savitalote2021@bolgger.com

प्रेम कविता विरह कविता आयुष्य कविता सामाजिक कवितामराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता विरह कविता आयुष्य कविता सामाजिक कवितामराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

केलेल्या श्रृंगाराची .......


..... केलेल्या श्रृंगाराची .......

साधेपणा त्याला आवडायचा 
जीन्समध्ये असले का 
की ड्रेस मध्ये 
काही फरक पडायचा नाही 
पण एक दिवस मीच 
माझे प्रेम व्यक्त केले  
झुमके कंगन पैंजण 
नेलपेंट बिंदी नयनात काजळ 
न घालणारी मी त्या दिवशी घातले 
आणि प्रेमाला वेगळेच 
रूप मिळाले 
नको होती ती भावना 
नको होता तो स्पर्श 
जो आधी नव्हता 
प्रेम तर तिथेच संपले 
पण कडू आठवणी 
मात्र.... 
मनात घर करून अजूनही 
कधीही कुणाच्या प्रेमात 
न पडाव इतकी आत 
जखम ती.... 
केलेल्या श्रृंगाराची!!

 ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

=====🌹🌹🌹❤❤❤❤🌹🌹🌹====


.. of makeup done .. .

 He liked simplicity
 Is it in jeans?
 In that dress
 It doesn't matter
 But one day I
 Expressed my love
 Jhumka Kangan Painjan
 Nail Paint Bindi Nayanat Kajal
 I wore the one that I didn't wear that     day
 And love is different
 Formed
 That feeling was not wanted
 Unwanted touch
 Which was not there before
 The love ended there
 But bitter memories
 But...
 Still in my mind
 Never in love with anyone
 Don't fall so far inside
 The wound is...
 The makeup done!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

      Aware of your arrival, your reaction is yes.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

===========❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤=======

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...