savitalote2021@bolgger.com

रविवार, १८ एप्रिल, २०२१

नकळत आलेले क्षण

        नकळत आलेले क्षण
 संध्याकाळ दाटून आले असेच  
वाटतांनाच, सोनेरी क्षणानी आलेच 
नव्या वाटा ,घेऊन वळणावरती 
फुललेल्या नजरेने आणि शब्दावरती 

       मृगजळाचा त्याच्या मागे धावत आहे आपले मन असे वाटत असताना त्या एका क्षणांनी किती मागे घेऊन गेले आपल्या मनाला. स्वप्नामध्ये रंग भरत क्षणापर्यंत वाट पाहत असताना क्षणात मागे जावे लागले का?कळत नाही. पण मागे गेले त्या क्षणाला ते क्षण सहज आपल्या जवळ आले असे वाटत नसले तरी क्षणासाठी मन तयार होते असेही  वाटत नाही. काही दिवसांमध्ये ते फक्त मृगजळ वाटत होते पण? ती पहाट नवीन क्षण घेऊन येईल. फुललेला शब्द मधुर रुपेरी क्षणांनी गुलाबाचे तेज घेऊन!
     खरच तो क्षण काय होत्या. त्या क्षणाला कोणते नाव घ्यायचे आणि द्यावे? चित्रांनी भरलेले आट चित्रकृती सारखे ते सर्व होते. चित्रात काही रंग भरता येतात आणि कधीही त्याला नवीन रूप देता येते तसेच काही तो क्षण होता. एखाद्या गोष्टीसाठी किती संघर्ष करावा लागतो... पण हे संघर्ष कशासाठी आहे हे सुद्धा माहित नसताना.... आणि तो संघर्ष कुणा बरोबर आहे हेसुद्धा माहीत नसताना. फक्त संघर्ष असतो आणि त्यासाठी सर्व शब्द एकत्र करावे लागते पण का? कळत नाही.
        प्रत्येक वेळी प्रश्न ....आणि प्रश्न? इतरांच्या शब्दांना महत्व देता -देता आपण किती मागे जात असतो. आपले स्वप्न...आपली महत्वकांक्षा ...आपले अस्तित्व ....आपले शब्द...आपली प्रसन्न....आपले निरागस प्रेमळ भावना...आपला हसत-खेळत स्वभाव... साधे-सरळ वाटत असणारे चेहरे किती गोष्टी करून जातात
    आलेले क्षण नकळत , आलेल्या पाकळ एकत्र येत होत्या. सोनेरी शब्दांनी आणि मोहक क्षणांनी. ते काय होते त्यावेळी सुद्धा कळले नाही आणि आता सुद्धाकळत नाही. पण तो क्षण माझ्यातील स्वप्नांना एक पाऊल समोर घेऊन जाणारा नक्की होता.
क्षणक्षणानी फुललेला गुलाब
क्षणात आपले रूप दाखवीत गुलाब 
काट्यांची साद देत फुलतो 
सोनेरी निळ्याभोर जलाशयात 
       वादळ येथील चमचमणा-या विजा येतील . वारंवार तरंगत राहील नयनामध्ये स्वप्नाचा ओघ पाणीदार नयनात!  वारंवार येतील. आसवांचे  काटे गढूळ पाण्यातील साचलेला संघर्षाचे वावर येतील. विक्राळ रूप घेऊन इतरांच्या मनातील भावना व मनाला घायाळ करणारे शब्द वारंवार येतील. सगळीकडे चाकोरीबद्ध शब्दांचा समूह आणि देतील शब्दाच्या प्रवाहामध्ये घायाळ करीत पण त्यानंतर सुद्धा येते.
        ...आलेले क्षण नकळत मनाला फुलविणारे . नवे रूप नवे स्वप्न नवे चांदण्याचे गाणे
व नवे गुणगुणत शब्दाची साद.
