कधी कधी....
एखादा दिवस...!!!
कधी कधी शब्दांचा पाऊस येतो. कधी कधी शब्द निशब्द होतात. मनाला कधी कधी विश्रांती घ्यावीशी वाटते आणि तेव्हाच शब्द चुरगळले जातात.
मेंदूतील निराळेच गणित ओथंबून येतात. ओल्या शब्दांसोबत...!! कधी कधी दुःखाची पाने आपलीच असतात. शब्द आपलेच असतात .गोड कडू अनुभवांचे झालर आनंदाची पाने घेऊन जातात. रोज नवे रंग लेखणीचे सोबत घेऊन आणि मागे सोडून जातात शब्दांचा ओला पाऊस... ओथंबून आलेले क्षण ओले गमावलेल्या क्षणांना पदरात घेऊन.
कदाचित एखादा दिवस असाच निघत असावा सगळ्यांच्या दैनंदिन जीवनात पण अशा वेळी काय करावे कळत नसले तरी काय करू नये हे मात्र कळते भावनांचे पाने चुरगळले जातात आणि नवीन भावना पदरात येतात.
(......✍️🏻सविता तुकाराम लोटे...)
दिवस शब्दांशिवाय हसत-खेळत जातो. काय गमावले, त्यापेक्षा काय मिळविले याकडेच मेंदू जास्त विचारधीन असतो.
असो प्रत्येकांची आनंदाचे पाने वेगवेगळे असतात. प्रत्येकांच्या शब्दांचा पाऊस वेगवेगळा असतो. प्रत्येकांच्या रंग लेखणीचे शब्द निरनिराळे असतात. भावना वेगवेगळ्या असतात पण एक सत्य असते ते म्हणजे," येणारे क्षण आणि गेलेले क्षण."
अनुभवाची शिदोरी मात्र आपल्याला देऊन जातात.
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- कधी कधी....
एखादी दिवस...!!!
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!
===========================