savitalote2021@bolgger.com

सामाजिक कविता आंबेडकरवादी कविता विद्रोही कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक कविता आंबेडकरवादी कविता विद्रोही कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २० मे, २०२१

पेटलेल्या रक्तात

     ***** पेटलेल्या रक्तात ******

पेटलेल्या रक्तात आग लागली नाही 
असे झालेच नाही, 
त्यात जळत गेली ...

झाडे अमानवी परंपरेची... 
स्वप्नांची इमारती अनैतिकतेची...
समाजव्यवस्थेच्या मनोरा...
अस्तित्वाच्या; अस्वच्छ वस्तीत  

उघडे झाले समानतेचे वारे... 
स्वच्छ होऊन गेली 
मनातील कोपरा न कोपरा 
भांडवलवादी व्यवस्थेतील ...

स्वःच्या सतत बदलत 
जाणाऱ्या आकृतीला 
चमकूच दिले नाही, 
कधी 

जळजळता अस्तित्वाच्या निखाऱ्यात पिढ्यानपिढ्या ....

म्हणूनच 
पेटलेल्या रक्तात आग लागली नाही 
असे झालेच नाही कधीही!!!

             सविता तुकाराम लोटे 

///////////////////////////////////////////

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...