** शोध तुझा **
भिरभिरत्या नजरेने शोधते
तुला, कुठेतरी दिसे न
या आशेने
आणि भेटतो मला
मनाला
मी सावरते स्वतःला
हसूनच बोलते
हळूच... पाहताना तुझे
नयन
ओळखीचे नयन ते
तरी कमी काहीतरी
जाणवत राहते सतत
पण सारखे नेहमीप्रमाणे
अबोला तुझ्या...
ओठांच्या दुखावलेल्या
मनाच्या
माघार न घेण्याच्या सवयीचा
आपलेपणाला तुरुंगवासात
अज्ञातवासात ठेवण्याचा
अहंकारी स्वभावाला
म्हणूनच
बोलू नको
मनातील जिव्हाळ्याचे शब्द
आपुलकीची विचारपूस
डोळ्यांना नजर न देता
कुठेतरी शून्यवत.... पाहण्याचे
नाटकीय शारीरिक अंदाज
नकळत
भिरभिरणारी नजर
तरी निघते...?
पण पुन्हा निघतांना
शोध तुझ्यातील
भिरभिरणारी नजर
प्रेमाने भरलेली...!!
✍️©️®️सविता तुकाराम लोटे