बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी प्रियसी, तिच्या प्रियकराला हे सांगत आहे कारण आम्ही नवा आरंभा नवयुगाच्या या तत्त्वानुसार आम्ही चालत आहे गावकुशाबाहेरील सत्य अजून आम्ही विसरू शकलो नाही प्रेम कितीही पवित्र असले तरी वैचारिक पार्श्वभूमी खूप महत्त्वाची आहे.
कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही सूचना असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सूचनावर विचार केल्या जाईला आणि त्यावर संशोधन केल्या जाईल. धन्यवाद...!💞
***माघार ***
तुझ्या माझ्या नात्यात माघार मीच घेणार आहे
विद्रोहाच्या चळवळीवर चालताना
तू मात्र खूपच लहान ठरला आहे
निळ्या झेंडा चा माज माझा
हा माझा अभिमान आहे
पण तू मात्र म्हणतोस त्यात काय आहे
मी माझ्या स्वाभिमान अभिमान कुणाच्या ही
पायात गहाण टाकू शकत नाही
मग ते माझ प्रेमही असेल तरी
कारण मी एक स्त्री आहे
स्वातंत्र्य विचाराची स्वातंत्र्य
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मूलभूत अधिकाऱ्याची
याही पुढे जाऊन तुला सांगते
मी मुलगी आहे एका बापाची
जो बाप माझ्या बापाचा ही बाप आहे
म्हणून मी म्हणून मी माघार घेणार आहे
झाडामागच्या प्रेमाची
मला काहीही किंमत नाही
आणि ते करायलाही मी तयार नाही
पुरुषप्रधान संस्कृतीच्या
या नियमाला मी नाकारत आहे
म्हणून तुझ्या माझ्या नात्यात
माघार मीच घेणार आहे
वैचारिक पार्श्वभूमीमुळे !!
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
--------------------------------------------------------------------------