कविता हे स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कवितेचा विषय तसा प्रेमाकडे वळणारा असला तरी एक अशी संवेदना अशी एक भावना जिथे प्रेम नाही. जिथे आकर्षण नाही.
नुकत्याच जुळलेल्या नात्यांमध्ये, एका स्त्रीची ही भावना तिच्या होणाऱ्या भावी आयुष्यातील त्या व्यक्तीसाठी आहे ती फक्त कल्पनेत रमणाऱ्या त्या भावनेला आता ती प्रत्यक्षात भेट देणार आहे .
स्वतः स्वतःशी असलेला गैरसमज ती गोळा न करता ती सांगते आहे तिचे मन सांगते आहे, की मी त्या भावना शब्दात मांडू शकत नाही. ते शब्द ते पांघरून हीअपेक्षा खूप मोठी आहे. त्या असहज भावनेच्या भाव विश्वातून ही कविता आपल्या भेटीला....!!💕 आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!! धन्यवाद...!!
*** शब्दांचे गाठोडे ***
शब्द बाहेर पडलेच नाही
त्यांच्या नयनातील भावनेला
शब्द देताच आले नाही
रोज ती भावना घेऊन बसते
लिहिण्यासाठी...,
पण ते प्रेम
शब्दांच्या माळेमध्ये गुंफताच झाले नाही
सवयीच्या शब्दांना आता उगाच
हसू येते माझ्या शब्दांना
आता लज्जा येते
ही भावना गुंफता आली तर
अनेक प्रश्न घेऊन
या नंतर अनेक भावना वाटेला
येणार आहे त्याही भावना...??
लिहिता आल्या तर
हळूच विचाराने
आता भावनेला शब्दात घेऊन
जायचे नाही ठरवले आहे
प्रेमाच्या सागर त्यातल्या भावना
शब्दात मांडता येत नाही
हसरा नयनातील ओठांची हलचल
इतकीच का आपली आहे💕
आज शब्दांच्या गाठोड्या मधून
शब्द बाहेर पडलेच नाही....😀😀❤💕
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
==================!===!!!===================================