savitalote2021@bolgger.com

स्त्री लेखआयुष्य लेख लेखwomen words article लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्त्री लेखआयुष्य लेख लेखwomen words article लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १४ मार्च, २०२२

डायरी प्रकरण-3 वणव्या अस्तित्वाचा ***

*** वणव्या अस्तित्वाचा ***


वणव्या स्त्री जातीचा 
स्वतः स्वतःशी असलेल्या अस्तित्वाचा 
आणि स्वतःच्या स्वातंत्र्य अस्तित्वाशी 
वणव्या.....

      खरंच आयुष्यातील संघर्ष हा कधीही न संपणारा आहे. आज अशीच एक गोष्ट सहज लक्षात राहून गेली. टीव्ही आपल्याला किती गोष्टी सहज समजून सांगतात. मनोरंजनासोबत पण असे करताना आपल्या आजूबाजूची परिस्थिती सत्य," रेखाटतात की काल्पनिक" हे मात्र समजत नाही.असंच स्त्री अस्तित्वाचा आणि तिच्या समाजमान्य नियमांवर बोट ठेवण्यात आले पण खरंच स्त्रियांना लावण्यात आलेले सर्वच नियम तंतोतंत पुरुष समाजमान्य समाजाला ही लागू होतात.

         मग तो (अपवाद )ते नियम का नाही पाळत? पुरुष म्हणजे सप्तपदीचा सोबती..! तर मग आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यांवर स्त्रियांना सोबत का नाही चालत??खरंच,स्त्री हे एकटीच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर परीक्षा देत राहते. अशावेळी पुरुष समाजमान्य पुरुष, प्रत्येक गोष्ट ही स्त्रियांवर ढकलून दिले जाते.

        संस्काराच्या नावावर फक्त काही स्त्रियांना गुलामगिरीची वागणूक दिली जाते आणि त्या गुलाम स्वातंत्र्य संस्कृतीची नवीन ओळख समाजमान्य केली जाते. घर आणि मुल ही संस्कृती मागे पडत असली तरी... नवीन संस्कृती उदयाला आली ती म्हणजे ,"स्वातंत्र्य स्त्रीचे विश्व ",अशी ही संस्कृती स्त्रियांना खूप स्वातंत्र्य देतात. घर.. मूल ...संसार आणि इतर कोणत्याही बंधनाशिवाय ती जगत राहते. हवे ते करत राहते पण तिला घर मुल आणि संसार याच वर्तुळामध्ये तिचे स्वातंत्र्य तिला ठरवावे लागते.


       नवीन स्वतंत्र स्त्री विश्वामध्ये आपले स्वातंत्र्य उपभोग घेत असते.  मात्र आव असा की ,"माझ्यासारखे दुसरे कोणीच नाही." या संस्कृतीमध्ये सर्व व्यवहार आपल्या हातात घेतलेले असते. ते फक्त भासविले जाते आणि नवीन गुलामगिरीची पद्धत स्त्रियांवर लादली जाते.
       

         आणि ती ही या संस्कृतीला हसत खेळत स्वीकार करीत असते.... करत राहते.... केला जातो .एक नवीन मॉडन आयुष्यात ती जगत राहते. मनासारखे..!! सर्व करीत राहते पण एक गुलाम मानसिकतेतून. एखादा रिमोट सारखे सर्वांच्या समोर हजर....!!


        "माझ्या घरी माझ्या शिवाय पानही हलत नाही हो", हे वाक्य मोठ्या अभिमानाने जगासमोर बोलते. पण खरंच कधीही कुणा शिवाय काही ही अडत नाही हे सत्य. मनात सतत जागी राहते, एक विलक्षण उणेपणा..!! मनात असते ते सत्य या संस्कृतीचा उपभोग घेणाऱ्या प्रत्येक स्त्रियांना माहीत असते पण आज पर्यंत स्वातंत्र्याच्या नावाखाली फक्त माझा नवरा... माझा मुलगा...आणि  माझी मुलगी यापलीकडे नसलेले जग. पण सत्य काही वेळेनंतर समोर येते. तेव्हा ती फक्त एकटी!!
       नवरा कामात. सतत मुले मित्र-मैत्रिणींबरोबर. ही इथे -तिथे किंवा खालील वेळा टीव्ही मैत्रिण. किती दिवस जगणार या गुलाम स्वातंत्र्य मानसिकतेला स्वतः मध्ये, किती दिवस रुजविणार माहित नाही पण स्त्री स्वातंत्र्याच्या नावावर आजही स्त्रियांना चूल आणि मूल या संकल्पनेत वावरावे लागते. फक्त त्याचे स्वरूप संयुक्त कुटुंब वरून विभक्त कुटुंब पद्धती मध्ये निर्माण झाले आहे. या संस्कृतीला  प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रियांची स्वतःची ओळख फक्त मैत्रिणीसमोर किंवा मुलांसमोर....!!


         खरच,एका ठराविक वेळेनंतर रिकाम्या वेळेचा उपयोग कुठे करता त्या संस्कृतीच्या स्त्रिया? आपले विश्व कुठे... आपली ओळख कुठे ...कुणाची तरी पत्नी ...कोणाची तरी आई अमुकची मैत्रीण... तमुकची मैत्री...!!

   हो!का?? ती मला इथे भेटली ?तिथे भेटली? सांगू का? सांगू नको ह?  कुणाचा कुणाला अमुक-तमुक चा मुलगा मुलगी भेटतात. असा कितीतरी गोष्टींना हा ,"रिकामा वेळ" या स्वातंत्र स्त्री विश्व संस्कृतीच्या वर्ग समाज मान्यतेनुसार सर्वीकडे बातम्यांचा संचार करणारी.

