savitalote2021@bolgger.com

निसर्ग कविता सकारात्मक कविता प्रासंगिक कविता marathi kavita google लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निसर्ग कविता सकारात्मक कविता प्रासंगिक कविता marathi kavita google लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २२ मे, २०२१

ढग





**********  ढग।  ***********

दाटून आलेले ढग माझ्यासमोर 
आकाशात आणि मनात सुद्धा 
जोरात वारा आला... गर्दी करून
मनात कोसळला अन ढगातून 

काळा मातीवर चिंब भिजून 
डोकावले मी परत 
भिजलेल्या माती रूपावर 
तर हळूवार येत असलेली 

हिरवळ मनाला बळ देऊन गेली 
थेंबाथेंबाने ओलेचिंब होऊन 
दाटुन आले परत आसमंत 
फुललेल्या सरीसोबत 

जोडीला पानांवर 
दवबिंदूचे रूप ठेवीत 
दाटून आलेले ढग 

माझ्यासमोर... 
आकाशात आणि मनात

     ©️ सविता तुकाराम लोटे ✍️
-----------------------//---------

          

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...