जीवनातील सत्य समोर आली की कळते निसर्गाने सर्व गोष्टी कशा का निर्माण केले असेल. ऋतुचक्रनुसार फुले फुलतात, फळे येतात, पानगळ होते, परत पालवी येते.... श्रावण फुलते , चोहीकडे. हिरवेगार आणि हिरवेगार ....ऊन पाऊस थंडी निसर्ग नियम कसे तयार केले असेल; हे न समजणारे कोडे आहे.
म्हणतात नियम हा न बदलण्यासाठी असते. कधीकधी तो बदलावा लागतो. निसर्ग आपला नियम बदलतो आणि मानवी स्वभाव मात्र न बदलणारा!! ' व्यक्ती तितक्या प्रवृत्ती',या म्हणण्यानुसार समाधिस्त होत राहते. वाट पाहत राहावे लागते... वेडी आशा मनाला असते.
बदलेल... बदलेल कधीतरी बदलले पण तो ना बदलणार असतो. म्हणतात," पळसाला पाने तीनच", म्हणी नुसार..!!!
मानवी प्रवृत्ती वेगवेगळे असते. भावना कल्पना विचार मनस्थिती भिन्न असतात. अभिव्यक्ती वेगळी असते... मानवी स्वभाव कधी न बदलणार असतो .सुखदुःखाच्या स्मृतीच्या गाभा प्रत्येक वेळी त्यांच्या सोबत असते. नव्या पालवे अंकुरतात तसे विचार मेंदूतून अंकुरित असतात. श्रावणात माळरानावर जसे फुले फूलता आणि वाऱ्यासोबत ते डोलत रहतात ते बहरलेले रान नवनवीन कल्पना निर्माण करीत असतात अगणित!!
क्षण सृष्टीचे आपल्या समाजात आपल्या आयुष्यात ते देऊन जाते. घेणेदेणे या दोनही गोष्टी एकाच वेळी चालू असतं. प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत असते... नव्याने शोध घेता घेता डोळे पापणीआड करून सत्य लपविले जाते. अचानक आलेल्या परिस्थितीकडे हळव्या क्षणाला स्वतःचे सामर्थ्य निर्माण करू पाहतात. अशी माणसे म्हणतातना ,"पळसाला पाने तीनच", !!
मानसिकता कधीच बदलत नाही. सुखदुःखांच्या इतरांच्या मनाचा पालापाचोळा करीत असतो. एरवी आपण चालून घेतो ....ही मानसिकता! पण कधीकधी या अंधारलेल्या मानसिकतेमुळे कितीतरी लोकांचे स्वप्न विचार कल्पना नष्ट होतात. मनाचा कोंडवाडा होते... बोलता येत नाही आणि सांगताही येत नाही. शरीराला हळूहळू स्पर्शातून निघून जातात त्यांच्या बद्दलच्या हळूवार असलेल्या भावना विश्वास. पात्र नसलेली व्यक्ती होऊन जाते त्यावेळी आणि सामोरे ते एक सत्य ,'पळसाला पाने तीनच' असतात.
मनाला यातना होत असताना माणूस स्वार्थी का होतो कळत नाही. सतत सतत तेच उगाळले जाते. मौन असले तरी गोजिरवाणे केले जाते. आवरताही येत नाही सावरताही येत नाही. निवांत शांतता. उन्हाचा चटका मनाला नाही तर मेंदूला लागत असतो. सोसवते तेवढे सोसत राहायचे आणि पवित्र म्हणायचे हे ठरवले तरी कुठपर्यंत???
प्रश्नांची उत्तरे मात्र मिळतच नाही. पळसाच्या पानासारखे. कडूलिंबू स्वभावाने कडू....त्याला गोड आंबट कोणत्याही प्रकारात शरीरात घेतले तरी कडूच. स्वभाव गुण बदलत नाही तसेच काही व्यक्तींचे!!!
स्वभावाला औषध नसते!!
आयुष्य ही जवळपास तसेच आहे आयुष्यात ज्या झाडांवर कितीही फुले फळे पाने आली तरी पानगळ सहन करावेच लागते. आयुष्य आनंदी असावे असे सतत वाटत राहते. पण आयुष्यात अनुभव येत राहतात. अनुभव देत राहतात... आनंद लुटत राहतात. सुखदुःखाच्या पळसाच्या पानातील सत्यसारखे.
सतत वाटत राहते
इच्छा-आकांक्षा नको
पण त्याच आडवे येतात
क्षणभंगुर सत्यसोबत
अनगणित...
लाल पिवळ्या फुलांनी फुललेल्या
फुलांसोबत आणि नष्ट होतात
मानवी प्रवृत्ती
पळसाला पाने तीनच
स्वभावासारखे
लाखमोलाची शिकवण
मानवी प्रवृत्तीची...
कधी आनंद कधी दुःख कधी निराशेच्या वाटेवर चालताना एकटेपणाची भीती वाटली नाही... संघर्ष होता. प्रत्येकांच्या जीवनात असते. माहीत नसते तो कोणत्या वाटेवर आपल्याला घेऊन जात असतो. मनासारखे काही होत असते काही होत नाही... शब्दांना आपण आपले करतो पण इतरांच्या शब्दांचे काय? सगळे कसे अचानक नवनवीन विरोधाभास असलेले शब्द कसे आले आयुष्यात.
ऊन सावली झेलता झेलता अचानक महावादळ यावे चिखलासोबत तसे झाले. काही क्षणासाठी आयुष्य.... शब्दांचे नाते... शब्दांचे गाव... शब्दांचेच व्यक्तिमत्व... सुंदर अविचारी मानवी स्वभाव.... कदाचीत मानवी स्वभावाला पुसायला निघालेली पिढीजात जात !!! उत्तर सरळ असतात पण सरळपणा नसतो त्यांच्यामध्ये; पळस म्हणी जणू!! सहजच पण सहजतेल्या आपल्या स्वभावाने गुंतागुंत करीत राहतात.
असंख्य शब्दांची माळा गुंफत शक्य नसलेल्या गोष्टी शक्य करत. त्या बदल्यात नाही, पळसाच्या पानासारख्या. सतत एकाच भूमिकेत कपाळावरील रेषाच्या भाग्यरेषा सोबत सुखद आणि इतरांसाठी दुखद. पळसाच्या पानासारखे! अलगद हातातून निसटून जातात इतरांची किमती लाखमोलाचे क्षण शब्द. ते कवडीमोल केले जातात.निर्णयाची अंमलबजावणी फक्त त्यांच्या वाटेवर कारण ते बदलू शकत नाही कुणासाठी.
त्यांचे रक्त काळी झालेली असते जीभ. हृदयात पाणी आणि मेंदूत किडे सोयीनुसार. याच वणव्यात पेटविली जाते मनातील स्वप्न इतरांची.
सैरभैर होते मन त्यावेळी हरवून जाते. विचारांची वाट आटले जातात. सर्व शब्द जागे असतात. फक्त हरवलेली वाट सुकलेली फुलपाकळी चिंब भिजलेले आसवे... वाळवंटाचे जीवसृष्टी. कारण ते असतात पळसाचे पाने तीनच या स्वभाव धर्माची...!!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-*** पळसाला पाने तीनच ***
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!
************************************