचा संघर्ष हा त्यांचा वैयक्तिक संघर्ष नव्हता. तर तो संपूर्ण समाजासाठी संघर्ष होता. त्यांनी दिलेल्या वाटेवर आज आपण चालत आहोत.
        अन्न वस्त्र निवारा शिक्षण सुरक्षा आर्थिक सामाजिक शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक वारसा त्यांनी आपल्याला दिला. काळा परत्वे आपल्यातही बदल झालेला आहे. पण बाबासाहेबांच्या विचार तो बदल कधीच जाणवत नाही .असे वाटते, बाबासाहेबांचे विचार काल-परवा बाबासाहेबांनी लिहून आपल्याला दिले असावे. इतकी स्पष्टता त्यांचे विचारांमध्ये आहे.            ही स्पष्टता लोकशाहीला जिवंत ठेवण्याचे एकमेव कारण आहे. बदल कितीही झाले तरी लोकशाहीच्या आधार स्तंभाला बदलू शकत नाही.हलवू शकत नाही.
          बाबासाहेबांचे विचार सतत मार्गदर्शन करीत असतात. सकारात्मक विचारसरणीकडे घेऊन जातात. बाबासाहेबांचे विचार  टवटवीत फुलांसारखे आहे. गाव कुशाबाहेरील पिंजरा आता हरवला आहे. हे श्रेय फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे.  
"उजेड्यातील प्रकाश", एक विचारधारा समानतेची...! हे या काव्यसंग्रह नाव.
(Light in Ujeja", an ideology of equality...! is the name of this anthology.)
                      बाबासाहेबांनी त्या अंधारात उजेड केला जो अंधार वर्षानुवर्ष आपल्याला बांधून ठेवत होता. कारणे कितीही असले तरी सत्य हे कधी नाकारता येत नाही. समाज परिवर्तन हे बाबासाहेबांच्या विचारांमुळे आपल्यामध्ये झाले.
        बाबासाहेब त्या अंधारातील उजेडाचा प्रकाश झाले आणि तो प्रकाश आजही प्रकाशित आहे. त्या प्रकाशाला समर्पित हा माझा काव्यसंग्रह." उजेडातील प्रकाश ,एक विचारधारा समानतेची "
(Light in Ujeja", an ideology of equality...! is the name of this anthology.)

=============================

        ***अनुक्रमणिका ***

1. मला मिळाले बाबासाहेब
2. दिशा दिली
3. देवदूत झाला नाही
4. परिवर्तनाची वाट जिंकलेली
5. महामानव
6. जगण्याचा मार्ग
7. सांगून गेले
8. जगण्याचा महामार्ग आहे
9. जय भीम ओळख
10. उचलली लेखणी म्हणून
11. अजून तरी
12. माझे बाबासाहेब
13. भीम माझा कसा होता
14. बाबासाहेब
15. आरक्षणच नाही रे
16. लढा
17. माय सावली
18. जय भीम मित्रा
19. बाबासाहेब
20. झोपडी 
21.बाबासाहेब निळा रक्ताचे वादळ 
22.माझी रमाई 
23.संपूर्ण गणित 
24.माझे संविधान 
25.क्रांतीचा मंच बाबासाहेब 
26.जात 
27.मलाही लिहिता येते
28. पाणी 
29.शिकवायचे 
30. पात्रता 
31. तुम्ही दिलेल्या तत्त्वज्ञानामुळे 
32. हे अथांग महासागरा 
33. सूर्योदय 
34. भेटले मला 
35. माझा भीमराव 
36. पुसू शकत नाही
37.  कोहिनूर हिरा माझा भीमराव 
38. परिवर्तनाची तूच कविता 
39. धम्मपरिवर्तन 
40. माझ्या भिमाईने 

***Index***





 1. I got Babasaheb
 2. Given direction
 3. An angel did not become
 4. The path to change is won
 5. The great man
 6. Way of living
 7. Having said that
 8. There is a highway of survival
 9. Jai Bhima Identity
 10. As a lifted pen
 11. Still
 12. My Babasaheb
 13. How Bhima was mine
 14. Babasaheb
 15. No reservation
 16. Fight
 17. My Shadow
 18. Jai Bhima Mitra
 19. Babasaheb
 20. Hut
 21. Babasaheb blue blood storm
 22. Majhi ramai
 23. Complete Mathematics
 24. My constitution
 25. Platform of revolution Babasaheb
 26. Caste
 27. I can write too
 28. Water
 29. To teach
 30. Eligibility
 31. Because of the philosophy you             have given
 32. O vast oceans
 33. Sunrise
 34. Met me
 35. My Bhimrao
 36. Can't wipe
 37. Kohinoor Hira Maja Bhimrao
 38. You are the poet of                     transformatio
39. Conversion of Dhamma
40. By my Bhimai


............................................................

1.

         डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझे गुरु, माझे मार्गदर्शक आणि माझे अस्तित्व. जन्माने बाबासाहेब मिळाले नसते तर कदाचित आज जे शब्द लिहीत आहे ते कधीही माझ्या वाटेला आले नसते.
               कारण शिक्षणच मिळाले नसते तर नंतरची कल्पनाही करू शकत नाही. म्हणून मला अभिमान आहे मी जय भीम असल्याचा. मला अभिमान आहे,बाबासाहेबांची मुलगी असण्याचा. 
         मी त्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो ज्या समाजाने वर्षानुवर्ष अस्पृश्यतेचा छळ सहन केला. बाबासाहेबांनी समाज क्रांती केली नसते तर ते सर्व आमच्याही वाटेला आले असते पण आमच्या वाटेला बाबासाहेब आले आणि परिवर्तन झाले.
               याच आशाय संदर्भातून ही कविता. कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

*** मला मिळाले बाबासाहेब ***

मला मिळाले बाबासाहेब
पुस्तकात सविस्तरपणे 
त्याआधी....
माझ्या घरात 
त्यानंतर..... 
माझ्या मनात 

मला मिळाले बाबासाहेब 
समाजातील प्रत्येक 
नियमांमध्ये ....
स्वतंत्र अस्तित्व ठेवून 

मला मिळाले बाबासाहेब 
घराघरात गुण्यागोविंदाने 
हातात हात घालून 
समानतेचा ......
वाऱ्यासोबत 

मला मिळाले बाबासाहेब 
संविधानाच्या प्रत्येक शब्दाशब्दात 
पानोपानी.....
आपले स्वतंत्र अस्तित्व 
अखंडित ठेवत 
विषमतेला दूर करीत 
लोकशाहीचा आधारस्तंभ होत 

मला मिळाले बाबासाहेब 
त्या प्रत्येक कानाकोपऱ्यात 
त्या प्रत्येक जीवसृष्टीत 
तिथे नांदत आहे 
लोकशाही संविधानाची 
माझ्या बाबासाहेबांची......!!

      ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .💖

=============================
2.
 
       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य कोणत्याही विशिष्ट एका सुधारणेमध्ये बांधून ठेवू शकत नाही किंवा विशिष्ट समाजापुरते बांधून ठेवू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाची गुरुकिल्ली..!! त्यांचे विचार हे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रेरणा देतात.                  
       माणसाने माणूस म्हणून जगावे यासाठी त्यांनी संविधानात सर्व अधिकार दिलेले आहे. त्याच भावविश्वातून ही कविता आहे. कविता स्वरचित व स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


.....दिशा दिली.... 

बाबासाहेब तुम्ही दिशा दिली 
आम्ही चालता आहो 
प्रगतीच्या पावलपावलांवर 
रस्ता सुखरूप होईल असे नाही 
संघर्ष अजूनही येतच आहे 
कधी आपलेच आपला संघर्षसाठी 
कारणीभूत तर कधी दुसरे 
तरीही चालत आहे 
तुम्ही दिलेल्या शिक्षण मार्गावरून 
चालता-चालता थकले तरी 
बळ मिळते तुम्ही केलेल्या 
अथक परिश्रमाने 
थांबतो ...
थोडावेळ;
ज्ञानाची शिदोरी घेऊन आणि परत 
भावनेच्या माणुसकीने संघर्षातून 
मार्ग काढत चालत राहतो 
तुम्ही दिलेल्या दिशेने 
संघर्ष येणारच या जाणिवेने 
पण शांत 
कारण बाबासाहेब तुम्ही दिलेली दिशा स्वप्नपूर्तीकडे जाते 
माणूस म्हणून जगण्यासाठी 
माणूस म्हणून जगण्यासाठी 
बाबासाहेब 
तुम्ही  दिशा दिली 
आम्ही चालत आहोत...!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- ***दिशा दिली***

           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

-------------------------------------
3.

        डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाज व्यवस्था बदलून टाकले पण त्या समाजाचा देवदूत झाला नाही, तर मार्गदाता झाले. संविधान निर्माता झाले.
           बाबासाहेबांना देव बनता आले असते पण ते माणसाला माणूस बनवण्याच्या या परिवर्तनाच्या वाटेवर स्वतः स्वतःला माणूस हरवू दिला नाही आणि इथेच बाबासाहेबांच्या निर्णय शक्तीवर अभिमान बाळगावा असे हे कार्य.                 बाबासाहेब ,"देवदूत झाला नाही" ही कविता याच भावविश्वातून कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

....देवदूत झाला नाही ....

तुझी उंची मोजावी असे 
तंत्रज्ञान नाही जगात 
तू दिले माणसातील माणुसकीला 
माणूसपण..... 
तू तरी देव झाला नाही 
तू मार्गदाता झाला 
वंचित पीडित समाजाच्या 
हक्काची जागा मिळवून दिली 
जगण्यासाठी, 
जगण्याच्या प्रत्येक पायरीवर 
स्वाभिमान जागा केला 
स्वाभिमान जागा करून दिला 
तरी तू देवदूत झाला नाही 
तू संविधान निर्माता झाला 
आमच्यासाठी....
तू मार्गदाता झाला आमच्यासाठी 
आयुष्यभरासाठी...
जीवनाच्या प्रत्येक लढाईसाठी 
जीवनाच्या प्रत्येक क्षणासाठी 
तुझी उंची मोजावी 
असे तंत्रज्ञान नाही जगात

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

शीर्षक :- *****  देवदूत झाला नाही  ****

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

--------------------------------------------------------------------------

4.
        डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जी लढाई चालू केली ती लढाई काही प्रमाणात जिंकलेलो आहोत. ज्या परिस्थितीत परिवर्तनाची वाट बाबासाहेबांनी सुरू केली ती परिस्थिती आता समाजमान्य नाही.
       इथे ही लढाई जिंकले. याच आशय संदर्भावर ही कविता. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कविता स्वरचित व स्वलिखित आहे.

