savitalote2021@bolgger.com

सोमवार, १२ डिसेंबर, २०२२

*** व्यक्त ***

**** व्यक्त ****

वेळेतच स्वतःला स्वतःशी 
व्यक्त होणे कळले 
की समोरचा अविश्वासू 
वेळ आपल्यासोबत 
जवळीक साधत नाही 
म्हणून व्यक्त व्हा, 
स्वतःशीही आणि इतरांच्या 
चुकीला 
सुद्धा वेळ 
परत कधीच येत 
नाही...!

      ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .  

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

*** साक्षी ***

**** साक्षी **** 

थंडीची लाट आणि धुक्याची 
चद्दर साक्षी आहे 
आपल्या नात्याला 
रुजविण्यासाठी 

शांतता मनातील बेभान 
हसूची साक्षा आहे 
काळोखातील चंद्र तारे सोबत 
गार 
वारा सुद्धा,

मन अजूनही चालत जाते 
त्याच वाटेवर 
शांत निरागस होत 
अंगावर धुक्याची चद्दर घेत 

पण आता एकटीच..! 
सोबतीला आठवणींचा 
पाऊस आणि तुझे अस्पष्ट 
बोल ..

हसऱ्या नयनांचे 
थरथरत्या ओठांचे थंडीची 
लाट आणि  
धुक्याची चद्दर साक्षी आहे 
अजूनही...!!

      ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
=============================

** आठवणींचा खेळ ****

**** आठवणींचा खेळ ****

चल विश्रांती घेऊया 
थोडी आठवणींच्या 
ओळखींमधून 

शब्दांच्या हिंदोळ्यांवर 
न खेळता खेळूया 
खेळ अबोलपणाचा 

माझा तू माझ्याच 
आठवणींमध्ये बरा 
चल परत खेळ खेळूया 

पुस्तकातील पत्रांचा आणि 
जपून ठेवूया ते 
आठवणींच्या स्वरूपात 

सुगंधही वाळलेल्या 
फुलांसोबत चल 
विश्रांती घेऊया 
थोडी....!

        ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

* प्राजक्ता *

**** प्राजक्ता *****

प्राजक्ताची फुले 
अंगणातील झाडावर 
फुलले आता 
पण माहित नाही 
किती काळ झाडाच्या 
फांदीच्या मिठीत राहील
 प्राजक्ता तर अंगणात 
सुरेख रांगोळीच्या 
स्वरूपात ...!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

=============================

.... रिकाम्या जागा....

..... रिकाम्या जागा.... 

स्वप्नांचा बाजार सुटला की उरतो 
फक्त प्रश्नचिन्हांचा 
बाजार 
त्यावेळी कळते, 
घरातले रिकामपण 
नसलेले विश्वासाचे 
आपलेपण आणि रिकाम्या 
झालेल्या खुर्च्यावरचे 
अस्तित्व उरतात फक्त 
अश्रूंचा महापूर 
नयनाच्या आतच 
मनातले प्रेम 
भिंतीवरच्या 
प्रेमात विलीन झाले की 
स्वप्नांचा 
बाजार सुटला की...!!

   ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

               कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤

=============================
 
..वाटेवर....

....वाटेवर.... 

चलायच आज 
परत त्याच वाटेवर 
त्याच ठिकाणी 
जिथे सूर्य मावळतो 
आपल्या हसऱ्या 
स्मित हास्यसोबत 
रंगबिरंगी रंगांची 
उधळणीसोबत 
नवीन स्वप्न 
नवीन पहाटेची 
हातात हात 
घेत..!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे  

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

            कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤

============================

💕...!डायरीमध्ये..!💕

💕...!डायरीमध्ये..!💕

जगण्याच्या डायरीमध्ये 
पूर्णविराम हा कधी 
नसतोच 
कारण जगण्याची वाट 
मोकळी कधी नसतेच 
म्हणून पूर्णविराम 
शोधण्यापेक्षा 
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये 
आनंद शोधूया 
वाट मोकळी नसली 
तरी आपली असेल 
जगण्याच्या डायरीमध्ये..!💕

         ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

=============================
  
तुझ्यासाठी...❤

❤ तुझ्यासाठी...❤

 परत एका भेटीच्या 
अपेक्षेने 
शब्दांचा पसारा मांडला 
येथे ओलावलेल्या 
आठवणींना 
वाहते केले 
नवीन शब्द धारेबरोबर 
तुझ्यासाठी फक्त 
तुझ्यासाठी...❤

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

           कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤

================!=====!===!!=!!!!

शब्दाविनाच...!!

....शब्दाविनाच...!!

भावनेचे शब्द होऊ नये 
प्रयत्न सतत असतो 
पण भावना 
शब्दातच मांडली 
जाते त्याला 
उत्तर एकच असते 
बोलके शब्द  
अबोल भावना 
शब्दाविनाच...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤

💕💕💕💕💕💕💕🌹🌹🌹🌹💕💕💕

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...