savitalote2021@bolgger.com

मराठी कविता मराठी लेखप्रेम कविता सकारात्मक कविता मराठी चारोळी चारोळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कविता मराठी लेखप्रेम कविता सकारात्मक कविता मराठी चारोळी चारोळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १२ डिसेंबर, २०२२

** आठवणींचा खेळ ****

**** आठवणींचा खेळ ****

चल विश्रांती घेऊया 
थोडी आठवणींच्या 
ओळखींमधून 

शब्दांच्या हिंदोळ्यांवर 
न खेळता खेळूया 
खेळ अबोलपणाचा 

माझा तू माझ्याच 
आठवणींमध्ये बरा 
चल परत खेळ खेळूया 

पुस्तकातील पत्रांचा आणि 
जपून ठेवूया ते 
आठवणींच्या स्वरूपात 

सुगंधही वाळलेल्या 
फुलांसोबत चल 
विश्रांती घेऊया 
थोडी....!

        ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

त्याच हसू

** त्याच हसू ** त्याच हसू  मनाला जगण्याचे बळ देते  रित्या मनाला स्वप्नाची पायवाट न दाखवता  जगण्याची रीच शिकवते  त्याच हसू  चेहऱ्यावर स्माईल ...