प्रेम व्यक्त करताना वेगवेगळ्या पद्धतीने ते व्यक्त केले जातात. वेगळी वाट ...वेगळी स्पंदने .....वेगळा प्रवास.... नेहमीपेक्षा.
अशी प्रेमाच्या त्या प्रवासात प्रवास करत असलेली प्रेयसी. तिच्या भावना शब्द स्वरूपात मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.!
' तू नवखा असला तरी....," या शब्दात ती तिच्या प्रियकरायचे वर्णन करते आणि त्यातूनच प्रवास होतो या कवितेचा. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.
आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.धन्यवाद...!!💕
*** विझलेल्या रानात ***
नवखा असला तरी
हरवून जातो
संवेदना प्रवाहाच्या वळणावळणावर
संभ्रमात करून जातो
वनवा पेटतो थकलेला शब्दांचा
अनपेक्षित वाट
चुकलेला शब्दांचा
वनवा पेटतो कुठल्यातरी
अविचारी शक्तीचा
तरीही विझविला जातो
उगाच सरळ मार्गी चालताना
हिशोब ठेवला जातो
निखारांचा हरवून गेलेल्या धुरांचा
तळ गाठावा असे वाटताच
गुंफले जातात दोन्ही हात
सजविले जाते एक माळ
विचारांच्या झुल्यांवर
चिडचिड होते पण सोबत
समर्पणही असतेच ❤
गोड आठवणींचा
वनवा पेटलेला असतो
माझ्या तुझ्यात
कधी विचारांचा
कधी बोलक्या शब्दांचा
कधी बोलक्या आवाजांचा तर
कधी आठवणींचा
रान शांत होते पण
कधीही पूर्ववत होत नाही
विझलेल्या रानात
पांढराशुभ्र चाप्यासारखा तू
पांढऱ्या शुभ्र चाप्यासारखा तू...! 💕💔
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
There are different ways to express love. A different path ... different vibes .... a different journey ... than usual.
Such a lover traveling on that journey of love. This is a small attempt to express her feelings in words.
' Though you are new...," she describes her lover and the journey through this poem. The poem is self-written and composed.
If you like don't forget to like and share.Thank you...!!💕
*** In the Burning Forest ***
You are like a white blanket
Even though he is a newbie
gets lost
At the bend of the sensory stream
Confused
Forest burns tired of words
An unexpected path
Missed words
Forest burns somewhere
of reckless power
Still extinguished
Walking straight
Account is kept
The lost smoke of the coals
As soon as you want to reach the bottom
Both hands are clasped
A stall is decorated
On swings of thought
Irritated but with
There is also dedication
Sweet memories
The forest is on fire
in my you
Sometimes thoughts
Sometimes speaking words
Sometimes speaking voices
Sometimes memories
Ran was quiet though
Never undone
In the burnt forest
You are like a white sheet
You are like a white sheet...! 💕💔
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
The blog is my home of words. The mind is happy while picking the flowers of poems, now you must visit the blog to pick those flowers. I express my feelings in such a way. Welcome to this God threshold of Shabda Swaras. If you have come to the threshold of God, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
If you like it don't forget to follow comments and share...!💕#❤#🌹
#💕💕💕💕💕💕💕💕----------------------------------------------------