savitalote2021@bolgger.com

सकारात्मक कविता स्त्री कविता संग्रह कविता स्त्री कविता Marathi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सकारात्मक कविता स्त्री कविता संग्रह कविता स्त्री कविता Marathi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २१ मे, २०२१

-----यात्रा-----

-------यात्रा-------

दुःखाच्या आकाशात धावून धावून 
थकलेल्या जीवा... 
थोडा मागे पहा 

सापडेल वाट सुखाच्या धावपट्टीची  
गगन भरारी घेण्यासाठी 
फक्त चालत राहा 

सहनशीलतेच्या कसोटीवर 
वेगवान होऊन कधीकधी 
शांत संयमाने भरारी घे! 

आत्मविश्वासाने तोल सांभाळत 
पाय असू दे जमिनीवर 
कमळासारखे चिखलात राहूनही 

बोलके हो मनसोक्त 
उडण्यासाठी सुखाच्या पायरीवर 
जीवन प्रवासाच्या यात्रेत!!

        सविता तुकाराम लोटे 
----------------------------------

राहूनच गेले ( प्रेम कविता )

एक प्रेयसी आपल्या प्रियकराच्या मेसेज साठी वाट बघते आहे पण तो मेसेज आल्यानंतर त्याच्याकडून नात्यात मर्यादा आहे याची आठवण करून देणारी ही कविता...