       मग प्रश्न पडतो,खरंच! स्वातंत्र्याच्या इतका उपयोग करून घेतल्यावर हे कसे लक्षात येत नाही की या संस्कृती चा उपयोग येणारी पिढी सुद्धा (काही स्त्री व महिला) घेतील. काही ना फक्त आपल्या आयुष्यात या संस्कृतीचा उपयोग घेण्यासाठी संपूर्ण आयुष्यपणाला लावतात.(#अपवाद) या स्त्रियांच्या सुद्धा लक्षात येत नाही.

  असो,  विषय वाढेल. पण अरुंधती सांगते ते ही बरोबर आहे. (टीव्ही मालिका - आई कुठे काय करते?) एका वयानंतर जर स्त्रियांना या सारख्या प्रश्नांना समोर जावे लागत असेल तर काय करावे ? हे सत्य समाजमान्य सांगून जाते म्हणून स्वतःजवळ एखादी कला असू द्या! चार पैसे असू द्या !स्वतःची छोटीशी का होईना स्वतःपुरते का होईना पण ओळख असू द्या! पैसा सर्व काही असेल आणि पैसा सर्व कही आहे
तरी व्यवहार मात्र फक्त पैशाने होत नाही.

        समाजमान्य संस्कृतीने होत नाही. रिकामटेकड्या विचारांनी होत नाही. वेळ जात नाही म्हणून चुगल्याचपाट्यानी होत नाही. संसार त्यातील व्यवहारवाद सांभाळून सुद्धा आपली ओळख स्वतःच स्वतःसाठी निर्माण करता येते. अशा कितीतरी गोष्टी आहेत त्या आपल्याला करता येतात.


          "अरुंधती", ज्या संघर्षातून जात आहे. त्या संघर्षातून समाजातील कितीतरी स्त्रिया स्वतःचे आयुष्य व्यतीत करीत आहे.. जात आहे. या संघर्षाला नवीन पिढी सुद्धा अपवाद नाही. फक्त त्याचे स्वरूप थोड्याफार प्रमाणात बदललेला आहे आणि हा बदल फक्त शिक्षणामुळे झालेला आहे. आणि त्यांचे प्रतिनिधीत "अरुंधती", ही स्त्री करीत आहे. असे मनात वाटून जाते. पण तो संघर्ष तिच्या वाटेला का आला? त्यामागच्या कारणांवर न बोलता... त्या मागच्या परिस्थितीवर न बोलता फक्त शोषित स्त्री संघर्ष तेवढा समाजासमोर मांडला जात आहे. तर मग चूक कुणाची? त्या पुरुष प्रधान संस्कृतीची की उच्चभ्रू उच्चशिक्षित मानसिकतेची ? सबकुछ चलता है यार ...???या समाजमान्य मानसिक गुलामगिरीची.
        यावर सुद्धा भाष्य समाजातील विचारवंतांनी आणि सिरीयल मधील लेखकांनी समाजासमोर मांडावी. ज्या कारणाने नवीन पिढीला आपण त्या पुरुषी संस्कृतीपासून कुठेतरी आळा बसू शकतो.

         असो, लहान तोंडी मोठा घास घेतला असे... शेवटी वाटले पण लिहिण्याच्या ओघात समोर आलेली ही नवीन संस्कृतीचा भाग झाले, तर बरे असे मनात येऊन गेले. अजूनही या संस्कृतीचा अनुभव घ्यायचा आहे. पण एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून जगतांना या संस्कृतीचा भाग कधी होईल असे वाटत नाही.(हा.. हा...)  कारण स्वातंत्र्य विचार हे कधीही बंडखोरी करते स्वतःशी सुद्धा..!!

            ही संस्कृती ही खूप काही सांगून जाते. म्हणून स्वतः स्वतावर विश्वास ठेवा. स्वतः स्वतःशी खोटे बोलू नका. कारण आयुष्य आपले आहे. आयुष्यातील प्रश्न आपले आहे. ते कसे व्यतीत करायचे हे आपल्याला माहित आहे.तसे स्वातंत्र्य ,"भारतीय संविधानाने", दिलेले आहे.


जगाच्या रितीभातीत जगताना 
आयुष्यात इतरही गोष्टी 
आहेत... जगणारे! याकडे दुर्लक्ष 
करताना विचार थांबवू नका 
आज मी आहे उद्या कदाचित तुम्ही
असाल नवसंस्कृतीचा उपयोग करतांना 
जुन्या पिढीचा विसर पडू 
देऊ नका... जगण्याच्या रितीभातीत...!!


                सत्य कटू असले तरी ते सत्य आहे. जगताना फक्त आजुबाजूची परिस्थिती याकडे दुर्लक्ष करू नका. हीच परिस्थिती तुम्हाला शक्ती प्रदान करते आणि दुबळे ही बनवते.     

        विशेष करून स्त्रियांना...!!! त्यांच्या आयुष्यात जगताना खूप वेगवेगळ्या वणव्या मधून जावे लागते.तर तो वणव्या कधी ओल्या असते तर कधी वाळलेला पण वनवा असतोच.....!!!
        

       ✍️©️®️सविता तुकाराम लोटे 

©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- *** वणव्या अस्तित्वाचा ***


         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.




❤❤❤❤❤❤❤❤❤❤✍️🏻❤✍️🏻✍️🏻✍️🏻💓❤💓💔✍️🏻💔👌🍫👌😷😀🤗💖😷😁😀🎂🤗🐱😀😉

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...