रोज नियमितपणे एवढी मात्र गोष्ट केली जाते. ती म्हणजे प्रतिक्रिया देणे. कुणाला ती बोलकी द्यावीशी वाटते तर कुणी ती मुख देत असते. अंतरंगाच्या वळणावर पाहणे जरी वेगळे असले तरी संवेदना मात्र वेगवेगळ्या होतात. सोबतीच्या नात्याला सुवास उडून जातो ...सफलतेच्या शिखरावर असतानां जीवनातील प्रवास मात्र वेगळीच!
त्याच नवीन वाटेवर जाताना जुन्या संस्कारांना मात्र मागे सोडवीत नाही... आपल्यामधील नवनिर्मितीचा गाव मागे पडत आहे हे त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही... चित्तातील संवेदना वेगळा असला तरी छत्रीत भिजण्याचा मोह सुटत नाही समजून घेतले तर समजून घ्यायचे आणि नवा वाट संग्रहबरोबर मनात नवीन फुगडीचा खेळ चालू होतो. नव्या क्षणी परत आता दुसऱ्या क्षणी जुन्या संस्कारांना प्रवाहित करीत असते. तेव्हाच तर मनावरील भाबडे भाव मात्र प्रति क्षणी वेगवेगळी होत जातात.
मन स्वभाव वेगवेगळे असतात. जीवनातील अशांतता वेगवेगळी असते. मात्र कधीच अर्ध्या वाटेवर आपली प्रतिक्रिया देत नाही.
काही तर ती इतका कोवळ्या रूपात देतात की त्यांचे शब्द मात्र त्यांनाच व्हवे असते.... कुणाला मात्र ते नको असते त्यांचे डोळे त्यांचे शब्द त्यांचे चेहऱ्यावरील भाव आशा-आकांक्षा घाबरड पण अति आत्मविश्वास ते लक्ष सुद्धा येत असते तरी समोर एक धुंक पांघरून कोवळ्या ऊनधारे बरोबर वादळी होतात ...आणि सांगत राहतात...
मनाला अतितीव्र पणे मी असा आहे रोखून धरलेल्या नजरेने विचारात... उरलेल्या शब्दांची धारदार कात्रीशब्दमाळीबरोबर... विसरलेला प्रत्येक क्रियांबरोबर ...शांतीपूर्वक निर्मळ मनाचा एक रहस्यमय विसरलेल्या क्षणासोबत !
नयनातील भाव हे मुक्तपणे प्रतिक्रिया व्यक्त करत असले तरी संग्रहाची वेळ... संग्रह करण्याची वेळ.... संग्रह शब्द देण्याची वेळभाव...चुकले की ते नकोच असते पण ती रिमझिम देऊन जातात... समजून आणि असमजून !! प्रती क्षणी आणि प्रगती क्षणी काही क्षणी ओलावून जातात आणि काही क्षणी अनोळखी होत जातात.
जुन्या नवीन साखळीमध्ये फुलांचे क्षण फुलतात पण कितीही नको असलेल्या प्रतिक्रिया इतक्या सहज आणि इतक्या खुलेपणाने देऊन जातात... की त्यांना नको असलेले शब्दही आपल्याला देत राहतात.
लालबुंद झालेल्या चेहऱ्यावरी
हसू मात्र गोड असतील
असे व्हावे....
वाटेचे गणित काय असावे कळत नाही... इतके बोलके नयन हे सतत भिजवणारे ...भावनेतील... मूक वेदना आणि वेदना नसलेल्या ना त्याला परत वेदना असल्यासारखे भासत राहणे हे वेगळे स्वरूप! आल्या वेदना त्यांना सामोरे जावे लागते ...पण खरच त्या वेदना नकोच असतात त्या नको असलेला वेदना मूक प्रतिक्रिया देत राहते संवेदना खूप असतात परिसंवाद मूक परिसंवाद खूप असते घटत जाणारे... वाढत जाणारी सुखद... दुःखद... अलिप्त ... अनंत अडचणीचे झपाट्याने गेलेल्या त्यावेळेला आपण साक्षीभावाने... बदलत जात असतो. त्याला आपल्या गरजेनुसार बंधनमुक्त करीत राहावे लागतेच.
प्रयत्नांना नको असतात दुःखद संवेदना... दुःखद प्रतिक्रिया आणि जाणिवा चमत्कार स्वाभाविक असते. आंधळा थोडा वेळ रचनात्मक शक्य असलेल्या जंगलात मन रमत नाही. नकळत रमणारे मन गोष्टीकडे सारा वेळ गुंतून राहते आणि परिसंवाद वाचविला जातो. येतील तेवढ्या संख्येवर स्वाभाविक दृष्टीने नजर मंगलमय आणि कल्याणकारी होत राहते. जीवनातील सशक्त विचार प्रतिक्रिया मनाला बळ देत असते जीवनातील विवेकाला बळ देत असते. बंधन खोल असते. वाद-विवाद वेगवेगळे असते... आणि नकोत असलेले भाव अति क्षणभंगुर असते.
जीवनात सुखमय संवेदना कधी दुःखमय संवेदना सुखसंवेदनाचा मोह तिरस्कार समतोल तटस्थपणे प्रगतीचे भाव देत असतात.
जीवन वाटेवरील संघर्षमय वाट
सुखदुःखांच्या वाटेवरती प्रगत वाट
असावी लागते वाटेवरील जीवनधारा
आणि तसे नकोच असावे वाटे
मधील ...अडचणी... अलिप्ततेच्या
..... या विचार सागरात आणि प्रतिक्रियांच्या या मोहमायेत. विसरूया नको असलेल्या विचारधारेला आणि स्वमुक्ताने ... स्व मायने... स्व विचारधारेनेच. शब्दांचा योग्य फुललेल्या मायरानामध्ये!!!
Copyright - सविता तुकाराम लोटे
-----------------------------