दिवेलागण झाली
आणि कुणी नसताना घरात
उफाळून येतात आठवणी
मन सैरभैर होते
विझलेल्या स्वप्नाची
राखरांगोळी पाहताना
अजून टवटवीत आहेत
माझ्या मनातील
स्वप्न फुलांची राख
मूक पापणीत आसवांचा संगे
विझलेल्या स्वप्नात काय
माझी चुक की नियतीची
न निळे मज उत्तर
विझलेल्या स्वप्नाच्या राखरांगोळी
तुफानी लाटांशी लढण्याची
हिम्मत असली तरी
ते एक स्वप्नच
अजूनही बंदिस्त आहे
प्रगत समाजाची स्त्री
स्वप्नांची राखरांगोळी डोळ्यांनी
बघत
अश्रू संगे
सविता तुकाराम लोटे