"चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा"
( The first day of the month of Chaitra is Gudipadwa. )
चैत्र महिना अत्यंत पवित्र मानला जातो. चैत्र महिना हा हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना होय. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी मराठी नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात गुढीपाडवा साजरा केला जातो.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा हा सण मोठा जल्लोषात साजरा केला जातो. महाराष्ट्रात गुढीपाडव्याला अन्य साधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात वसंतोत्सव म्हणून सुद्धा साजरा केला जातो.
(Gudipadwa, one of the three and a half Muhurtas, is celebrated with great gaiety. In Maharashtra, Gudhi Padwa has another general significance. It is also celebrated as Vasantotsava in Maharashtra.)
गुढीपाडवा हा आनंदासोबत सांस्कृतिक परंपरेचा वारसा एका पिढीकडून दुसरा पिढीकडे परंपरा दिली जाते. गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला मूल्यवान वस्तू घेण्याची पद्धत आहे. शेतकऱ्यांमध्ये गुढीपाडव्याला शेतात उत्सव साजरा केला जातो. नवनवीन वस्तू घेतल्या जातात. घर मालमत्ता सोने-चांदी घरगुती वस्तू घेतल्या जातात. नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी हा मुहूर्त साधला जातो.
शेताची मशागत केली जाते. गुढीपाडवा मराठी नववर्ष लोकांसाठी नवीन सुरुवात नवीन आशेची भावना घेऊन नवीन स्वप्न घेऊन आनंद सुख समृद्धी घेऊन येते.
चैत्र महिन्याचा पहिल्या दिवस साजरा केला जातो. घरातली नकारात्मकता यामुळे दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेची सोबत येते. वसंत ऋतूची सुरुवात निसर्गही फुललेला असतो.
कडुलिंबाचे झाड फुलांनी सजलेले असते. आंबाही मोहरून फळाला आलेला असतो. कच्च्या आंब्याची चव सर्वीकडेच घेतली जाते. गुढीपाडव्याला विविध प्रतीकांनी गुढी सजविली जाते.
गुढीपाडवा नववर्ष ,"सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. माझ्या ब्लॉगला तुम्ही दिलेला प्रतिसादामुळे माझे हे नववर्ष आनंद समृद्धी आणि सकारात्मक दृष्टिकोनाने जाईल आणि नवीन लिहिण्याची ऊर्जा मिळेल.
Thank you!!
गुढीपाडवा या दोन शब्दाचा अर्थ म्हणजे गुढी म्हणजे विजय ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी म्हणून प्रत्येक घरामध्ये विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते.
पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केली म्हणून हा दिवस ब्रम्हदेवाची पूजा करण्यासाठी समर्पित मानले जाते.
( Gudhipadwa New Year ,"Happy New Year everyone. Your response to my blog will make my New Year happy with prosperity and positive outlook and give me energy to write new ones.
Thank you!!
The meaning of two words Gudhipadwa is Gudhi means victory flag and Padwa means Pratipada Tithi as Gudhi is erected in every house as a symbol of victory.
According to mythology, on the day of Gudhipadva, Lord Brahma created the universe, so this day is considered dedicated to the worship of Lord Brahma.)
भगवान श्रीरामानी बळीचा वध करून दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या दहशतीपासून मुक्त केले. हा विजय साजरा करण्यासाठी घरोघरी विजयाच्या झेंडा फडकविला. ज्याला गुढी म्हणतात.
गणितज्ञ भास्कराचार्य यांनीही तिथी, वार,नक्षत्र, योग, करण यांच्या आधारे पंचांग रचल्याचे सांगितले जाते. तसेच याच दिवशी सत्ययुगाची सुरुवात झाली असेही मानले जाते. नवरात्रीची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी होते. अशा विविध पौराणिक कथा गुढीपाडव्याच्या संदर्भात आहे.
निसर्गचक्रानुसार चैत्र महिन्यात वसंत ऋतूचे आगमन होत असते. त्यामुळे चौहीकडे बदल झालेला असतो. पानगळ झालेली असते. झाडांना नवीन पालवी फुटलेली असते. या नैसर्गिक बदलाचे हसतमुखाने स्वागतासठी वसंत उत्सव गुढीपाडव्याला साजरा केला जातो.
( According to the cycle of nature, the spring season comes in the month of Chaitra. So there is a change in all directions. Leaves have fallen. Trees have new buds. To welcome this natural change with a smile, the spring festival Gudipadva is celebrated.)
गुढीपाडव्याच्या सणाला शास्त्रीय दृष्टिकोन सुद्धा आहे. उन्हाळा चालू झाल्यामुळे वातावरणात दाहकता असते. गुढीला कडुलिंबाचे पाने लावली जातात. कोवळी पाने कडुलिंबाची प्रसाद म्हणून दिली जाते.
(There is also a classical approach to the festival of Gudipadva. Due to the onset of summer, there is inflammation in the atmosphere. Neem leaves are applied to Gudhi. Young leaves are given as neem prasad.)
नववर्षाची सुरुवात निरोगी शरीराने व्हावे यासाठी हे केले जाते. लिंबाच्या पानाने रोगप्रतिकारशक्ती वाढविते. उन्हाची दाहकता आणि बदलत्या ऋतूच्या होणाऱ्या रोगांपासून सुरक्षितता निर्माण करण्यासाठी कडुलिंबाचा झाडाच्या पानाचा उपयोग आरोग्यासाठी अतिशय हितकारक आहे. हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे माहिती दिली जाते.
गुढीपाडवा म्हणजे विजयाचा सण आणि हा सण वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांनी सुद्धा साजरा केला जातो. विशेषता गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी बनविले जाते.
(Gudhipadwa is a celebration of joy.....!Gudhipadwa means victory flag.....Gudhipadwa means victory of positivity over negativity.....Gudhipadwa means decorated rangoli in courtyard with colorful colors.....Gudhipadwa means flag.....Gudhipadwa Means new consciousness...!!)
गुढीपाडवा म्हणजे आनंदाचा उत्सव.....!गुढीपाडवा म्हणजे विजयाचा ध्वज..... गुढीपाडवा म्हणजे नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय .....गुढीपाडवा म्हणजे सजलेली रांगोळी रंगबिरंगी रंगांनी अंगणात..... गुढीपाडवा म्हणजे पताका..... गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य....!!
चला तर गुढीपाडव्याला संकल्प करू या. हे नवचैतन्य प्रत्येक घराघरात नांदू दे - फुलू दे....!!
(Let's resolve the Gudipadva. Let this new spirit bloom in every household....!!)
आशा -आकांक्षाचे नवीन तोरण
दारी बांधून नवचैतन्याचा गोडवा
मनी घेऊनी आनंद समृद्धीची उभारू
गुढी नववर्षाच्या सोबतीने...!!
(Asha - A New Pillar of Aspiration
Sweetness of new consciousness by closing the door
Build happiness and prosperity with money
With Gudhi New Year's Companion...!!)
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
((((( The blog is my home of words. I express my feelings in such a way. Welcome to this God threshold of Shabda Swaras. If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹)))
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
-------------------------------------