**** परिवर्तनाची वाट जिंकलेली ***

आज नवी पहाट निळ्या रक्ताची 
अथांग सागराला कवेत घेण्याची
आम्ही गुलाम , बादशहा आजचे 
निळे आकाश होते फाटलेलेच 
आता लढाई आहे जिंकलेलीच
वादळ झुकले डोळ्यातील 
पाणीही सुकलेच लढाई 
जिंकता जिंकताच 
जातीपातीची समाजव्यवस्थाही हरलीच
शिका संघटित व्हा संघर्ष करा 
या मंत्रानीच आज गाथा 
तुझ्या जीवनप्रवासाची
आभाळाच्या सावलीची अडसर 
एकट्यानेच लढुन 
आम्हासाठी जिंकलीच 
पाण्यालाही खुले केले 
वादळाला पायदळीच तुडवून, 
साधे सोपे नसलेले 
आयुष्यही तूच केले 
कौतुकास्पद भवितव्याचे 
त्रिशुलाच्या टोकावर 
लेखणी संविधानाची 
अंधश्रद्धेच्या उपवासाला 
खाऊ पंचशीलचे 
ज्ञानसागरा मार्गदाता 
अंगणात बोधिवृक्षाच्या अभिमानाच्या.....
स्वाभिमानाच्या कोहिनूर तूच !!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

शीर्षक :- ** परिवर्तनाची वाट जिंकलेली **


       
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

             

=====!=!=!!!====================

5.
          डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंचितांना आणि दीनदलित दुबळ्या समाजाला मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या संघर्षाला शब्दात मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न..! चुकल्यास माफी असावी. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद...!!

....महामानव ....

बाबासाहेब 
वादळाला शमविणारी धारदार 
तलवार आहे तू 
बाबासाहेब 
चांदण्यांच्या नक्षिकामावरील 
चमचमता तारा आहेस तू 
बाबासाहेब 
वेदनेवर हळूच 
फुंकार 
आहे तू 
बाबासाहेब 
मायेची ऊबदार 
शाल आहे 
तूच 
बाबासाहेब 
जगण्याची नवी पहाट 
आहे तू 
वंचितांना आवाज देणारी 
आवाज आहे तू... 
रिकाम्या पोटाला 
समता बंधुत्व न्याय 
देणारा महामानव 
आहेस तू 
महामानव 
आहेस तू...!!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- *****   महामानव ....****

       
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
=========!=!!!=!!!!!=========!!!!========================!!!=======
6.
         डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समाज व्यवस्थेसाठी काय आहे हे सांगण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न...! बाबासाहेबांचे कार्य हे कोणत्याही विशिष्ट चाकोरीबद्ध करता येत नाही म्हणून जीवनाच्या प्रत्येक मार्गावर त्यांचे विचार हे आपला जीवन प्रवासामध्ये तंतोतंत आजही जुळतात.

       कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद..!!❤

.....जगण्याचा मार्ग......

जगण्याच्या मार्गावर तू 
श्वास दिले 
तहानलेल्या जीवाला तू 
पंख दिले 
रिकाम्या पोटाला तू 
(घास)अन्न दिले 
सोबत अक्षरांची शिदोरी 
प्रगतीच्या मार्गावर 
एक एक पाऊल 
उंचावण्यासाठी 
आम्हा जीवनाचा मार्ग सोपी 
होण्यासाठी 
पाखरांना पंख दिले 
उडण्यासाठी 
संघर्षाच्या लाटेवर ज्योत 
माझी तूच आहे 
अखंडित 
जीवनाच्या संघर्ष यात्रेतील 
इंद्रधनुष्याच्या साक्षीने 
बाबासाहेब....!!!!



©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- *****  .जगण्याचा मार्ग......*****

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

======!!!!!!!!======!!!!!!!=======!!!!!!=====================!!!!=======
7.
       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे योगदान त्यांच्या कार्यातून केले ते आजही त्यांच्या लेखणीमुळे समाजात अजूनही तंतोतंत लागू पडते. वंचित समाज हा गुलाम नसून शूद्र नसून ते शूरवीर वंशजांचे उत्तराधिकारी आहे. हा इतिहास आहे. 
             कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद..!!


....सांगून गेले....

आम्ही शूरवीर वंशजांचे 
सांगून गेले बाबासाहेब 
माहीत नव्हते ते 
दाखवून गेले 
लेखणी बाबांची चालत 
राहिली अन्यायाविरुद्ध 
गुलामीची जाणीव 
नसलेल्या वंचितांना 
संविधान दिले 
समानतेचे वारे चोहीकडे 
वाहते केले 
आम्ही वंचित बहुजन 
वंशज शूरवीरांचे 
सांगून गेले 
सांगून गेले 
ते अक्षरांचे महत्व
शिक्षणाची दोर देऊन 
गेले...
आम्ही शूरवीर वंशाचे 
सांगून गेले...!!


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

शीर्षक :- *****  .सांगून गेले........*****

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
===============================!==!==!=!=!=!=!=!===============

8.
        डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमच्या गळ्यातील ताईत का आहेत.... हा सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न.
       आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चूक आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद..!!
       कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.

....जगण्याच्या महामार्ग आहे..  .


आम्ही आता चालत आहो
तुम्ही जबाबदारी घेत 
राहिले म्हणून 
तुम्ही इतिहास बदलला 
आम्ही तो इतिहास 
बदलू नये म्हणून प्रयत्न 
करत आहो 
कहानी तुमची संघर्षाची 
कहानी आमची त्या 
संघर्षाला जागे ठेवण्याची 
फक्त आम्हासाठी आम्ही कोण 
आहोत हे न विसरण्यासाठी    
धुळीतील कणाही नव्हतो 
आम्ही 
आज तुझ्यामुळे 
घरदार गाडी बंगले झाले 
शिक्षणाचे नवनवीन दार 
उघडले पुस्तकांच्या अक्षरांबरोबर 
मैत्री केली 
तुम्ही आमचा
स्वाभिमान आहे 
अभिमान आहे 
सन्मान आहे 
वादळाला रोखणारी शक्तिशाली 
आवाज आहे 
जगण्याच्या मार्गावरील 
महामार्ग आहे 
जगण्याच्या महामार्ग आहे


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :-  ...... जगण्याच्या महामार्ग आहे.....

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

==========================================================
9.

          डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाज व्यवस्था बदलले. खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तनाला सुरुवात झाली. धर्मांतर हा त्यातीलच एक भाग..! धर्मांतराने एक नवीन ओळख मिळाली. कविता स्वलिखीत व स्वरचित आहे.
       आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या येण्याची जाणीव हे तुमचे मत आहे... धन्यवाद..!!


**** जयभीम ओळख ****

बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले 
वंचितांना स्वाभिमान दिला 
हक्काचा सन्मान 
आम्हाला जगण्याचा 
माणूस म्हणून ...

आकाशाला कवेत घेत 
दाखवून दिले 
जयभीम नावाच्या शक्तीची 
शक्ती......

वादळ अनेक 
तरी उभे आम्ही आमच्या 
पायावरती  
दिलेल्या अभिमानाने 
संघर्ष अजून संपला नाही 
संघर्षाच्या पायवाटेवर 
चालता आहो 
आम्ही त्याच
शक्तीने

माणसाला माणसासारखी 
ओळख दिली 
आता 
तीच ओळख जयभीम 
वाली झाली 
आता तीच ओळख 
जयभीम वाली झाली
आम्हाची...!!!

     ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

शीर्षक :-  ......जयभीम ओळख .....

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

==========================================================

10 .    
         डॉक्टर बाबासाहेब यांनी समाज परिवर्तन करून सर्वात मोठी क्रांती केली आणि ती क्रांती शिक्षणाच्या जोरावर केली. त्यांनी केलेल्या क्रांतीमुळे आज आमचे जीवन मधील संपूर्ण बहुजन समाजाचे जीवन सुखमय करून टाकले. शिक्षणाचे महत्त्व त्यांनी जनसामान्यांमध्ये रुजविली.

       कविता स्वरचित व स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे मत नक्की कळवा. धन्यवाद!!


....उचलली लेखणी म्हणून....

नवयुगाच्या नवीन पायरीवरती 
आधार शोधावा लागत नाही 
आनंद शोधावा लागत नाही 
कुठेही थांबावे लागत नाही 
कोणत्याही नारेबाजीला बळी 
पडावे लागत नाही 
कारण तू दिला आम्हामध्ये 
आत्मविश्वास......

बहर आला जीवन प्रवासाला 
पुस्तकांच्या मैत्रिणी 
आयुष्याला दिशा दिली 
तुमच्या कष्टमय जीवनाने 
आमच्या 
आजच्या आयुष्याला 

तु लेखणी उचलली 
वर्गाबाहेर राहून म्हणून 
आज आम्ही उचलली 
लेखणी वर्गात राहू 
सन्मानाने 
आयुष्य प्रवाह सुरळीत झाला 
तुमच्या त्या खडतर 
प्रवासाने 
उघडलेल्या पुस्तकमय 
जगामुळे....
तुम्ही दिलेल्या शिकवणीमुळे...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

शीर्षक :-  ...... उचलली लेखणी म्हणून .....

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
=====================================!!!!!!!!!!!!!========!=!!!!===!!=

11.


आज एका विशिष्ट विचारसरणीला इतका महत्त्व दिले जात आहे की ती विचारसरणी समाजमान्य होईल का अशी भीती राहून राहून मनात येते. तेव्हा एक सशक्त विचार माझ्यासमोर येते तो म्हणजे ,"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" आणि तेव्हाच आत्मविश्वास निर्माण होते.
     अजूनतरी आम्ही विसरलो नाही आमच्यावरील झालेला अन्याय त्याच विचारसरणीमुळे. याच भावविश्वातून ही कविता रचलेली आहे. कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित व स्वरचित आहे. काही चुका झाल्या असल्यास नक्की कळवा.


....अजूनतरी....

समानतेच्या वाऱ्यामध्ये 
चालू झाले नवीन 
चाटूकारिता.... 
अंधश्रद्धा जातीभेद अविश्वास 
भ्रष्टाचाराचे नवीन अन्यायाचे 
नवीन फार्मूले नवीन वायरससारखी 

नवीन समाजव्यवस्थेच्या नावाखाली 
चिरडली जात आहे माणुसकी 
शोषण आणि असमानतेच्या 
वृक्षाला देऊ पाहत आहे 
नवीन व्याख्या जगण्याची 
नवीन घोषणा नवीन नारे 

पण विसरलो नाही अजूनही 
मडक आणि खराटा 
गाव कुशाबाहेरील जिवंत पण 
मरणयातना शूद्रत्वाचे 

विसरलो नाही अजूनतरी 
बाबासाहेब, बाबासाहेबांचे संविधान  बाबासाहेबांची शिकवण....
समानतेच्या वाऱ्यामध्ये चालू आहे 
नवीन चाटूकरिता..!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

शीर्षक :-.........अजूनतरी....

         आपल्या येण्याची जाणीव आपली प्रतिक्रिया आहे. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा..! धन्यवाद.

======≠==!!!¡!!!============!!!!!!!!!!!!!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
12.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांती एका विशिष्ट समाजापुरते नसून संपूर्ण मानवजातीसाठी आहे,अस्तित्वासाठी आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी आहे. भारतीय इतिहासात आणि जागतिक इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. 

 **  विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन विनम्र अभिवादन..!! **

   
 ** माझे बाबासाहेब **

चवदार तळ्याचा सत्याग्रह 
म्हणजे पाण्याचा हक्क नव्हे 
तर मानवी विकासाची 
एक नवीन चळवळ 
आयुष्य जगण्याची 

अज्ञानावर मात म्हणजे 
शिक्षण क्रांती 
मानवी विकासाची पायामुळे 
एक नवीन इतिहास 
जातीपातीच्या 
समाजात... 

