..... रिकाम्या जागा....
स्वप्नांचा बाजार सुटला की उरतो
फक्त प्रश्नचिन्हांचा
बाजार
त्यावेळी कळते,
घरातले रिकामपण
नसलेले विश्वासाचे
आपलेपण आणि रिकाम्या
झालेल्या खुर्च्यावरचे
अस्तित्व उरतात फक्त
अश्रूंचा महापूर
नयनाच्या आतच
मनातले प्रेम
भिंतीवरच्या
प्रेमात विलीन झाले की
स्वप्नांचा
बाजार सुटला की...!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤
=============================