savitalote2021@bolgger.com

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

***** शिकवायचे ***

      आजूबाजूची परिस्थिती आणि कागदांवर दाखविली जाणारी परिस्थिती यामध्ये किती तफावत आहे, हे प्रत्येकांना माहिती होत आहे. याच पार्श्वभूमीवर ही कविता.      
       आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नेका.
       काही चुका झाल्यास माफी असावी. काही सुधारणा असल्यास नक्की सांगा. त्या सुधारल्या जाते धन्यवाद..!! 

****** शिकवायचे ******

डॉ. बाबासाहेब म्हणतात,
शिका संघटित व्हा संघर्ष करा 
आम्ही शिकलो पण संघटित झालो नाही 
पण संघर्ष मात्र पदोपदी 
अन्न वस्त्र निवारा रोजगार सुरक्षा 
ह्या आमच्या प्राथमिक गरजा 
आम्ही पूर्ण करिता आहो 
शिकून संघर्षाच्या वाटेवर तरीही 
अन्न वस्त्र निवारा सुरक्षा रोजगार 
कागदावरच आहे 

भारत तिसरी महासत्ता 
होण्याच्या वाटेवर आहे 
तरीही प्राथमिक गरजांसाठी 
झगडावे लागत आहे 
जगण्याच्या प्रत्येक पायवाटेवर 
संघर्षाची  वाट पाहत आहे 

माहितीच्या या तंत्रज्ञान युगात 
एका क्लिकवर जगाचा इतिहास 
आमच्या समोर आहे 
आणि त्या इतिहासात 
आमच नाव सुद्धा आता 
तिसरी महासत्ता म्हणून येणार आहे 

म्हणून आम्ही हसत आहोत 
कारण आम्ही आमच्या उघड्या 
डोळ्यांनी त्या महासत्तेचा 
अविभाज्य भाग 
होणारा आहो 
आम्ही उघड्या डोळ्यांनी 
बघत आहोत पदयात्रा, विदेशी यात्रा 
आम्ही हसतच बघत आहोत 
महामेट्रो बुलेट ट्रेन या सुविधांची 
खैरात ....

पण आम्ही प्रवास करतो 
आमच्याच लालपरीत 
ती भंगारतला डब्यापेक्षाही भंगार 
झालेली 
आम्ही हसतच बघत आहोत 
रस्त्यांवरील साचलेले पाणी  
डोळ्यातले अश्रू
तरी शिक्षण घेतच आहोत 
रोज रद्द होणाऱ्या 
यूपीएससी एमपीएससी सरळ सेवाभरती 
आणि विकासाची महाजत्रा 

तरीही आम्ही शिकत आहोत 
गावात उपलब्ध असलेल्या त्या शाळेत 
कारण बाबासाहेब म्हणतात,
शिका !! शिक्षणाने माणूस माणूस होतो माणसाला शिक्षणाने जगण्याचे 
ते नियम माहित  होतात 
हे माणसाला माणूस बनवतात 
म्हणून आम्ही शिकतो 

कधी संस्कार शिकतो 
कधी पुस्तकी ज्ञान शिकतो 
कधी गुगलच्या संपर्कात येऊन 
जगाच्या विकासाची संकल्पना व्याख्याही 
पण आम्ही शिकतो 
तरीही शिकतो 

संसदेच्या थेट प्रक्षेपणात 
कोणी फ्लाईंग किस देत 
कुणी ओरडून त्याचा विरोध करतो 
महत्त्वाची मुद्दे चालू असताना 
कुणी उठून जातो 
कुणी बोलत राहतो 
तरी बघतो उघड्या डोळ्यांनी 
सर्व, कारण आमचा मुद्दा 
अन्न वस्त्र निवारा सुरक्षा रोजगार 
आमचे मूलभूत अधिकार 
कसे पायदळी तुडविल्या जातात ते 

आता.., आता खरे वाटते 
बाबासाहेबांचे ते वाक्य 
राजकीय स्वातंत्र्यापेक्षा 
आर्थिक सामाजिक शैक्षणिक 
धार्मिक स्वातंत्र्य किती 
महत्त्वाचे आहे 
देशाची प्राथमिकता 
तिसरी महाशक्ती होण्याची  
आमची प्राथमिकता 
प्राथमिक सुविधांची 

म्हणून आता सत्ता महासत्ता 
सत्तेचा लोकशाहीचा चारही खांब 
आपल्या हातात असावे 
म्हणून शिकायचे 
संविधानाच्या पानापानावर 
बाबासाहेबांच्या त्या प्रत्यक्ष शब्दांसाठी 
शिकायचे जिथे माणसाला माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य अधिकार आहे 
म्हणून वेळ येईल तेव्हा 
शिकवायचे 
संसदेच्या थेट प्रक्षेपणात 
हे शब्द ऐकण्यासाठी शिकवायचे 
भारतातील युवा जगाच्या 
प्रगती पुस्तकात आलेखामध्ये 
महासत्तेच्या विकास यात्रेत
अव्वल आहे... 
हे ऐकण्यासाठी
संघटित होऊन शिकवायचे...!!💕

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
     
      आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

******************************************************************************
(Pic google वरून डाऊनलोड करण्यात आलेली आहे)

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...