savitalote2021@bolgger.com

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

.....कालावधीत नसतो ...

      स्त्री जन्माची ही कहाणी रोजचीच. शब्दात मांडण्याचा प्रयत्न..!
      स्त्री म्हणजे शक्तीचे रूप ...न थकता न थांबता 24 तास कामात गुंतलेली. त्या स्त्रीची व्यथा शब्दात मांडण्याचा प्रयत्न ..!
      कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤


.....कालावधीत नसतो ...

आज उद्याच्या या कालावधीत 
बंदिस्त असते स्त्री 
पण कधीही आज येत नाही 
ना कधीही उद्या येत नाही 
तिच्या आयुष्यात 

मनातल्या वेदनांना कुठेही 
उद्याचा गोंधळ येत नाही की 
आजची स्तब्ध शांतता येत नाही 
एक रूप होण्याच्या स्वभावाला 
ती तडा जाऊ देत नाही 

सकाळ-संध्याकाळ थकून नसलेली 
स्त्री फक्त तिला 
आताचा आभास असतो 
 क्षीण झालेल्या भावनेला कोंडवाडा 
मात्र सतत सोबत असतो 

सामर्थ्य आपल्या स्त्रीशक्तीचा 
करीत पावलोपावली शतकेंनी शतके 
संघर्ष चालूच असतो 
कारण तिच्या आयुष्यात 

आज उद्या हा कालावधीत नसतो 
आज उद्या हा कालावधीत नसतो

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

=============================

This story of female birth is everyday.  Trying to put into words..!
 A woman is a form of power ...working tirelessly 24 hours a day.  Trying to put that woman's pain in words ..!
 The poem is handwritten and composed.  Don't forget to like and share if you like.
 Be sure to share your thoughts in the comment box, your suggestions in both sweet and bitter words and give words to your thoughts..!❤


 .....is not in period ...

 During this period today and tomorrow
 A woman is confined
 But never comes today
 No tomorrow ever comes
 in her life

 Pain anywhere
 The confusion of tomorrow does not come
 Today's stagnant silence does not come
 To the nature of being a form
 She doesn't let go

 Morning and evening without fatigue
 Woman only her
 There is a sense of now
 A dungeon for a debilitated spirit
 But is always with you

 The power of your feminine energy
 Doing centuries after centuries
 The struggle continues
 Because in her life

 Today tomorrow is not in this period
 Today tomorrow is not in this period

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 
The blog is my home of words.  I express my feelings in such a way.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹


=============================

....❤❤❤❤❤❤❤❤💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕===============

मराठी कविता आयुष्य कविता चारोळी सकारात्मक कविता पॉझिटिव्ह कविता मोटिवेशनल कविता लेख वन लाइनर कविता टू लाइनर कविता

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...