संविधान निर्माता 
हक्क देऊन समानतेचे 
नव जाणिवेचे वटवृक्ष 
लाविले आणि सोडून गेले 

आम्हास खंबीर करून 
सहा डिसेंबर रोजी 
आम्हाला पोरके करून 
डोळ्यात अश्रूचा 
महासागर देऊन...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

शीर्षक :-........ माझे बाबासाहेब  ......

         आपल्या येण्याची जाणीव आपली प्रतिक्रिया आहे. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा..! धन्यवाद.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

13.

         डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे वर्णन कोणत्याही शब्दात परिपूर्णपणे मांडता येत नाही. तरी हा छोटासा प्रयत्न. कविता स्वलिखित स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

---भीम माझा कसा होता ---

काय सांगू तुम्हाला 
भीम माझा कसा होता 
अज्ञानी दगडाला ज्ञानगंगेच्या प्रवाहामध्ये 
नेणारा महाझरा होता
भीम माझा कसा होता 
चंद्राची शीतलता, सूर्याची प्रखरता 
समानतेचा वारा होता 
भीम माझा कसा होता
भुकेलेला अन्न देणारा महाशक्तिमान होता 
भीम माझा कसा होता 
रूढी प्रथा परंपरेला मूठमाती देणारा 
नवविश्व निर्माता होता 
भीम माझा कसा होता
भारताला संविधान देणारा 
महाज्ञानसाठा होता 
भीम माझा कसा होता 
मनुवादी विचारवंतांना जागेपणी 
पडलेले स्वप्न होता 
भीम माझा  बुद्ध कबीर फुले 
यांच्या विचारांना पुर्वलोकन करणारा 
महान विचारवंत होता
भिम माझा प्रज्ञेचे शिखर होता
भीम माझा ज्ञानाचा महासागर होता 
भीम माझा दीनदलित समाजाला 
बुद्ध धम्माकडे नेणारा सूर्य होता 
भीम माझा असा होता!! 


✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

शीर्षक :-.......भीम माझा कसा होता .....

         आपल्या येण्याची जाणीव आपली प्रतिक्रिया आहे. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा..! धन्यवाद.

 ============================
14.

      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञानाच्या जोरावर जमिनीमध्ये नवीन बीज रोवले आणि एकही रक्ताच्या थेंब न सांडवीत धम्मक्रांती केली.
      कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!
  

**बाबासाहेब **

मानवाला मानव म्हणून जगण्याची 
जगातील सर्वात मोठी धम्मक्रांती 
घडवून आणली ज्ञानाची ज्योत पेटवून

असमानतेच्या विचारात पेरले 
नव विकासाचे बीज 
ज्ञानाच्या जोरावर क्रांतीचे वादळ 
घडवून आणले संघर्षावर मात करीत

अखंड दिवाचा प्रकाश 
संपूर्ण जगाला दाखवून दिला 
ज्ञानाच्या भरारीने 
विकासाचा तळपता सूर्य ठरला 
घडवून आणली
एकही थेंब न सांडविता धम्मक्रांती

रूढी प्रथेच्या नावावर 
अंधश्रद्धेच्या महापुरात  
धर्मांतराने घडविला इतिहास 
संघर्षाला मात केली 
प्रज्ञा शील करुणा मैत्री तत्त्वाने

विचारांचे परिवर्तन घडवून 
नवपेरणी केलीस बुद्ध विचाराने 
गंजलेल्या शोषित विचारांमधील
गुलाम मोकळा झाला धर्मांतराने
ज्ञानाच्या जोरावर 
समानतेच्या जोरावर
संविधानाच्या जोरावर..!!!


✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

शीर्षक :-  .....बाबासाहेब .....

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

==========================================================

15.

     बाबासाहेबांनी सामाजिक क्रांती केली आणि अस्पृश्य समाज समाजामध्ये अभिमानाने जगू लागला प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांच्या मार्ग विचार मार्गावर चालत उच्च पदांपर्यंत समाज गेलेला आहे कविता स्वरचित स्वलिखित आहे आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद...!!

****आरक्षणच नाही रे ***

बाबासाहेबा ज्ञानाच्या महासागरात 
पोहत राहिले श्वासाच्या 
प्रत्येक श्वासातून 
शिक्षण घेत अभ्यासाची आवड मनी धरून कठीण कठीण संघर्षाला 
पायदळी तुडवीत
फार कष्ट घेतले 
बाबासाहेबांनी पदांच्या अधिकाऱ्यांना 
हातात घेण्यासाठी 
नाही फक्त आरक्षणाचा उपयोग राजा 
बेधुंद होऊन जगलो 
बाबासाहेबांच्या ज्ञान महासागरातील 
एक थेंब होऊन 
बाबासाहेबांच्या शब्दांसोबत 
फक्त सवलती नाही 
आहे यात घाम माझ्या वर्गाबाहेर 
शिक्षण घेणाऱ्या बाबासाहेबांचे 
एक पाव एक चहा घेऊन 
संविधानाची निर्मिती करणाऱ्या 
माझ्या महामानवाचे 
दीनदलितांचे उद्धार कर्त्याचे संविधान
हाडाचे पाणी करणाऱ्या माझ्या 
महामानवाचे 
आमची प्रगती त्या कष्टाचे फळ आहे 
आरक्षणच नाही रे,
बाबासाहेबांच्या विचार वटवृक्षावर 
चालण्याच्या या थोड्याफार 
प्रयत्नांचे;फक्त आरक्षण नाही रे 
चल उठ... 
तू ही या वटवृक्षाच्या सावली 
विसावा घे ...
या ज्ञानाच्या महासागरात एक 
थेंब होऊन एक थेंब होऊन
फक्त आरक्षण नाही रे...!! 

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

शीर्षक :-  .... आरक्षणाच नाही रे .....

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
==========================================================
16.
     बाबासाहेबांनी त्या वर्णव्यवस्थेविरुद्ध लढा पुकारला ती वर्णव्यवस्था समाज व्यवस्थेचा अतिशय महत्त्वाचा भाग होता.
 बाबासाहेब म्हणतात," मी अशा समाजाचे प्रतिनिधित्व करतो.जे गुलामाचे गुलाम आहे. म्हणून देश स्वतंत्र होण्याच्या आधी सामाजिक स्वातंत्र्य मिळणे महत्त्वाचे आहे. हा लढा सामाजिक स्वातंत्र्याचा होता. हा लढा त्या वर्णव्यवस्थेविरुद्ध होता, ज्या वर्ण व्यवस्थेने समाजातला खूप मोठा भाग स्वतःच्या स्वार्थासाठी गुलाम करून ठेवलेला होता त्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांपासून वंचित ठेवले होते."                 याच पार्श्वभूमीवर ही कविता. कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित व स्वरचित आहे.

      *** लढा ***

मानवतेच्या लढासाठी बाबासाहेब 
लढले जातीयतेच्या महासागरात 
बुद्ध वसविला 
जगण्याच्या या पायवाटेवर 
नवा मळा वसविला 

समानतेचा मळा फुलविला 
विषमतेवर घाव घालून 
लढा हा मानवतेचा 
मानवी अस्तित्वाचा 

खडतर वाटा, वाटा खडतर 
प्रवास वेशीबाहेरील उंबरठ्यातील 
ढा नसे हा फक्त वेशीबाहेरील
लढा हा निसर्ग नियमांचा असे 
स्त्री ही गुलाम...
अस्तित्वाच्या लढाईत 
श्रेष्ठ असे प्राणीजात 

अहंकार न असे हा 
असे लढा स्वाभिमानाचा 
असे लढा हा अभिमानाचा 
मानवतेच्या लढ्यासाठी 
बाबासाहेब लढले 
जातीयतेच्या महासागरात....!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

शीर्षक :-  .... लढा .....

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
==========================================================
17.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य विशिष्ट एका क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते. त्यांच्या कार्यक्षेत्राचे मुख्य उद्देश माणूस हा होता.                       कोणत्याही भेदभाव न करता बाबासाहेबांनी खुले विचारसरणी समाजामध्ये रुढ केली. बाबासाहेबांच्या नावात सकारात्मक विचारसरणी आहे. त्यामुळे त्यांचे नाव मानाने सगळीकडे घेतले जाते.
          याच विषयाशी संबंधित कविता ,"मायसावली", माझ्या बाबाचे नाव......
 कविता स्वरचित व स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.....!!!

** मायसावली *** 

माझ्या बाबाचे नाव मनामनात 
कणाकणात 
माझ्या बाबाचे नाव नसानसात 
श्वासाश्वासात
माझ्या बाबाचे नाव साऱ्या देशात 
संपूर्ण जगात 
माझ्या बाबाचे नाव गाडी घरात 
बंगल्यावरती 
माझ्या बाबाचे विचार प्रगती 
प्रवाह धारेत 
माझ्या बाबाचे शब्द संघर्षावर मात 
करणारी धारधार तलवार 
माझ्या बाबाची लेखणी बंदिस्त 
विचारांवर प्रहार करणारी मुक्त 
विचारसरणी 
माझ्या बाबाचा रुबाब सारा 
माना झुकवी आदराने 
माझ्या बाबाचे नाव जगात 
एकच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिमानाने स्वाभिमानाने सन्मानाने मानाने 
समतेने उंचआकाशी झेप घेई
माझ्या बाबांचे नाव जगण्याच्या वाटेवर 
प्रेमळ मायसावली प्रेमळ मायसावली

      ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

शीर्षक :-  ...... मायसावली .....

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------
-------------------------------------
18.
"जय भीम मित्रा ही कविता", स्वरचित आणि स्वलिखित आहे. जय भीम हा शब्द ओळख आहे माझी!
        माझ्या समाजाची जो समाज गाव कुशाबाहेर पिंजऱ्यात होता. बाबासाहेबांनी त्या पिंजराला जय भीम हा नारा समाजमान्य करण्यापर्यंत जो यशस्वी प्रयत्न केला त्या प्रयत्नाला एका शब्दात अभिमानाने स्वाभिमानाने सांगण्याचे काम हा शब्द करतो.              आज हा शब्द काही मानसिकतेला कमीपणाचेही वाटते पण जय भीम आम्ही का म्हणतो जय भीम या शब्दा मागची महिमा महत्त्व या छोट्याशा कवितेमध्ये सांगण्याचा हा प्रयत्न असावी.
        चुकलास माफी असावी. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

*** जय -भीम मित्रा ***

ओळख माझी जय भीम मित्रा 
लाज कसली अभिमान आहे मित्रा 
मी फिरतो चारचाकी घेऊन 
ताटात पंच पकवान मित्रा  
जय भीम मित्रा 

पोरग आय फोन घेऊन 
हातात लॅपटॉप,गळ्यात सोन्याची साखळी 
नवीन फॅशनचे सर्वच मित्रा 
जय भीम मित्रा 

निळा आकाशात मुक्त श्वासाची 
ओळख जय भीम मित्रा 
हातातील झाडूची मडक्याची 
न सोबत मित्रा  
आलिशान प्लाटचा मालक मित्रा 
जय भीम मित्रा 

म्हणूनच मग ताण पडू दे मित्रा 
माझ्यासोबत आवाज भिडू दे 
आसमंतात वाजू दे डीजे 
पांढरा शुभ्र वस्त्रासोबत 
निळा पताकांची झालर घेऊन बोल 
मित्रा जय भीम 
जय भीम मित्रा 

बाबासाहेब आवाज झाले मुक्यांचे 
बहिऱ्यांची ओळख झाले 
नारा गुंजू द्या आसमंतात 
बोल मित्रा 
जय भीम मित्रा 
जय भीम मित्रा

बेधुंदवाराच्या सोबतीने 
तना मना संचार करून घे 
ज्ञानाच्या या महासागरात 
एक डुबकी मारून घे 
पुस्तकांना जीवनात पहिले स्थान दे
आणि बोल मित्रा 
जय भीम मित्रा जय भीम मित्रा

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

शीर्षक :-  .......जय भीम मित्रा .......

