प्रत्येक घराघरात धन्याचा वापर केला जातो. प्रामुख्याने भारतात मसाले म्हणून जास्त वापर केला जातो.धन्याचे अजूनही खूप महत्व आहे.
धने तिखट पाचक ज्वरनाशक रुचीवर्धक,जुलाबात, गुणकारी करणारे आहे. धने दहा ,उलटी, खोकला, अशक्तपणा इत्यादी विकार नष्ट होते. तसेच रक्ताचे प्रमाण शरीरामध्ये वाढविते. धन्यामध्ये विविध गुणकारी पोषकतत्वे आहे.
शरीराला जीवनसत्व असी पोषक पुरवठा करते. धने हे हर्बल टी या स्वरूपातही आरोग्य तज्ञ वापरण्याचा सल्ला देतात.
१. कोथिंबिरी मध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम जीवनसत्व सी हे घटक रोग प्रतीकर शक्ती वाढविते. आपल्याला रोगांपासून दूर ठेवतात.
२.उन्हाळ्यामध्ये शरीर थंड ठेवते रात्री धने पाण्यात भिजू घालून सकाळी ते पाणी गाळून घेऊन त्यात थोडी खडीसाखर घालावे ते पाणी पिल्यास शरीरात पित्त ज्वराने होत असलेला दाह दूर होतो.
३.थायराइड,हॉर्मोन्स नियंत्रण करते. रक्तातील साखरेचे पातळी कमी केले जाऊ शकते.
४. पोटात सतत गॅस जळजळ होत असल्यास जिरे धने समप्रमाणात बारीक करून रोज एक चम्मच खाल्लास जळजळ शांत करते.
५. गरम पाण्यामध्ये एक चमचे धने घाला त्याला अर्ध पाणी होईपर्यंत उकळी येऊ द्या ते पाणी पाच मिनिटाने गरम गरम प्या.
६. शरीरात पाण्याची कमतरता येऊ देत नाही.
७.शरीरातील चयापचय गती देते.
८. वजन कमी होण्यास मदत होते.
९. अजीर्ण झाल्यास धन्याचे पावडर अर्धा अर्धा चम्मच नियमित घ्यावे पचनसंस्था सुधारते.
(धने खाण्याचे फायदे)
१०. शरीरामध्ये अशक्तपणा असल्यास धन्याचा उपयोग करावा धने लोहयुक्त असतात.
११. हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
१२. तोंडाचा अल्सर पोट साफ होते.
१३. शरीर हलके होते.
१४.रक्तदाब कोलेस्ट्रॉल विषारी द्रव्य मुतखडा, दृष्टीदोष, हाता पायाला मुंग्या येणे अशा विविध आजारांवर औषध म्हणून धने जिरे पावडर उपयोगी ठरते.
१५.त्वचा सतेज होते.
( Coriander cumin seed power)
अशा या छोटा दाण्यांचा उपयोग गृहिणी आपल्या स्वयंपाक घरात रोज करीत असते धने वापरामुळे अनेक आजारांना आळा घालता येतो धने आजची तरुण पिढी हर्बल टी म्हणून उपयोग करतात कोथिंबिरीच्या रोपाला आलेले वाळलेले फळ म्हणजे धने विविध गुणांनी संपन्न असलेले धने वैविध्यपूर्ण रूपात वापरले जातात.
सविता तुकाराम लोटे
----------------------------------