savitalote2021@bolgger.com

प्रेम कविताविरह कविता शृंगार कविता सकारात्मककविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविताविरह कविता शृंगार कविता सकारात्मककविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

समर्पण .....

           "समर्पण,"  ही भावना मनातील अति आत असलेल्या मनाच्या विश्वासावर अवलंबून असते आणि एक स्त्री समर्पण ही भावना त्याच व्यक्तीला देते तिथे विश्वास असतो. प्रेम असते. या भावविश्वातून या कवितेचा  आशय घेण्यात आला आहे.
          पण एका स्त्रीच्या त्या भावनेला एक प्रेमी कोणत्या दृष्टिकोनातून बघू शकतो हा सांगण्याचा छोटासा प्रयत्न....
 काही चुकल्यास माफी असावी. कविता स्वरचित व स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नक्की कळवा.

....समर्पण .....

मला आवडते तुझ्या नयनातील 
काजळ कोरीव आकृतीने कोरलेले 
आवडते तुझ्या ओठांवरील गुलाबी 
लिपस्टिक, विशिष्ट पद्धतीने लावलेली 
हातातील आवाज करणारी बांगडी 
पायातील पैंजण कपाळावरील चंद्रकोर 
टिकली.....
तिच्याकडे एकटक पाहताना 
जाणवते तुझे सौंदर्य भरलेले शरीर 
गालावरील बोलताना पडलेली खळी आणि नयनातील भाव समर्पणाचे... 
माझ्याही नकळत गुंडाळले जातात 
तिच्या कमरेभोवती माझे हात 
कळतच नाही ती ही समर्पणाच्या 
भावनेने बघत असते 
कदाचित; तिला कळले असेल 
माझ्या मनातील भावना माझ्या 
नयन भावना ...
मी थांबतो मागे होतो तरी 
ती त्याच भावनेत 
मला माझीच लाज वाटते 
माझ्या मनातील भावनेची 
माझ्यातील पुरुषार्थाची 
शब्दांची तिच्या सौंदर्यासाठी आलेले 
तरी ती समर्पित असतेच 
माझ्या नयनातील शब्दांना 
आता ही कळते तिला तरीही 
विश्वासाने 
जो माझा माझ्यावर नसलेला 
हात मागे येतात 
भावना शून्यवत होतात 
त्या विश्वासासमोर 
त्या समर्पणासमोर 
माझे प्रेम अविश्वासावर 
माझ्याच 
तिचे प्रेम विश्वासावर 
माझ्या 
समर्पणाच्या माझ्या प्रेमावर....!!!
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- *****  समर्पण *****

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...