वारंवार येतील फुललेल्या क्षणाबरोबर स्वप्नामध्ये बळ देण्यासाठी काट्यातून फुलेरा फुलेल नवीन शब्दांच्या नवीन प्रवाहाच नवीन अस्तित्वातील सोनेरी  क्षणाचा नवीन पालवी आसवांच्या सोबत पण ते स्वप्नातील रंग भरलेल्या ग्रीष्माच्या निखाऱ्यात  निघाल्यावर सावलीतील विसावा मध्ये फुललेल्या माळरानातील इवलेसे रोपटा सारखे नजरा देतील नवीन सोनेरी किरण आणि उगवत्या सूर्यासारखे नवीन स्वप्न.
   नव्याच वाटा मृद हिरवळ पायवाटेमध्ये वळतील नजर. त्या वाटेवर व शब्द सुरांमध्ये नव्या वाटा नवीन स्वप्न नवीन उमेद नवीन नाते नवीन गुलमोहर आणि नवीन चौकट.
     मनसोक्त त्या वळणावर चालताना चौकट सुद्धा गुंफत आहे गुलमोहर फुले पण त्याला उन्हाचे चटके करावेच लागते. मिटलेल्या पापणीत स्वप्नांचा ओघ आला तरी त्याबरोबर आले आलेली नवीन पायवाट मयुर स्पर्शाने फुललेला त्या क्षणाला नाजूक शब्दांनी आणि कुंपणात राहूनच पण स्वतंत्रपणे. येणारी जबाबदारीसुद्धा चोर पावलांनी आली.
       नयन भिजले नाही असे झाले नाही पण हा प्रवाह वाटतो इतका साधा व सरळ सुद्धा नाही आणि नव्हता इतरांना पहातांना वाटतं इतका या प्रवासासाठी किती बदल करावे लागेल इतरांना माहीत नाही कारण माझे स्वप्न माझी महत्वकांक्षा माझी दिशा ही वेगळी होती पण मी बदलत गेले माझ्यातील स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी.
    बदलता स्वभावा बदलले शब्द  बदलले विचार बदलले जुने शब्द आणि वैतागलेले चित्र आणि बदलले मनातील पांघरलेला तुटलेल्या स्वप्नांना हळू पावलांनी आणि शब्दांनी अन फुललेल्या चेहर्‍यानी.
        तरी होत राहिले त्याविरुद्ध पण कणखर आवाज आणि मधुर शब्दांनी सर्व शक्य होते ते त्या क्षणाने कळून आले अजूनही त्या क्षणांची वाट पाहत राहील. ते क्षणच आपल्यासाठी नवीन बदल विचारांमध्ये नवीन स्वप्न नवीन पायवाट नवीन महत्वकांक्षा व नवीन सूर देतात फुललेल्या त्या चेहऱ्यामध्ये आणि फुललेल्या त्या हसरा सावळ्या रूपा चे नवे गाणे आणि नवे सूर सापडतात.
       हळुवार पावलांनी आणि दाटीवाटीने भरलेल्या सोनेरी पावलांनी.
    खरंच वाटतं त्या क्षणासाठी तयार नव्हतो पण तोषण एका चौकटीमध्ये गोळा  करून ठेव ला आणि ते पाहताना वाटतं जगत आहोत आपणास रेशन हसरे नयन हसरे धावते शब्द आणि उगवलेलं नवीन दिवसाचा सूर्यप्रकाशा सारखे।          वेलांटी वळणावर  मुक्त मनानी
      इंद्रधनुष्य घेऊन  आलेच.  क्षण 
      निळाशार टोपी मध्ये आणि 
             उपरन मधून 
           नवे सूर... नवे शब्द ....नवे गाणे...
                      सविता तुकाराम लोटे 
-----@@@@---------@@@@@-----







