*** वेदनेचे गाणे ***
पुरे आता झाले
वेदनेचे गाणे
मेंदूला मुंग्या येतात
वेदना सहन करता - करता
नयनातील अश्रू..
विरहामुळे कि वेदनेमुळे
मनाला कळतच नाही
आठवणीने माखलेल्या जखमेला
कळतच नाही!!!
शब्दांच्या कल्पकतेला
वास्तव वा स्वप्न आहे हे
वेदनेची...?
वादळ पुरे आता
विरहाचा कल्लोळ शांत
करून घे
वेदनेची वेदना
अंतर्मनात जपुन ठेव
पुरे आता झाले
वेदनेचे गाणे...!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
==========================