savitalote2021@bolgger.com

मराठी कविता आयुष्य कविता प्रेम कविता विद्रह कविता विरह कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कविता आयुष्य कविता प्रेम कविता विद्रह कविता विरह कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १ जानेवारी, २०२४

"........ गोड नाते ......."

कधी कधी प्रेमात कुठेही काहीही संवाद नसताना अचानक एक संवाद होतो. मनातले प्रेम अस्तित्वात निर्माण होते.
        त्या अबोल प्रेमाची ही गोष्ट,".... गोड नाते..." आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.
        काही सूचना असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद...!!❤

"........ गोड नाते ......."

दिवस कालचा 
हळुवारपणे स्तब्ध होऊन गेला
गुलाबाच्या काट्यांच्या सोबतीने 
जखमा मात्र भरून गेल्या 

कोंदन श्वासाचे आणि आनंदाची लहर 
देऊन गेला 
अंगावरती शहरा 
बेधुंद गारव्याचा सोबत 

शेकोटी पानगळ झालेल्या 
गुलमोहराखाली किनारा मात्र 
प्रेमाचा ओलावा देऊन गेला 

आता मनाच्या डायरीत 
विस्तीर्ण आठवणीचा प्रवास 
नयनओलावून गेला

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

==========================================================




माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...