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
-------------------------------------------------------------------------
19. 
           बाबासाहेबांनी जी क्रांती केली ती शब्दात वर्णन करू शकत नाही. तरी हा छोटासा प्रयत्न आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
        कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.

*****  बाबासाहेब ********

बाबासाहेब तुम्ही क्रांती 
समानतेची सदैव 
सूर्य तेजाच्या किरणांची 

बाबासाहेब तुम्ही वादळ 
विषमतेच्या ✍️लढाईत प्रेरणास्त्रोत 
क्रांतीची मशाल 
जीवन कला शिकविणारी 

बाबासाहेब तुम्ही बीजे 
पेरली शिक्षणाची 
अंधश्रद्धेच्या गाण्यात 
श्रद्धेचे गाणे सुरासहित 
आदर्श विकासाचा 
अवघड परिस्थितीत 
दिले आम्हा प्रोत्साहन 
ताठ मानेने जगण्याची 

बाबासाहेब तुम्ही प्रकाशाची 
ज्योत आशा-आकांक्षा 
इच्छा पूर्ण करणारे वटवृक्ष 

बाबासाहेब तुम्ही 
शिक्षणाची,समानतेची,न्यायाची 
संघर्षाची यशोगाथा 
भारतीय संविधानापर्यंत आणि 
आजपर्यंतच्या प्रवासाची 

बाबासाहेब तुम्ही दाखविला 
मार्ग बुद्ध धम्माचा... 
बुद्ध शिकवण झाली 
मार्गदाता आयुष्याची !!!

       ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  **** बाबासाहेब ****

             अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


--------------------------------------------------------------------------
20.



         समाजव्यवस्था बदलत आहे. जिथे गरीबी हटाव हा नारा होता, आता तो कुठेतरी मागे पडत चाललेला आहे.
          गरीब अधिक गरीब होत आहे. हातावर पोट असणाऱ्या समाजाकडे दुर्लक्ष होत आहे. समानतेच्या लढाईमध्ये विषमतेची दरी वाढत आहे.
             याच पार्श्वभूमीवर ,"झोपडी" कविता. कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.कविता स्वरचित आणि स्वलिखित आहे.
 
*** झोपडी ***

चार भिंतीच्या झोपडीत 
कोपर्‍यात लावलेली मिणमिणत 
असलेली मेणबत्ती 
खुणावत होती प्रकाशाची चाहूल 
ज्ञान प्रकाशाकडे...

वाट चालावी तशी उंबऱ्यावरील 
पाणी आत येऊ नये म्हणून 
शोधावी लागत होती त्याच
गटर नाल्यातील दगड 
विटा प्लास्टिक 
हातात बळ एकवटून 
ज्ञान प्रकाशाकडे जातांना!!!

      ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

                  शीर्षक:- *** झोपडी***

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

--------------------------------------------------------------------------
21.
       डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या समाज व्यवस्थेविरुद्ध विरोध केला ज्या समाजाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार नाकारले. एका विशिष्ट धर्मापुरते किंवा विशिष्ट वर्गापुरती लढाई नव्हती. मानसिक ते विरुद्ध लढाई होती  जे मानसिकता गुलामगिरीकडे नेणारी होती.
        बाबासाहेबांनी ती लढाई जिंकली. समाज क्रांती केली. समाजामध्ये एक निळ वादळ निर्माण केले. पाणी खुले केले.... अंधश्रद्धेला पायदळी तुडविले ......याच आशाय संदर्भातून ही कविता. कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कविता स्वलिखित व स्वरचित आहे.

*** बाबासाहेब निळा रक्ताचे वादळ ***

आज नवी पहाट निळ्या रक्ताची 
अथांग सागराला कवेत घेण्याची
आम्ही गुलाम , बादशहा आजचे 
निळे आकाश होते फाटलेलेच 
आता लढाई आहे जिंकलेलीच
वादळ झुकले डोळ्यातील 
पाणीही सुकलेच

लढाई  जिंकता जिंकताच 
जातीपातीची समाजव्यवस्थाही हरलीच
शिका संघटित व्हा संघर्ष करा 
या मंत्रानीच ...!
आज गाथा तुझ्या जीवनप्रवासाची
आभाळाच्या सावलीची अडसर एकट्यानेच 

आम्हासाठी लढाई जिंकलीच
पाण्यालाही खुले केले 
वादळाला पायदळीच तुडवून, 
साधे सोपे नसलेले 
आयुष्यही तूच केले कौतुकास्पद 
भवितव्याचे 
त्रिशुलाच्या टोकावर लेखणी संविधानाची अंधश्रद्धेच्या उपवासाला खाऊ 
पंचशीलचे 
ज्ञानसागरा मार्गदाता अंगणात 
बोधिवृक्षाच्या अभिमानाच्या.....
स्वाभिमानाच्या कोहिनूर तूच !!! 

      ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

शीर्षक :- ** बाबासाहेब निळा रक्ताचे वादळ **

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
--------------------------------------------------------------------------
22.
          डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासात रमाबाई भीमराव आंबेडकर म्हणजेच आपल्या रमाई यांची सोबत जर लाभली नसती तर बाबासाहेब इतक्या बिनधास्त पद्धतीने समाजकार्यात आपले योगदान देऊ शकले नसते.
            रमाबाईंनी घर संसार चालविला. वेळ पडली तेव्हा त्यांच्या पुस्तकांसाठी पैसे सुद्धा पाठविले. बाबासाहेबांच्या जीवनात रमाबाईंचे योगदान खूप मोठे आहे.
      कविता स्वलिखित  आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

**** माझी रमाई ****

अपार कष्ट करुनी झिजली 
माय रमाई आम्हासाठीच
भिमाचा संसार प्रवास ओढीत
बौद्धिक- मानसिक शक्तीप्रतिमा... 
भिमाची!!!

आयुष्याचा प्रवास 
खडतर 
एका वस्त्रानिशी... सोबत; उपाशीपोटी 
काटेवरती चालती....
सुसंस्कृत माझी माय माऊली रमाई

सौभाग्य हाच तिचा दागिना 
ना शालूत नटली ना सोन्यात नटली 
हातात क्रांतीची मशाल घेऊन 
ज्ञानाची प्रकाशवाट दाविली 

संघर्षाची... जळती मशाल 
माझी माय माऊली रमाई
भुकेल्या वस्तीगृहातील खंबीर... 
प्रेरणाशक्ती तूच !
आणि भीमाची हृदय संवेदनाही तूच 
आम्हा सर्वांची कीर्तिवान माय माऊली 
माझी रमाई!!!


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

शीर्षक :- *** माझी रमाई ***

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

--------------------------------------------------------------------------

23.

         बाबासाहेब त्यांच्या कार्याची गणित जर मांडायला गेले तर त्यांचे कार्य संपूर्ण संविधानात एकवटले आहे.
        त्यांचे अनुभव त्यांच्या समाजाप्रती असलेले संपूर्ण विचारसरणी आणि विकास प्रवाह नेण्यासाठी भारताला ठामपणे जगासमोर उभे ठेवण्यासाठी सर्व पाठबळ या संविधानात आहे.
        याच पार्श्वभूमीवर ही कविता " संपूर्ण गणित ".कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

*** संपूर्ण गणित ***

बाबासाहेब एक संपूर्ण गणित 
ना वजाबाकी ना गुणाकारात
ना बेरीज ना भागाकारात
फक्त आहे संविधानात
लोकशाहीत ...
माणूसकीत ...
प्रत्येक व्यक्तीचा
जीवनप्रवासाच्या वाटेवरती !!! 

      
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- *** संपूर्ण गणित  ***


       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

--------------------------------------------------------------------------
 24.    
    
      भारतीय संविधान लोकशाहीचा आधार. भारतीय संविधानात किती संशोधन झाले तरी ते बदलू शकत नाही. कारण भारत परत कधीही गुलामगिरीच्या त्या वाटेवर जाऊ नये अशी बाबासाहेबांची इच्छा होती.
        भारतीय संविधानाने सर्वांना समानतेचा अधिकार दिला. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. ते सर्व भारतीय राज्यघटने त्यांनी लिहून ठेवले. 
        याच विषयावर,"माझे संविधान" ही कविता होय. कविता स्वरचित आणि स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चूक असल्यास माफी असावी.

**माझे संविधान **

अफाट बुद्धिमत्तेची पोच-पावती 
माणुसकीच्या धागा जगवूनी 
मांडले संविधान... 
अभिमानाने... 
माणुसकी जगविण्यासाठी 
तोडुनी बंध व्यर्थ स्वार्थी 
विचारसरणीचे मूल्यमापनाचे 
जिद्दीने पेटविली तलवार पेनाची 
हक्क मिळवून दिला 
मानवतेच्या...
जगण्याचा अभिमानाने 
मानसन्मान मिळवून दिला भीमरायाने 
अहोरात्र जागुनी 
समानतेची भेट करून दिली 
लोकशाहीची पेरणी केली 
न्याय समता बंधुत्व स्वातंत्र 
या तत्वावर विकासाची यशोगाथा 
तयार झाली... 
तोडुनी बंधनाची मुक्तदारे 
प्रगतीसाठी... मानवतेसाठी...
आणि जगण्यासाठी..!!
स्वाभिमान आहे माझे संविधान 
अभिमान आहे माझे संविधान 
मानसन्मान आहे माझे संविधान 
माणुसकीचा ठेवा आहे माझे संविधान 
माझे संविधान..!!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

शीर्षक :- **माझे संविधान **

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


--------------------------------------------------------------------------
25.


