savitalote2021@bolgger.com

मराठी कविता चारोळी मराठी लेख सकारात्मक कविता विद्रोही साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कविता चारोळी मराठी लेख सकारात्मक कविता विद्रोही साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

काय चुकले

 निष्काळाजीपणा हा फक्त त्या व्यक्तीचे आयुष्य खराब करते अशी नाही तर त्याच्या आजूबाजूने असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यावरही त्याचा परिणाम होतो.
        हे रोजच्या व्यवहारातल्या गोष्टीतही त्याचा परिणाम होतो. असेच काहीसे आयुष्याची होते. कुणाच्यातरी निष्काळजीपणाने कुणाची तरी स्वप्न उध्वस्त होते. काय चुकले माहीत नसते तरी पण खूप काही चुकले असते. 
         त्याच भावविश्वातून ही भावना..!💕 
     आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद...!

.....काय चुकले.... 

काय चुकले काय नाही 
माहित नाही 
पण कळलेच नाही, 
कधी ते फुले टोपलीतच वाळवून 
गेली... म्हटले तर निष्काळजीपणा 
माझा की त्या फुलांच्या नशिबांचा 
की देवाच्या पायाशी गेलेच नाही 
निष्काळजीपणाने ..

फुलेच होती ती फुललेली हसरी 
टोपलीत येताच खुदकुन गालात हसली 
पूर्णत्वाचे स्वप्न कदाचित पूर्ण झाले 
असेल देवाच्या पायाशी जाण्याचे 
पण दुर्भाग्य किती 
ती भाग्यरेषाच नव्हती 
की माझाच निष्काळजीपणा 

त्यांची भाग्यरेषा कोमेजून टाकली 
कदाचित पायदळी तुडविली 
त्यांचे  स्वप्न माझ्याच नकळत 
माझ्या निष्काळजी स्वभावाने 
फुले टोपलीतच वाळून गेली 
स्वप्न मनातच ठेवून ना 
ती देवाच्या पायाशी गेली 
ना ती सुगंध देऊन गेली 
भाग्यरेषाच होती ती त्यांची 
की निष्काळजीपणा माझाच 
काय चुकले......

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹


कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤



============================

त्याच हसू

** त्याच हसू ** त्याच हसू  मनाला जगण्याचे बळ देते  रित्या मनाला स्वप्नाची पायवाट न दाखवता  जगण्याची रीच शिकवते  त्याच हसू  चेहऱ्यावर स्माईल ...