savitalote2021@bolgger.com

मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

सुकलेला गुलाब मराठी कविता



  काळ बदलला तरी भावना बदलत नाही. आयुष्याचा प्रवास बदलला तरी आठवणी बदलत नाही आणि  तारुण्याच्या नाजूक वेलीवरची भावना बदलत नाही..., ही सांगणारी कविता.                      आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.
        काही सूचना असल्यास नक्की कळवा. कविता आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर नोंदवा...!!

....... सुकलेला गुलाब ......

काल परवा डायरीतला 
सुकलेला गुलाब सुगंधित झाला 
सुगंधित आठवणीत मन ओले 
झाले त्यांने दिलेला गुलाब 
आजही डायरीत सुगंधित आहे 
काल - परवा सारखाच

त्या गुलाबाला स्पर्श होता 
त्याच्या आठवणींचा 
शब्दात भिजलेल्या त्या नवप्रवासाचा 
मनमोकळा गुलाब सुकला असला 
तरी खिडकीबाहेरचा अंधारात 
आठवणींचा पाऊस बरसतच 
काल - परवा सारखाच
 
सुगंधहीन गुलाबाला सुगंध 
दरवळत असतो 
मनात  गंध भिडतो 
हृदयाला स्वर भेटतात 
अबोल मनाला अधुऱ्या मिठीतली 
ती कहाणी 
जगण्याची खिडकी बंद झाली 
तरीही शांत दुर्मिळ कठीण प्रवासाची 
ती वाट अजूनही गुप्तपणे 
सुगंधीतच आहे ओंजळीतल्या 
.....डायरीत 
काल - परवा सारखीच ❤❤!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

..... dried rose .....

 The day after yesterday in the diary
 A dried rose became fragrant
 The mind is wet with fragrant memories
 A rose given by him
 Even today, the diary is fragrant
 Same as yesterday

 That rose was touchy
 Of his memories
 Of that neopravasa drenched in words
 Even if the free-spirited rose has withered
 But in the dark outside the window
 Rain of memories
 Same as yesterday

 A fragrance to a scentless rose
 moving around
 The smell hits the mind
 Tones meet the heart
 Abol Mana's incomplete embrace
 That story
 The window of survival closed
 Still a quiet rare arduous journey
 That path is still secret
 It is fragrant
 .....in the diary
 Same as yesterday - day after day ❤❤!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
             The blog is my home of words.  I express my feelings in such a way that I can understand.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to the threshold of God, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔
=============================



माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...