        बाबासाहेबांनी समाजव्यवस्थेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी अनेक क्रांती केल्या. राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक धार्मिक इत्यादी आणि शेवटची क्रांती संविधानाच्या माध्यमातून घडवून आणली.
        याच भाव विश्वातून ही कविता. कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखीत आणि स्वरचित आहे," क्रांतीचा मंच बाबासाहेब"...!!💕✍️
          
*** क्रांतीचा मंच बाबासाहेब ***

मानवाला मानव म्हणून जगण्याची 
जगातील सर्वात मोठी धम्मक्रांती 
घडवून आणली ज्ञानाची ज्योत पेटवून

असमानतेच्या विचारात पेरले 
नव विकासाचे बीज 
ज्ञानाच्या जोरावर क्रांतीचे वादळ 
घडवून आणले संघर्षावर मात करीत

अखंड दिवाचा प्रकाश 
संपूर्ण जगाला दाखवून दिला 
ज्ञानाच्या भरारीने 
विकासाचा तळपता सूर्य ठरला 
घडवून आणली
एकही थेंब न सांडविता धम्मक्रांती

रूढी प्रथेच्या नावावर 
अंधश्रद्धेच्या महापुरात  
धर्मांतराने घडविला इतिहास 
संघर्षाला मात केली 
प्रज्ञा शील करुणा मैत्री तत्त्वाने

विचारांचे परिवर्तन घडवून 
नवपेरणी केलीस बुद्ध विचाराने 
गंजलेल्या शोषित विचारांमधील
गुलाम मोकळा झाला धर्मांतराने
ज्ञानाच्या जोरावर 
समानतेच्या जोरावर
संविधानाच्या जोरावर..!!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

शीर्षक :- ** क्रांतीचा मंच बाबासाहेब ***
      आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

--------------------------------------------------------------------------

26.

           समाजव्यवस्थेचा पाया असलेली जात समाज संस्कृती याबद्दल बोलत असताना वेशीबाहेरील किंवा गावाच्या उंबरठा बाहेरील समाजव्यवस्था गावकुसाच्या आत आणताना बाबासाहेबांना किती संघर्ष करावा लागला असेल ही फक्त आता कल्पनाच आपण करू शकतो.
            " शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा", या तत्त्वावर त्यांनी संपूर्ण समाज व्यवस्था शिक्षित केली.
            ही कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

**** जात ****

जात होती बाहेर 
अडाणी -अशिक्षीत होती ती 
पोट भरण्यासाठी करावे लागे कष्ट.... 
तेव्हा एक वाली आला
त्याने दिला एक मंत्र
शिका-संघटीत व्हा! 
तेव्हा झाला समाज एक
अडाणी अशिक्षित ती
आज सुशिक्षित संस्कृत
जात होती बाहेर ती
समाजात आली ती
तिने दाखविला आपल्या
मंत्राचा मोठेपणा 
आज आहे ती
सुसंस्कृत शिक्षित  
एक आदर्श जात

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

शीर्षक :- ** जात ***

      आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

--------------------------------------------------------------------------
27.


      समाजक्रांती झाली. समाज परिवर्तन झाले. समाजात अनेक बदल झाले. शहरीकरण वाढले. पण खऱ्या अर्थाने शहरातही एक असा वर्ग उदयाला आला, तो स्थलांतरामुळे आलेला.                  जगण्यासाठी शहरात आलेल्या आणि निवाऱ्यासाठी कुठेतरी झोपडी घालून राहणारा समाज वर्ग दिसतो. त्यांच्या जगण्याचा प्रवास खूप कठीण आहे. संघर्ष समस्या हा त्यांच्या रोजच्या जगण्यात आहे.
       तर दुसरीकडे श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे. असा विरोधाभासात्मक दोन वर्ग समाजव्यवस्थेत आहे.
        याच संदर्भातून ही कविता...!" मला ही लिहिता येते", शहरीकरणाच्या वास्तव जगाचे वर्गीकरण या कवितेत आहे.
         आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. चूक असल्यास माफी असावी....!!!Thank you. 


*** मला ही लिहिता येते ***

मला ही लिहिता येते र ला र स ला स
पण रस्त्याच्या लगत वसलेली वस्तीस 
पाहिले की कळते जगण्याची 
भीषण वास्तव संघर्ष आणि जगण्या 
अन्नासाठी ची तडफड 

मलाही लिहिता येते म ला म ग ला ग 
पण अंगावरची कपडे पाहिले 
फॅशन श्रीमंताची,कपडे म्हणायचे की
 चिंध्या... कपड्याच्या नावाखाली 
आणि रस्त्यावर फॅशनेबल फाटकी वस्त्रे 

मलाही लिहिता येते ट ला ट फ ला फ
पण इवल्याशा पायात बळ येईल का?
शिक्षणाचे!  हसत-हसत जाईल का?
शाळा नावाच्या इमारतीमध्ये 
सावरेल का?आपले अंधारमय उघडे आयुष्य

मलाही लिहिता येते ध ला ध न ला न 
पण काय जगणं हे उघडावरले..
.गरिबीचे हसू की हसूच 
गरिबीचे श्रीमंतीचा शहरात लढायचे 
कुणाबरोबर आटलेल्या डोळ्यातील 
पाण्याबरोबर??

मलाही लिहिता येते ध ला ध छ ला छ 
पण थोपविता येणार का स्वच्छ 
भारताच्या नकाशात हरवलेले
 बालपण जगण्याची
आशा भिरकावून देणाऱ्या झोळीतील
अंधकार...

मलाही लिहिता येते ल ला ल श ला श 
पण त्यांच्यापर्यंत ही पोहोचेल का 
भारतीय संविधान,मूलभूत हक्क समानतेचा 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विचार
संपेल का विश्वासातील 
आशावाद जगण्याच्या 
सरणावरील मरणयातना 
टिपेल का उंच भरारी यशाची
जीवनाच्या लढाईत 
मला ही लिहिता येते 
स ला स,म ला म आणि बरच काही 
                       

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

शीर्षक :- *** मला ही लिहिता येते ***

      आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


-------------------------------------
28.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि पाणी सर्वांसखुले केले.
        पाणी हा शब्द कशा पद्धतीने वापरला जातो. हा अनुभव शब्दबद्ध करण्याचा छोटासा प्रयत्न.
       आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्या दुरुस्त केल्या जातील.

 **** पाणी ****

गेटच्या आवाजाने बाहेर गेली एक स्त्री होती 
कुंकवाने माथ्याला सजवून माहित नाही 
तिच्यात आकर्षण होते अनोळखी 
पोट तिडकेने पाण्याचा धर्म मागत होती 
पाणीच ते पाण्याचा धर्म करावा  
फ्रिज मधील पाण्याची बाटली दिली  

तिच्या हातात, तिला ओंजळ करू दिली 
नाही तिच्या हाताची माहित आहे 
पाण्याचा धर्म ; बाबासाहेबांनी याच 
पाणाच्या धर्मासाठी चवदार तळ्याचा 
सत्याग्रह केला  
याच पाण्यासाठी रक्ताच्या 
नद्या वाहिल्या होत्या 
अन्न पायदळी तुडविले गेले होते 
डोके फुटली गेली होती 
याच पाण्याच्या धर्मासाठी 

 तिच्या हातात पाणी दिले 
काहीसे प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर 
घेऊन पाण्याचा घोट पोटात  
परत ती तिच्याच भूमिकेत कुंकू हळद दे 
नारळ अगरबत्ती कापूर दे वाह 
तुज हे होईल तुझ ते होईल  
अंधश्रद्धेची टोपली समोर मांडली 
मांडत राहिली तिच्या शब्दात 
भविष्याच्या कल्पना भूतकाळाच्या गणिताबरोबर 
आकडेमोड करीत 

आकर्षण मला त्या काळाभोर चेहऱ्यावर 
फासलेला त्या लाल रंगाचे 
त्याने ती सांगू 
पाहत होती माझे भविष्य 
तिला साधी कल्पनाही नसावी 
या पाण्याच्या धर्मासाठी कधीकाळी 
बाबासाहेबांनी सत्याग्रह केला 
याच पाण्यासाठी बाबासाहेबांनी 
वणवण रस्त्याच्या कडेला 
प्रत्येकाला पाण्याचा धर्म मिळावा म्हणून 
आणि... 

तिला हवी होती भविष्याची 
माझ्या सुखी स्वप्नांची ओंजळ 
तिला माहितही नव्हते 
तिचे भविष्य
 दोन क्षणानंतरचे 
ती सांगत होती  पुनर्जन्माची कहाणी 
भविष्याचे सुखद स्वप्न 
तिच्या अंधश्रद्धेवर माझी श्रद्धा वरचढ होती 
कारण मी बाबासाहेबांची लेक होती 
अधिकार कर्तव्य माझ्या जबाबदाऱ्या 
आणि संविधान, ती प्रत ! 
तिथे स्त्री म्हणून मिळालेला हक्क 

माझी श्रद्धा सांगू पाहत होती 
तिच्या अंधश्रद्धेला हा माळवट पासून 
भिकाऱ्याचे देण घेऊ नको 
ही अंधश्रद्धा सांभाळून 
तुझी समोरची पिढी अंधकारमय 
करू नकोस 
तू ही अंधश्रद्धा सांभाळून 
गुलामगिरीत जाऊ नकोस 
बाबासाहेबांनी अहोरात्र अभ्यासाच्या 
साक्षीने काढलेल्या 
आजच्या या जगण्याला श्रद्धा 
तिच्या अंधश्रद्धेवर मात करत होती 

मनातच हळूच हसले  
मी तुला अन्नाचे दान वाढते 
एखादी बाबासाहेबांचे पुस्तक देते
मी तुला डब्यात असलेले 
दाळ तांदूळ गहू बाजरी 
माझ्याच ऐपतीप्रमाणे 
सेरभर का होईना पण 

तिची अंधश्रद्धा तिथेच हळद-कुंकवात 
नारळ कापूर धूपात 
हसाव की रडाव या प्रश्नातच 
माझ्या भविष्याचे गणित तिने मांडून टाकले 
या वेळेत 
तिच्या अंधश्रद्धेला बळी न पडता 
मोठ्या आवाजाने अन्न नको 
असेल तर जा 
या शब्दात बोलू तिला 
ताटा बाय-बाय केला 

पण ती ही कुठे श्रद्धेला 
ळी पडणारी होती 
परत पाण्याचा घोट घेत 
रस्त्याच्या कडेला उभी राहून 
त्याच पाण्याने कुंकवाला भिजवत 
कपाळावर लावत 
नवीन घरी नवीन शब्दांची रांगोळी 
दाराच्या झेंडाकडे बघत 
अभिमानाने बोलू लागली 
धर्म कर पाण्याचा 
तीही बाहेर आली 
तिने धर्म केला पाण्याचा 
पोळी भाजीचा पण 
ती ही तिच्याही अंधश्रद्धेला फसली नाही 
परत हसू आले समाधानचे 
तिच्या अंधश्रद्धे समोर कोणताच 
झेंडा फसत नाही 
कोणताच रंग फसत नाही 
कोणताच भावना फसत नाही 
श्रद्धा इतकी महत्त्वाची  

कदाचित वाचला असेल बाबासाहेब 
तिलाही माहीत असेल संविधान 
कदाचित तिलाही माहित असेल 
अंधश्रद्धेच्या टोपलीतल्या 
सत्याची परिकल्पना 
कदाचित तिलाही माहीत असेल 
बाबासाहेबांचे चवदार तळ्याचा सत्याग्रह 
ती वणवण .....
'पाण्याचा धर्म कर ग बाय ',
या शब्दाचा अर्थ तिलाही माहित असेल 
पाण्याचा धर्म कर ग बाय...!!   
या शब्दाचा अर्थ !
या शब्दाचा अर्थ -----

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


--------------------------------------------------------------------------
30.


