savitalote2021@bolgger.com

मराठी कविता चारोळी आयुष्य कविता स्त्री कविता सकारात्मक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कविता चारोळी आयुष्य कविता स्त्री कविता सकारात्मक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२

सजलेली बाहुली संस्कृतीने

      स्त्री विश्वातील एका भावविश्वाचे दर्शन आज परत झाले. हसत खेळत सजलेली स्त्री आज परत मला वाळलेल्या बाभळीसारखी दिसली.
       बाहुली झालेली, क्षमता असूनही उडताना न येण्याची साक्षी परत मी झाले. त्या क्षणांवर उपस्थित असलेल्या स्त्री वर्गाची व्यथा कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
      कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


......🌹सजलेली बाहुली संस्कृतीने🌹.........

आज बाभळीचे दर्शन झाले 
सुकलेल्या शून्यवत 
क्षमता असलेली तरी
हिरवळीचे नावनिशाण नसलेली 
ती वाहत होती तिच्या आजूबाजूने 
बरसत होती येता - जाता 
तिच्यावर पण ती हिरवी झालीच 
नाही नवऋतूसारखी 
ती बंदीवान होती त्या बाभळीसारखी

काळजात घुसमट सारी 
परकरावरील फुलांचा चुराडा झालेल्या 
वयात आलेल्या 
आयुष्याचे देण हातात चुडा 
इवल्याशा पायात पैंजण 
दुःखाने भरलेल्या बंद घट्ट 
चिटकून असलेला बाईपणाच्या 
ती बंदीवान होती त्या बाभळीसारखी 
तरी एकटीच

आयुष्याच्या कर्तव्याची आता 
दळण झाले तरी 
भरडली जात आहे त्याच 
व्यवस्थेमध्ये दुःखाच्या पण न सरलेल्या विविधतेने नटलेल्या पण घट्ट 
चिटकून असलेल्या स्त्रियत्वाच्या 
संस्कृतीने सजलेली 
ओठांवर हसू आणि पायात 
जोडव्यांच्या साक्षीने उडू पहात 
आहे पंख छाटलेल्या 
पक्षासारखी तरी
ती बंदीवान होती त्या बाभळीसारखी

तोडावे म्हटल तर तोडत न येणारे 
आपलेच घट्ट चिटकून आहे 
दळण दळते आहे 
सुखाच्या सुवासिक काल्पनिक
जगात उडते आहे....
ती बंदिवान आहे 
त्या बाभळीसारखी 
सुकलेल्या शून्यवत 
क्षमता असलेली...!!

        ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

      कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर नोंदवा...! धन्यवाद..!!🌹

=============================


          The vision of a soul in the world of women returned today.  The woman dressed up smiling and playing again looked like a dried acacia to me today.
 I was again witness to the doll, unable to fly despite her abilities.  An attempt has been made to present the pain of the women class present at those moments in the poem.
 The poem is self-written and composed.  Don't forget to like and share if you like.




.....🌹decorated doll with culture🌹..........

 Acacia was seen today
 Dry void
 Although capable
 Green nameless
 It flowed around her
 It was raining on and off
 It turned green on her too
 Not like Navruti
 She was like the captive Acacia

 Kaljat Ghusmut Sari
 Crushed flowers on Parkara
 coming of age
 Take the gift of life
 In this way, Panjanan
 Tight shut full of grief
 A clingy woman
 She was like the captive Acacia
 Still alone

 The duty of life now
 Even if it is crushed
 The same is being filled
 In the system, there is a variety of sad but not moved, but tight
 of clinging femininity
 Adorned with culture
 Smile on lips and feet
 Watching the couples fly by
 Is the wings clipped
 Like a party
 She was like the captive Acacia

 If you want to break it, you can't break it
 Yours is firmly stuck
 The grind is grinding
 Fragrant fantasy of pleasure
 Flying in the world...
 She is captive
 Like that acacia
 Dry void
 Capable...!!


✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
       Make sure to register your opinion in the comment box...!  
          Thank you..!!🌹


माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...