savitalote2021@bolgger.com

निसर्ग कविता सकारात्मक कविता aayushavar kavita positive Nature poem Marathi kavita collection Marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निसर्ग कविता सकारात्मक कविता aayushavar kavita positive Nature poem Marathi kavita collection Marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ३ जुलै, २०२१

*** तृणफुले ****


            ****  तृणफुले ****

जीवनगाण समजून सांगे 
गोड मधुर शब्दांच्या संगतीने 
रानावनातील जग समजून 
सांगे  तृणपाती फुले 
जगा 
बेधुंद.... 
सांगत सुटे 
....वाऱ्यावरती डुलत 
सदा तृणफुले


                     ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ***  तृणफुले ****
आपला अभिप्राय खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद.


*************************************

*** गवतफुले ***

       


           निसर्ग सौंदर्यामधील एक सुंदर सौंदर्य म्हणजे गवतफुले फुललेल्या गवत फुलांना पाहताना सुचलेली कविता.
                   कविता स्वलिखित आहे. 
          आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका नक्की करा. 

*****  गवतफुले  *****

सपाट जागी फुलते 
गवतफुले डोंगराच्या 
पायथ्याशी कधी कुशीत 
सतत आनंदी ...

हिरव्या गवताला पांढरी 
शुभ्र फुले नटून 
वाऱ्याबरोबर खेळते 
इकडून तिकडून 

आयुष्यात कितीही संघर्ष 
तरी मजेत जगा सांगत 
सुटते इवलेसे गवतफुले 
साऱ्या दुःखाला विसर पडे 

रूप सदा हसत राहे... 
हिरव्या रंगात रंगुनी 
मनमुराद हसून... हसवे  
इवलीशी फुले गवती

इवलीशी गवत फुले!!
इवलीशी गवत फुले!!

              ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ***  गवतफुले  *****
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you
   

*************************************

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...