आजूबाजूची परिस्थिती आणि कागदांवर दाखविली जाणारी परिस्थिती यामध्ये किती तफावत आहे, हे प्रत्येकांना माहिती होत आहे. याच पार्श्वभूमीवर ही कविता.      
       आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नेका.
       काही चुका झाल्यास माफी असावी. काही सुधारणा असल्यास नक्की सांगा. त्या सुधारल्या जाते धन्यवाद..!! 

****** शिकवायचे ******

डॉ. बाबासाहेब म्हणतात,
शिका संघटित व्हा संघर्ष करा 
आम्ही शिकलो पण संघटित झालो नाही 
पण संघर्ष मात्र पदोपदी 
अन्न वस्त्र निवारा रोजगार सुरक्षा 
ह्या आमच्या प्राथमिक गरजा 
आम्ही पूर्ण करिता आहो 
शिकून संघर्षाच्या वाटेवर तरीही 
अन्न वस्त्र निवारा सुरक्षा रोजगार 
कागदावरच आहे 

भारत तिसरी महासत्ता 
होण्याच्या वाटेवर आहे 
तरीही प्राथमिक गरजांसाठी 
झगडावे लागत आहे 
जगण्याच्या प्रत्येक पायवाटेवर 
संघर्षाची  वाट पाहत आहे 

माहितीच्या या तंत्रज्ञान युगात 
एका क्लिकवर जगाचा इतिहास 
आमच्या समोर आहे 
आणि त्या इतिहासात 
आमच नाव सुद्धा आता 
तिसरी महासत्ता म्हणून येणार आहे 

म्हणून आम्ही हसत आहोत 
कारण आम्ही आमच्या उघड्या 
डोळ्यांनी त्या महासत्तेचा 
अविभाज्य भाग 
होणारा आहो 
आम्ही उघड्या डोळ्यांनी 
बघत आहोत पदयात्रा, विदेशी यात्रा 
आम्ही हसतच बघत आहोत 
महामेट्रो बुलेट ट्रेन या सुविधांची 
खैरात ....

पण आम्ही प्रवास करतो 
आमच्याच लालपरीत 
ती भंगारतला डब्यापेक्षाही भंगार 
झालेली 
आम्ही हसतच बघत आहोत 
रस्त्यांवरील साचलेले पाणी  
डोळ्यातले अश्रू
तरी शिक्षण घेतच आहोत 
रोज रद्द होणाऱ्या 
यूपीएससी एमपीएससी सरळ सेवाभरती 
आणि विकासाची महाजत्रा 

तरीही आम्ही शिकत आहोत 
गावात उपलब्ध असलेल्या त्या शाळेत 
कारण बाबासाहेब म्हणतात,
शिका !! शिक्षणाने माणूस माणूस होतो माणसाला शिक्षणाने जगण्याचे 
ते नियम माहित  होतात 
हे माणसाला माणूस बनवतात 
म्हणून आम्ही शिकतो 

कधी संस्कार शिकतो 
कधी पुस्तकी ज्ञान शिकतो 
कधी गुगलच्या संपर्कात येऊन 
जगाच्या विकासाची संकल्पना व्याख्याही 
पण आम्ही शिकतो 
तरीही शिकतो 

संसदेच्या थेट प्रक्षेपणात 
कोणी फ्लाईंग किस देत 
कुणी ओरडून त्याचा विरोध करतो 
महत्त्वाची मुद्दे चालू असताना 
कुणी उठून जातो 
कुणी बोलत राहतो 
तरी बघतो उघड्या डोळ्यांनी 
सर्व, कारण आमचा मुद्दा 
अन्न वस्त्र निवारा सुरक्षा रोजगार 
आमचे मूलभूत अधिकार 
कसे पायदळी तुडविल्या जातात ते 

आता.., आता खरे वाटते 
बाबासाहेबांचे ते वाक्य 
राजकीय स्वातंत्र्यापेक्षा 
आर्थिक सामाजिक शैक्षणिक 
धार्मिक स्वातंत्र्य किती 
महत्त्वाचे आहे 
देशाची प्राथमिकता 
तिसरी महाशक्ती होण्याची  
आमची प्राथमिकता 
प्राथमिक सुविधांची 

म्हणून आता सत्ता महासत्ता 
सत्तेचा लोकशाहीचा चारही खांब 
आपल्या हातात असावे 
म्हणून शिकायचे 
संविधानाच्या पानापानावर 
बाबासाहेबांच्या त्या प्रत्यक्ष शब्दांसाठी 
शिकायचे जिथे माणसाला माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य अधिकार आहे 
म्हणून वेळ येईल तेव्हा 
शिकवायचे 
संसदेच्या थेट प्रक्षेपणात 
हे शब्द ऐकण्यासाठी शिकवायचे 
भारतातील युवा जगाच्या 
प्रगती पुस्तकात आलेखामध्ये 
महासत्तेच्या विकास यात्रेत
अव्वल आहे... 
हे ऐकण्यासाठी
संघटित होऊन शिकवायचे...!!💕

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
     
      आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया आपल्या सूचना कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.



--------------------------------------------------------------------------
31.
          डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातिभेदाचे मूळ कायमचे उपटून टाकण्यासाठी ज्ञानाच्या मार्गावरून आपल्या विचाराने देशाला चातुर्यवरणापासून मुक्तता दिली.
        पण आजही काही सामाजिक विचारसरणीचे ठेकेदार महानतेची पद्धतशीरपणे वर्णव्यवस्थेची घडी मांडू पाहत आहे. ती पात्रता त्यांच्यात आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो.
      कट्टरवादी विचारवंतांना जगाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो मार्ग जो बाबासाहेबांनी खुला केला तो बंद होऊ शकत नाही. यात भावविश्वातून ही कविता. '' पात्रता", आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखीत  व स्वरचित आहे.
     शब्दांचे माहेर घर शब्दांचे शेत पेरण्याचा हा थोडाफार प्रयत्न. चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद 💕💕💕💕!!


***** पात्रता ******


तुम्ही असा 
कोणत्याही संघटनेचे मोठे नेते 
पण बाबासाहेबांपेक्षा नाहीच 
तुम्ही कितीही विद्वान असाल 
पण बाबासाहेबाएवढी तुम्ही महान नाहीच 
ज्ञानाच्या सागराला कवेत घ्यावे 
इतकी पात्रता तुमच्या मध्ये असेलही 
तरी बाबासाहेब एवढी महानता 
तुमच्यामध्ये नाही 
चंदना परी झिजले.... 
उभ्या अंधाराला पायदळी तुडवून 
प्रकाश समाजमान्य केला
उपेक्षितांना माणूस बनविण्यासाठी 
इतके झिजणे आता कुणातही नाही 
तुम्ही खुशाल काढा मिरवणूक  
हातात झेंडे घेत शांत - अशांत 
हसूच्या सोबतीने 
बेधुंद नाचून घ्या 
नवीन पिढीतील तरुण रक्त 
पण बाबासाहेबांसारखे शिल्पकार 
होणार नाही 
खुले दरवाजे सोनेरी पहाट 
मुक्तीचे दारे फक्त 
बाबासाहेबांमुळे 
नाचू द्या शब्दांची कितीही घोडे 
बदलायची कितीही भाषा 
बापाला बदलण्याची भाषा 
निसर्ग नियमही करीत नाही 
निसर्ग नियमही करीत नाही 
तुम्ही असता कोणत्याही संघटनेचे मोठे नेते 
बाबासाहेबांपेक्षा नाहीच नाही.....!!🌐

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- *** पात्रता ***

           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

******************************************************************************
32.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या अंधारात प्रकाशाची ज्योत लावली, जिथे फक्त अंधारच होता.
            त्यांनी दिलेल्या शिकवणुकीमुळे आज समाज व्यवस्थेत मानसन्मानाचे स्थान आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही कविता. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
          बाबासाहेबांच्या विचारसरणीवर लिहिण्याचा छोटासा प्रयत्न माझा.  चुकल्यास माफी असावी. कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नक्की कळवा..! धन्यवाद💕💕💕💕💕💕

..... तुम्ही दिलेल्या तत्त्वज्ञानामुळे ......

पायवाटेतील काटे काटे आता 
नाहीत ते झाले फुले आता 
अस्पृश्याच्या दरीला समानतेच्या 
माळेमध्ये गुंफले सुरेख मोत्यांसोबत 
म्हणून....!

मी चालते आहेत त्या पायवाटेवर
जिथे विषमतेवर प्रहार 
करता येते अन्यायावर 
आवाज उठविता येते 
अस्तित्वाच्या जाणिवेचा सोहळा करता येते 

चालता चालता थकते कधीतरी 
तरी चालत राहते 
सोबत तुम्ही असता म्हणून 
जबाबदारी घेत राहते 
जगण्याच्या वाटा खुल्या करण्यासाठी 
चोहीकडे 

अनेक प्रश्न समस्या आणि 
नवीन स्वार्थी विचारांना 
पायदळी तुडविण्यासाठी विषमतेच्या 
बाबासाहेब तुम्ही दिलेली 
शिकवण 
तुम्ही दिलेली जबाबदारी 
कर्तव्य खांद्यावर घेत 
लिहीत राहते एक - एक शब्द 
कोऱ्या कागदावरती तुमची शिकवण 
माझ्यात जिवंत राहावी म्हणून 

पायाखाली काटे काटे आता 
नाहीतच 
तुम्ही दिलेल्या तत्त्वज्ञानामुळे 
जगण्याच्या 
तुम्ही दिलेल्या तत्त्वज्ञानामुळे 
जगण्याच्या....!!💕


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- *** तुम्ही दिलेल्या तत्त्वज्ञानामुळे ***

           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
******************************************************************************
33.
       डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर या दिवशी महापरिनिर्वाण झाले. जगण्याचे नवनवीन नवचैतन्यचे पाऊल नवीन पायवाट देऊन बाबासाहेब समस्त आपल्या लेकरांना पोरके करून गेले.
       त्या लेकरांना त्यांच्या त्या फुटलेल्या पंखांना बळ देऊन गेले. ताकद देऊन गेले. जगाच्या इतिहासात मानसन्मान देऊन गेले. ज्या महासागरा जवळ आजही बाबासाहेब जिवंत आहे.
      त्या महासागराचा अस्तित्वाचा तो शेवटचा क्षण होता कारण त्या चैत्यभूमीला बाबासाहेबांच्या नावाने ओळखले जाते. अशा त्या अथांग महासागरासोबत संवाद आहे. त्या संवाद भावविश्वातून हे काही शब्द मनाला भिडून गेलेले लिहिण्याचा थोडाफार प्रयत्न.         आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही सुधारणा सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या सूचनेचा विचार केला जाईल. कविता स्वरचित व स्वलिखित आहे. धन्यवाद...!!💕

**** हे अथांग महासागरा ***

हे अथांग महासागरा 
हा प्राण आहे माझा 
जळत्या चितेवर राख होत आहे 
ती नवीन दिशाची सोनेरी पहाट आहे 
अंधार उजाड आकृतीला 
प्रकाशाची माळ आहे 
जातीयतेच्या अंगणात फुललेले 
नवीन निळे फुल आहे
फाटक्या वस्त्राला ज्ञानाच्या प्रतीकाने 
धागा सुईच्या सोबतीने 
जगण्याचा महामार्ग आहे

