💕💕माझे बाबा 💕💕
बाप नावाचा व्यक्ती आयुष्यभर झटत राहतो. सोबत मनात अनेक स्वप्न इच्छा घेऊन ......आव्हानांना तोंड देत. शून्यातूनही जग उभा करणारा आपला बाप !!कालच्या झाडावर मोहर येत नाही हे सत्य हे वास्तव सगळ्यांनाच माहित आहे म्हणून बापाच्या परिश्रमामुळे आपल्या समोर लक्झरी लाईफ मेट्रो लाईफ आयुष्याच्या क्षणाक्षणाला उपभोगणाऱ्या वस्तू या सर्वच आई बापाच्या अथक परिश्रमाने आलेले असतात.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 मनातल्या कुठल्यातरी टप्प्या समाधानाच वास्तव असणारी जागा म्हणजे आपला बाप. घुसमटत चाललेल्या आयुष्याला आधार म्हणजे आपला बाप... आभाळ ठेंगण होतं आपल्या कर्तुत्वाने त्याचा पाया रचणारा आपला बाप !!डोळ्यातले पाणी डोळ्यात घेऊन जाणारा आपले बाबा , ते सोबत घेऊन जगणारा आपला वाघासारखा बाबा....!❤❤❤❤❤❤❤❤ समुद्राची खोली किती आहे माहित नाही तितक्या खोल भावना असणाऱ्या आपले बाबा कळकट मळकट कपड्यांमध्ये रुबाबदार दिसणारा आपले बाबा. आपल्याच विषारी क्षणांना समुद्रमंथनातील विषाला जसे महादेवाने गळात धारण केले तसे आपले बाबा. आपल्या सर्व चुकांना पोटात कुलूप लावून ठेवतात, आपल्या शिक्षणासाठी दिवस रात्र मेहनत करणारा दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करणारे कष्टाचे दिवस म्हणजे आपले बाबा. अतोनात अनंत अन गणित क्षणांना वेचून आपल्यापर्यंत सुखाची पायवाट घेऊन देणाऱ्या आपले बाबा वेळ पडेल तेव्हा वेगवेगळे भूमिकेत उभा असणारा आपला बाप.
💕क्षणाक्षणाला आठवणीच्या स्वरूपात उभा असणारा माझे बाबा💕💕💕. कितीतरी क्षणांमध्ये तळहातातल्या फोड्या सारखा जपणाऱ्या माझ्या बाबाला हॅपी फादर डे तुम्ही जिथे कुठे असाल तिथे खुश रहा..... हसत रहा... आयुष्याने शेवटच्या क्षणात घाव घातला आणि तुम्ही नसूनही प्रत्येक क्षणाला सोबत असता भिजलेल्या नयनाने तर कधी हसरा डोळ्यांनी love u dadji ....❤😀
लव यू बाबा❤❤❤❤
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
=============================
****#happy Father's Day ****
💕💕My dad 💕💕
A person named father keeps striving throughout his life. With many dreams and wishes in mind...... facing challenges. Our father who built the world even from nothing !! Everyone knows the fact that yesterday's tree does not get stamped, so because of father's hard work, all the things in front of us, luxury life, metro life, which we enjoy moment by moment of life, all these things have come with tireless work of mother and father.
The place in the mind where the satisfaction is real at some point is our father. Our father is the support of our busy life... A father like a tiger....!❤❤❤❤❤❤❤❤❤ Our father who has feelings so deep that you don't know how deep the ocean is. Our father holds his toxic moments like the poison in churning ocean. All our mistakes are locked in the belly, our father who works hard day and night for our education and days of hard work who makes night day is our father. Our father who takes infinite and uncountable moments and takes the path of happiness to us, our father who stands in different roles when the time comes.
💕My dad who stands in the form of memories every moment💕💕💕. Happy Father's Day to my dad who cherishes me like a blister in my palm in many moments. Be happy wherever you are..... Keep smiling... Life hurt at the last moment and even if you are not there, you are with me every moment with a wet look and sometimes with smiling eyes love u dadji. ...❤😀
Love you dad❤❤❤❤
✍️Savita Suryakanta Tukaram Lote