बदलता काळ


बदलता काळ 
      दिशा बदलतात शब्द बदलतात भावना बदलतात. आयुष्य हे एक घनदाट जंगल आहे . त्यात पाऊल ठेवले की त्या गुंताला आपण जीवनाचा त्या बदलत्या  क्षणा बरोबर पाठलाग करीत असतो ....विचार कशाचा ? तर बदलत्या काळाचा !
थांबलेले शब्द परत ऐकू 
येतानी दिसतात...
थांबलेले शब्द परत ऐकून 
क्षणभर थांबलेल्या... लपंडावाचा 
त्या सहज आकृती वणव्यात!
         मनाची सारी आकृती ही सहज बदलत जाते जेव्हा वाटत राहते सर्व सरळ आणि गुंता सुटत जात आहे तेव्हा ,पण खरच सौम्यपणा हा त्या भेटणाऱ्या धारदार आकृतीमध्ये असते त्या घनदाट जंगलामध्ये हे ते नातच जपणाऱ्या त्या खोल मनाला माहीत असते. नदीच्या पाण्याला प्रवाह असतो तसे नात्याला सुद्धा पण त्या प्रवाहाला पूर्णत्व गुंफलेल्या क्षणांसोबत असावे. वरवर पाहता संवेदना हा त्या खुल्या फुललेल्या कळी असावी.
        जमवत गेलेल्या संवेदना खुल्या असाव्या विचित्र रांगोळी नक्षत्रांचे असावे असे वाटताना काळोखाला मधुर घंटानादाने नाहीसे करावे आणि बदललेल्या त्या काळाला मंत्रमुग्ध होईपर्यंत स्वप्नातील रांगोळीमध्ये गुंफत जावे असे वाटत राहते पण बदललेले शब्द..क्षण... रांगोळी...घंटानाद ....परत बदलते.
       विश्वास आपुलकी अद्भुत नवीन बदलत्या काळाबरोबर.
                         सविता तुकाराम लोटे 
----------///////////////------------

एक फांदी

एक फांदी 


          दवबिंदू  पाणी नसते पण त्याला ओलावा असतो त्या ओलाव्याने ओलेपणाचा भास असतो. आभास हे आपल्या भावनेवर अवलंबून असते सगळी पहाट झाली त्या शांत न व किरणांच्या साक्षीने उगवत असते नवरुप घेऊन पण तो ओलावा दिवस सरता सरता कमी होत जातो आणि उतारता उतारता तो हो ओलावा आपले अस्तित्व आपले जग परत शुभ्र पहाट घेऊन येते.  
           ओसरणार्‍या धुक्यात काय शोधायचे असते माहित नाही पण ते शुभ्रपहाट काहीतरी नवीन काही आपल्याला देऊन जाते. नवीन स्वप्न ओंजळीत भरतांना आत्मविश्वास आणि नवीन स्वप्न मनात रूजवितांना शक्ति!  
      सगळं हवं तसं होत नसते हे खरे, असेल. एक ओंजळ ज्या जमत राहतात नवविश्वासाचे स्वप्न पहाटेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताना पहाट कितीही धुक्यात भरलेली असलेली असली तरी धुक्यातून  साक्षीने ती मनाला ओलावा देत  राहते.
      नाजूक हळुवार ...अमर्याद 
झुलत्या फांदीवर  आपले संपूर्ण हलत्या स्वप्नांचे हलते सामर्थ्य सुवर्ण स्वप्नाने आपल्या डोळ्यात साठवित असतो एका फांदीवर आपले सामर्थ्य दाखवित अस तो पण खरंच त्या एका फांदीवर सामर्थ्य असते की ते भ्रम असते डोळ्याचे निर्जीव भावआपल्याला दिसतात त्या निर्जीव ओलावा त्या दवबिंदुं सारखे नसतात एका फांदीवरून प्रवास होऊ शकत नाही जणू ते प्रवास एका चौकटीत लागू नये त्याला दवबिंदू च्या ओलावा असावा जरी वसंताचा बहर नसला तरी!
          एका फांदीवर चौकट न करता!!!

         सविता तुकाराम लोटे 

----------------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...