हे अथांग महासागरा 
हे अथांग महासागरा 
या राखेवर फक्त अधिकार माझा नाही 
फाटक्या झोळीला शिवलेला धागा 
आणि धागा या महामानवाच्या
ज्ञानाची प्रखर ज्वलंत लख्ख प्रकाश आहेत 
गौरव मोकळ्या श्वासांचा 
लढाई नेहमी देशभक्ताची 
अस्पृश्यांच्या पेटत्या अंधार दिव्याची 
लढाई मनूच्या जळत्या होळीत आहे 
पेटला जिद्दीस म्हणून 
स्पर्शाचा न विटाळ आहे  
आसवे अश्रूंचे नयनात आहे 
अफाट अंधारमय जग विजेताला 
लेखणीची ही धारदार तलवार आहे 

हे  अथांग महासागरा 
तुझे अस्तित्व आता हे नाव आहे 
लढाई ही आता तुझी न असे कुणाशी 
तुझ्याच सोबतीला शेवटी 
भिमाईच आहे 
गौरव तुझा, या शेवटच्या क्षणांचा 
तू साक्षीदार आहे 
प्रज्ञा सूर्याचा सुगंध घेऊन 
अश्रू नकोस ढाळू तुझ्यावर 
आता नव अधिकार वाणी आहे 
पेटला तो त्या चंदनावर 
पेटला तो निसर्ग नियमावर 
पण तुझे भाग्य हेच आहे 
तो तुझ्याच सोबत आहे 
नितळ निस्वार्थ ओंजळ माझी 
त्यांनी दान दिले आहे 
नवे स्वप्न नवी ऊर्जा पेरली आहे 
मूगजळाच्या वाटेवर 
घटनाकार नायक आहे 
जोहर नसे आता 
जळत्या जखमांना धार 
अभिमानाची आहे 

हे अथांग महासागरा 
ऋण न फेडू शकेल असे दान आहे 
साऱ्या माणूस जातीला 
माणुसकीची समृद्धीची 
पाठीवर थाप आहे 

हे अथांग महासागरा 
आसमंतात पेरलेला हा धूर 
माझ्या तुझ्या #संविधानाचा जागर आहे 
परिवर्तनाच्या वाटेवर 
नवीन पहाट आहे 
पंख फुटलेल्या 
पिल्याला जीवनदान आहे 
जीवनदाना आहे 
जीवनदान आहे 

हे अथांग महासागरा 
माझ्याच भाग्याचा हा क्षण अंत आहे 
माझ्याच अंधार वाटेतला 
हरवलेला प्रकाश आहे 
माझ्याच फाटक्या शब्दांचा 
हा #महापरिनिर्वाण शब्द आहे 
अंधार रात्रीच्या अंधारात पडलेले
हे वाईट स्वप्न आहे  
हा प्राण माझा आहे 
राखेत अस्तित्वाच्या मुक्तीच्या 
लढाईने माणुसकीच्या समानतेवर 
ममतेवर लख्ख प्रकाश आहे 
हे #अथांग #महासागरा 
हा #प्राण माझा आहे


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :-***** हे अथांग महासागरा *****

           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
******************************************************************************
34.

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन वंचित दिन दलित समाजामध्ये नवीन सूर्योदय सोनेरी रंगाने फुलविला पण त्यासाठी त्यांना त्या काळातील त्या समाजाच्या विरोधात बंड करावा लागला त्यांनी त्या सर्व समाज व्यवस्थेचा रोष ओढवून; आजच्या या समाजाचा पाया रचला...!💕
 त्या भाव विश्वातील कविता. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...💕
...... धन्यवाद !!!!!!!

**** सूर्योदय ****

नशिबाची अंधार यात्रा 
प्रकाशात  फुलवली
जातिपातीच्या समाजव्यवस्थेत 
अपमान सहन करीत 
ज्ञानाच्या जोरावर शक्तिशाली 
नवीन इतिहास घडविला 
सोनेरी पानांवर 

दिन-दलित शोषित समाजाला 
जन्मभर पुरेल इतकी  
आत्मविश्वासाची संपत्ती दिली 
शिक्षणाच्या मंत्राने उमलले स्वप्न नवीन 
पंख फुटले कोंडलेल्या आयुष्याला 
संविधानाच्या पानोपानी समाज 
स्वातंत्र्य केला बहूजनांचा 
तुम्ही भाग्यविधाता झाले 
तुम्ही मार्गदाता झाले 

वर्गातील एका कोपऱ्यात बसून 
जातीपातीची सर्व वादळवारे झेलीत 
नवीन दृष्टिकोन समाजमान्य 
करण्यासाठी 
समाजातील उणीव नष्ट करण्यासाठी 
कधी वाटले ही नसेल, असे 
भाग्य दिले 
आज हृदयाच्या कोपऱ्यांनी कोपरा 
ऋणी तुझे बाबासाहेब 

पानापानावरती लिहिते सविता 
फक्त तुझीच गुणगान 
अस्तित्वाच्या फुललेला 
सूर्योदयासोबत 
सूर्योदयासोबत...!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- ***** सूर्योदय *****

           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .



*****************************************************************************  
35.

       आज समाज व्यवस्था इतकी बदललेली आहे की, या समाजव्यवस्थेचा एक भाग होताना असे वाटते की, या माहितीच्या महा स्फोटामध्ये माणूस हरवत चालला आहे. हे हरवण्याचे काम आजची उलट सुलट विचारसरणीची विचारसरणी करत आहे.
      याच भावविश्वातील ही कविता. आदर्श शोधावा असा व्यक्ती आजूबाजूने दिसतच नाही.... त्या विचारसरणीमूळे म्हणून मी बाबासाहेब शोधत सुटले मला मिळालेला त्या सर्वच माध्यमात पण मला बाबासाहेब कुठे भेटले...?? हा सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न.
        कविता स्वलिखितव  स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद... 💕

**** भेटले मला ****

शांत निजलेल्या मनाला 
अशांत वाटत होते 
म्हणून शोध घेतला थोडा 
मिरवणूक मोर्चे आंदोलने यात भेटेल 
या विचाराने 
शोधले माणसा माणसाच्या भावविश्वात 
विचारात, संवादात तरी ही 
भेटले नाहीच मला 
म्हणून सोशल मीडियाच्या 
सर्व ॲपचा वापर करून 
सर्च केले तरीसुद्धा 
त्या विचारा 
त्या संवादात 
त्या बोलण्यात 
भेटलेच नाही मला 
जे भेटले स्वतःपुरते 
बंद दरवाजाआड 
वळणा वळणावर 
गुदमरून जाईल 
इतक्या खालच्या शब्दात 
विचारांच्या गर्दीत गर्दी फार झाली 
तरी भेटले नाहीच मला 
त्या विचारात म्हणून 
विहारात गेले 
तेथेही मानसिक समाधान मिळले 
अध्यात्मिक शांतता मिळाली 
पण भेटले नाहीच मला 
म्हणून.... म्हणून ......
पुस्तकांच्या लायब्ररीत गेले 
असाह्य होऊन मूक पावलांनी  
पाझरत्या डोळ्यांनी 
वाटले येथेही भेटणार नाही?
या प्रश्नचिन्ह विचाराने 
पण आश्चर्य त्या मिनिमिनत्या प्रकाशात 
रुणझुणता आवाजात 
कोंडलेल्या श्वासात
भेटले मला बाबासाहेब 
पुस्तकांच्या शब्द शब्दात 
संवाद माझ्याशी झाला 
त्यांच्या परिवर्तनाच्या लाटेवर 
चालताना शब्दाने तत्त्वज्ञान सांगितले 
बाबासाहेबांनी .....
भीमरावने .....
भारताच्या संविधान निर्मात्याने.....
आपल्या तळहातावरच्या रेषा पुसून 
त्यावर समता न्याय बंधुता स्वातंत्र्य 
अशा रेषा ओढल्या 
जमिनीत पेरले उगवले संविधानरुपी 
अधिकार जबाबदारी मूलभूत कर्तव्य
शिक्षणाचे नवीन दारे 
विचारांच्या गर्दीत 
शब्दांचा सोहळा झाला 
आणि बाबासाहेब भेटले मला 
त्या पुस्तकांच्या शब्दात 
त्या पुस्तकांच्या शब्द - शब्दात

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :-****** भेटले मला ****


           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


******************************************************************************
36.
       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला शब्दात मांडणे लिहिणे फार कठीण आहे. तरी छोटासा प्रयत्न.
 कविता स्वलिखीत व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू...!! नका.धन्यवाद....!!

.....माझा भीमराव......

अंधाराच्या काळोखात प्रकाश 
माझा भीमराव 
ज्ञानाच्या पेटत्या मशालीचा प्रकाश 
माझा भीमराव 
अनीतीच्या गणिताचे उत्तरे 
माझा भीमराव 
जातीवादाच्या स्वप्नाला विस्फोटक 
माझा भिमराव 
न्यायाच्या तत्त्वावर चालणारा 
माझा भीमराव 
लेखणी त्याची संविधानाची 
समानतेच्या हक्काची 
दुःखी पिढी समाजाचा आधारस्तंभ 
माझा भीमराव 
विचारांच्या गर्दीचा अनुत्तरीत प्रश्नांना 
उत्तर माझा भीमराव 
मिणमिणता  प्रकाशात लख्ख उजेड 
माझा भीमराव  
माझा भीमराव...!!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :-.....माझा भीमराव......



           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


******************************************************************************

37.
       समाजात उपेक्षितांचा एक मोठा वर्ग होता. त्यांच्या जीवनाचा वेध घेणे कोणत्याही रूढी प्रथा परंपरेला जमला नाही. वैचारिक दृष्टया उपेक्षितांचे जग समृद्ध करू शकला नाही.
        पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्याचा क्षण नी क्षण त्या वर्गासाठी खर्च केला आणि असंख्यपिढ्या त्या क्षणांचा लाभार्थी झाला.
             हे महान कार्य विसरू शकत नाही याच भावविश्वातून ही कविता. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही सुधारणा असल्यास नक्की कळवा. धन्यवाद....!!💕

*** पुसू शकत नाही ***

जय भीम मित्र-मैत्रिणींनो 
हे शब्द कानी पडता 
काही व्यक्तींची प्रतिक्रिया ही नको 
त्या हावभावावरून चालू होते 
त्या सर्व विदूषकांना मान्यवरांना 
मनापासून सांगते

मी माझी,ओळख पुसू  शकत नाही 
अस्तित्वाच्या गाडीवरतीच ओळख माझी 
जीवनाच्या गणितात, डायरीत 
तीच माझी जीवनसोबती 
अस्पृश्य शब्दाला त्यातील जीवन संघर्ष 
माझ्यापर्यंत आलाच नाही 
उपाशीपोटी आयुष्याचे दुर्दैवी क्षण 
आलेच नाही 

शिक्षणाची सर्वदारी उघडली 
पक्का इमारतीचे स्वप्न स्वप्न असते 
या शब्दाने मला गाडी बंगला दिला 
नोकरी, चांगली जीवनशैली दिली 
जीवनाच्या पायरी - पायरीवर 
मुक्त स्वातंत्र्याची पायवाट दिली 
त्या शब्दानेच ....!

