savitalote2021@bolgger.com

मराठी साहित्य विद्रोही साहित्य दलित साहित्य बाबासाहेबांच्या काव्यसंग्रह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी साहित्य विद्रोही साहित्य दलित साहित्य बाबासाहेबांच्या काव्यसंग्रह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०२४

दुःख

       आयुष्यात दुःखाचा हंबरडा दाही  दिशेने आपल्या समोर येत आहे पण आपली वाट जी बाबासाहेबांनी आपल्याला दिली आहे जी प्रकाशाची आहे ती वाट आपण सोडायची नाही का ?कशासाठी ..? याच भावविश्वातून, याच भावसंवेदनेतून  याच पार्श्वभूमीवरून ही कविता.      
       आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन केल्या जाईल. धन्यवाद....!💕

**** दुःख ****

दुःख दुःख करत बसू नको 
बाबासाहेबांनी दिलेला पायवाटेवरून 
चालत रहा, जगण्याला बळ देईल 
ऊर्जा देईल मन स्वच्छ निर्मळ 
वाहते राहील विद्रोहाचा रणभूमीवर 

वाहते राहणे अटळ आहे 
वादळ कधीही येऊन 
गिळून जाईल म्हणून 
दीक्षाभूमीची वाट तेवढी 
माहीत करून ठेव 
संदेश देणाऱ्या स्तूपाला चौफर 
घट्ट आलिंगन देऊन ठेव 

वेदनेचा आविष्कार होत राहील 
पण विचारांचे तेज काळोखात 
जाऊ देणार नाही 
जगण्याची वाट बाबासाहेब 
देऊन गेले गतीचे चक्र फिरून गेले 
मुक्तीचा लढा लढून गेले 
समानतेच्या न्यायावर नवीन 
फुले वाहून गेले 
म्हणून दुःख दुःख करत बसू नको 

जागृतीचे केंद्र जबाबदारीने 
आपला खांद्यावर देऊन गेले 
अंधाराचा अस्त करून काटेरी 
जगण्याची वाट प्रकाशमय 
वाटेत परिवर्तित करून 
मानवतेचा नवीन संदेश 
आयुष्याला देऊन गेले 
म्हणून दुःख दुःख करत बसू नको 

परिवर्तनाचा सूर्य 
जगण्याची प्रकाशवाट 
पाण्याचा रंग आपलाच  
श्रद्धेने आपल्याजवळ ठेवूया 
जळणारे जळत राहतील 
वादळे येत राहतील 
पण मानवतेच्या सोनेरी पहाटेला 
आपण आपल्या दीक्षाभूमीच्या 
प्रकाशमय तेजाने क्रांतीची ऊर्जा 
समानतेच्या बीजाने 
समाज रचनेच्या मातीत पेरू या 

दुःख दुःख करत बसू नको 
बाबासाहेबांनी दिलेल्या पायवाटेवरून 
चालत राहा 
दीक्षा एक आरांभ नव युगाच्या 
मानवतेच्या क्रांतीचा
जबाबदारीने वागू या 
मानवतेच्या वटवृक्षाला घट्ट 
मातीत पेरू या 
विचारांची नवीन पायवाट 
दिसणार नाही पण बाबासाहेबांनी 
दिलेली लाट आपलीच आहे 
दीक्षा एक आरंभ नव युगाचा 
इवल्याशा पावलांचा इवल्याशा 
पावलांसाठी.. !!💕

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------
        In life, the burden of sadness is coming in front of us from the right direction, but don't we want to leave our path which Babasaheb has given us which is the path of light? For what..?  This poem is written from the same background, from the same feeling.      
         Don't forget to like and share if you like.  The poem is handwritten and composed. If there are any mistakes, please let me know in the comment box.  It will be researched.  Thank you....!💕

 **** sadness ****

 Don't be sad 
 From the path given by Babasaheb 
 Keep walking, life will give strength 
 Energy will give the mind clean and clear 
 The rebellion will continue to flow on the battlefield 

 Flowing is inevitable 
 The storm never came 
 will be swallowed 
 Waiting for Diksha Bhoomi 
 Keep it informed 
 Chauffeur to the Stupa delivering the message 
 Hold tight 

 Pain will continue to be invented 
 But the brilliance of thoughts in the dark 
 Will not let go 
 Waiting to live, Babasaheb 
 The wheel of momentum has been given away 
 The battle of liberation was fought 
 New on equality justice 
 The flowers were washed away 
 So don't be sad 

Center of awareness responsibly 
 Passed on your shoulders 
 thorny after the dark 
 Life is bright 
 By converting along the way 
 Humanity's New Message 
 Gone to life 
 So don't be sad 

 The sun of transformation 
 A living light 
 The color of the water is yours  
 Let us keep it with us in faith 
 Burners will burn 
 Storms will keep coming 
 But at the golden dawn of humanity 
 You are the land of your initiation 
 The energy of revolution with luminous brilliance 
 With the seed of equality 
 Let's plant in the soil of social structure 

 Don't be sad 
 From the path given by Babasaheb 
 keep walking 
 Initiation is the beginning of a new era 
 The Revolution of Humanity
 Let's act responsibly 
 Tight to the banyan tree of humanity 
 Plant in the soil 
 A new way of thinking 
 Babasaheb will not see it 
 The given wave is yours 
 Diksha is the beginning of the New Age 
 So many steps 
 For steps.. !!💕

 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

            The blog is my home of words.  The mind is happy while picking the flowers of poems, now you must visit the blog to pick those flowers.  I express my feelings in such a way.  Welcome to this human threshold of words.  If you have come to this threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
            If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------


         

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...