म्हणूनच माझ्या जिवलग मित्र-मैत्रिणींनो
मान्यवरांनो
मी माझी ओळख पुसू शकत नाही 
तुमच्यासारखे हातात झेंडे कुणाचे 
घेऊ शकत नाही 
जय - भीम नावाची ताकद माझ्यात आहे 
माझ्या रक्तात आहे 
माझ्या हातातल्या त्या प्रत्येक रेषेत आहे 
ती रेषा माझ्या भिमाईने दिली 

म्हणून सविता आग्रही विनंती आवाहन करते 
त्या सर्व जनतेला 
ते माझे अस्तित्व पुसू नये 
आमच्या लख्ख संघर्षाला 
माय माऊली म्हणून कवेत घेत
जळत्या निखाऱ्यावर 
सुखाचे सागर देऊन 
जगाला नव धम्माचा 
माणुसकीचा नियम दिला 
म्हणून ते मूकनायक 
म्हणून ते बाबासाहेब💕

शब्दांच्या सोबतीने पेरते आहे 
कागदावर.....
माझ्या आत्मविश्वास 
माझा जगण्याचा मार्ग 
माझ्या साध्या सरळ आयुष्याचा विश्वास
कुणीही पुसू शकत नाही 
म्हणून  मी, 
.....जय भीम माझी ओळख 
पुसू शकत नाही 
मी माझी ओळख असू शकत नाही


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- ****** पुसू शकत नाही ***


           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

******************************************************************************
     38.  

             डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अति शूद्र समाजाला मानाचे स्थान मिळवून दिले. हे मिळविण्यासाठी बाबासाहेबांनी जन्मापासूनच या समाजव्यवस्थेच्या त्या मानसिक विकृतीला सहन केले, जी विकृती समाजमान्य होती. तरीही बाबासाहेब त्या व्यवस्थेला रोखठोक उत्तर दिले. असा माझा कोहिनूर हिरा माझा भीमराव घटनाकारापर्यंतचा प्रवास नवविकासाच्या पायवाटेपर्यंतचा पहिला किरणाचा कोहिनूर माझे बाबा.
       कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

**** कोहिनूर हिरा माझा भीमराव ****

अशक्य ते शक्य झाले 
भीमरावाच्या जन्माने मुक्तीची दारे 
उघडली 
दिन १४ एप्रिलचा कोहिनूर जन्माचा 
जातीपाती अंधश्रद्धेच्या बेडी मधूनच 
लहानपण जात राहीले 
बालमनावर त्यांची चीड निर्माण 
होत राहिली शिक्षणाची कास 
धरून भीमाने त्या समाजव्यवस्थेला 
माती दिली 
हक्क दिले वंचितांना 
समाजातील प्रगतीच्या धारेमध्ये
नियतीचा खेळखंडोबा 
माणसाला माणुसकीच्या 
सावलीत हक्काचे दान दिले 
जगाच्या विकासाच्या प्रगतीच्या विकासात सिंहासनावर अभिमान दिला 
स्वाभिमान दिला 
एका पेनाच्या जोरावर 
समाज रचना बदलविली 
माझ्या कोहिनूर हिऱ्याने 
सविताचे शब्द लिहीत राहतील 
शब्द शेवटच्या श्वासापर्यंत 
कोहिनूर चा चमत्कार 
अनमोल नवविकासाचे पायवाट 
जुन्या आठवणींच्या इतिहासात 
नवविकासाची भाषा 
नवविकासाच्या पायावर भिमाईचे 
गुणगाण
भीमरावाचे गुणगाण 
भीमरावाचे गुणगाण


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :-  ** कोहिनूर हिरा माझा भीमराव **

           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

******************************************************************************
39.
          " उजेडाचा प्रकाश झाले बाबा 
अंधाराचे दान संपून बाबा...."   हे शब्द बाबासाहेबांच्या परिवर्तनाच्या माळरानाला फुलविले.
        बाबासाहेब नसते तर लोकशाही नावाची व्यवस्था कधी समाजमान्य झाली नसती. ती फक्त कागदावरच असते. असे माझे बाबासाहेब....!!
     फाटक्या झोळीला सोनेरी रेशमाचे काट लावून समाज त्या व्यवस्थेपर्यंत पोहोचविला ते कधी काळी स्वप्नवत होते पण आज ते सत्यात आहे. 
       कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही सूचना असल्यास नक्की कळवा....!!❤🌐


*** परिवर्तनाची तूच कविता ***

उजेडाचा प्रकाश झाले बाबा 
अंधाराचे दान संपवून बाबा 

उपकार तुम्हाचे प्रगतीच्या प्रगतीवर 
दान तुम्हाचे वंचितांच्या आयुष्यावर 

जागृतीच्या अग्नीत अखंड प्रकाश ज्योत बाबासाहेब 
परिवर्तनाचा प्रकाश लाट  देणारे बाबासाहेब 

तुम्ही वेचले आम्हातील कष्टमय जीवन 
आम्ही ओंजळीत घेतले सुखमय जीवन 

समानतेच्या संविधानात एकता कायमची समाजाची पेरलेल्या नव स्वप्नांचे गाणे कायमचे समाजाचे 

बाबासाहेब जगण्याची धडपड जगण्याचे सुगंध नाते 
जगण्यातील अंधश्रद्धा रूढी नीती याची  मूठमाती 

फाटक्या झोळीतला लख्ख प्रकाश बाबासाहेब परिवर्तनाच्या वाटेवर तूच कविता बाबासाहेब 

तूच कविता बाबासाहेब 
तूच कविता बाबासाहेब...❤


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- ***    परिवर्तनाची तूच कविता  ***

           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


******************************************************************************
40.



        ज्यावेळी बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याची घोषणा केली. त्यावेळी बाबासाहेबांसोबत अनेक पर्याय उभे केले गेले. तरी बाबासाहेब यांनी बौद्ध धम्म का स्वीकारायचा स्पष्टपणे सांगितले.
       बाबासाहेब हजारो वर्षाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, गुलामगिरी मधून मुक्त व्हायचे होते. या ऐतिहासिक सोहळ्याला धम्मचक्र प्रवर्तन दिन हे नाव दिले.
      बौद्ध धम्म मानवतावादी आणि आपला होता. म्हणून त्यांनी अस्पृश्य समाजाला बौद्ध केले. उजेड्यातील तो प्रकाश अस्पृश्य समाजाच्या आयुष्याला प्रकाशित करून गेले.           बाबासाहेबांची दूरदृष्टी आणि बुद्धिमत्ता यावरूनच प्रकर्षाने जाणवते. धम्म परिवर्तन का केले....? याच भाव विश्वातून ही कविता.                   आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका आढळल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. योग्य असल्यास त्या सुधारल्या जातील. 

धन्यवाद...!!

*** धम्मपरिवर्तन ***

अनंतकाळाच्या गुलामगिरीला 
परिवर्तन सात कोटींना पैलतीरी 
नेण्याचे आवाहन स्वतः स्वतःच्या 
बुद्धिमत्तेला माणसाला माणूस समाजमान्य करण्याच्या आव्हान 

दगडबुवांच्या देव्हाऱ्यात 
धम्म परिवर्तनाचा 
नवा समाज नवा माणूस 
जगण्याच्या वाटेवर घडविण्यासाठी 
कर्मकांड अंगारे - धुपारे सावलीचा 
ही विटा अशा उपास तपास 
नवस पाणी अशा समाजव्यवस्थेला 
धम्म विज्ञानवादी चिकित्सक  
समाजाचा आरसा दिला 

व्यक्तिमत्व विकास, मानसिक स्वातंत्र्य 
न्याय समता बंधुता मोकळा श्वास दिला 
धम्म परिवर्तन आणि जगण्याच्या वाटेवर 
वादळ वारे खूप येतील 
फुललेल्या वाटेवर खडक दगड येथील 
म्हणून बाबासाहेबांनी सात कोटींना 
धम्माची शिकवण देऊन  
स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दिला 

महत्त्वकांक्षा दिली जे संघर्ष येतील 
ते यशस्वीपणे पेलण्याची 
ताकद दिली  
बाबासाहेबांनी धम्म परिवर्तन क्रांती 
सामर्थ्याने आम्हाला दिले 
धर्माच्या शस्त्राच्या अंधकारमय आयुष्याच्या अंधारमय वाटेच्या 
प्रत्येक वाटेवर उजेडाचे प्रकाश झाले 

धम्म परिवर्तन हा मनाचा स्वातंत्र्याचा 
शोषणाचा अंतिम केंद्रबिंदू होता 
धम्म परिवर्तन स्वाभिमानी 
स्वालंबी जीवनाचा जागृत संस्कार 
सहजीवनाचा आधार होता
 
पुस्तकाच्या साक्षीने चमत्कार घडतो 
मेहनतीच्या जोरावर अपंग मनगटावर शक्तिशाली वात्सल्य रुपी 
यशाची हमी दिली 
बाबासाहेब तुम्ही धम्म परिवर्तन करून 
बुवा दगड यांच्या देवारात 
मानवता वसविले 
वही पेनाच्या साक्षीने 
हळुवार मनावर फुकांर सुगंधित दिली 
अनंत काळाच्या गुलामगिरीला ...!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- ***     धम्मपरिवर्तन  ***

           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .



******************************************************************************


      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आज 14 ऑक्टोबर 1956 धर्मांतर केले.
      गुलामाला गुलामीची जान करून दिली. अनंत काळच्या गुलामगिरीला मुक्तीचा मार्ग दिला. याच पार्श्वभूमीवर ही कविता...!!❤
     आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कविता स्वलिखित व स्वरचित आहे.


..... माझ्या भिमाईने ....  

पहाटेच्या सूर्यप्रकाशाने 
पावन झाली नागपूर दीक्षाभूमी 
जनसागराने घेतली 
वर्षानुवर्ष गुलामगिरीतून 
मुक्त सूर्यप्रकाशाचा आस्वाद 
14 ऑक्टोंबर या तारखेला 
ऊर्जा स्त्रोत धर्मांतराचा 
भिमाई माझी झाली 
माझ्या मुक्तीची विश्वगाथा 
पहाटेच्या सूर्यप्रकाशाच्या 
साक्षीने नवी इतिहास 
घडविला भारत भूमीच्या 
पावन धरतीवर 
गुलामाला गुलामीची जाण करून 
मुक्त केले 
माझ्या भिमाने 
माझ्या बाबासाहेबांनी 
क्रांतीची सावली झाले 
विटाळलेल्या सावलीला 
मुक्त केले घृणास्पद 
जगण्याला धम्मचक्र दिले 
रात्र रात्र जागून 
माझ्या भिमाईने
माझ्या भिमाईने...!!❤

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


******************************************************************************




 
 ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


-------------------------------------------------------------------------
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. शब्दांनी पेरलेली नवीन माय माऊली आहे .मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे.शब्द उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
    काव्यसंग्रह स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्या दुरुस्त केल्या जातील.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤

( काव्यसंग्रहातील सर्व फोटो गुगल वरून डाउनलोड करण्यात आलेले आहेत. धन्यवाद !!)

-------------------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...