savitalote2021@bolgger.com

गुरुवार, १ जुलै, २०२१

......मनातील माझ्या .......

     आयुष्यात वेदना ह्या अशा असतात की वेदनेचा उन्हामध्ये आपल्याला असे वाटते की आपण लांब आहोत,  या भावनेतून सुचलेली ही कविता. 
      कविता स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करा.


        .....मनातील माझ्या .......

मला वाटले 
बाहेरून ऊन माझी आहे 
पण उन्हाच्या उष्ण गंधावलेला 
वाऱ्याला माहित नाही 
मी माझ्यातील लांबचलांब 
विचारांची साखळी माझ्या 
गुंफलेल्या व खुंटलेल्या 
सावलील्या ऊनची सोबत होत 
होती... पण ती विसरली 
आपल्याला ...
चटकाचे चटके द्यायलाही 
कारण ती लांब होती माझ्याजवळून 
आणि मी तिच्यापासून 
मला वाटले 
ती माझी आहे पण ती 
....खुंटलेली होती फक्त 
मनाला चटके देण्यासाठीच...


                ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-   .... मनातील माझ्या .......
आपला अभिप्राय खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद

*************************************

*** शेतकरीराजा ****

     

          दिवसेंदिवस होत असलेल्या नापिकीमुळे आणि मुख्य प्रवाहापासून  दुर्लक्षित असलेला घटक म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांची व्यथा शेतकऱ्यांचे जीवनमान नैसर्गिक आपत्ती या संघर्षमय वाटेतून मार्ग काढून संपूर्ण मानव जातीच्या पोटभरणारा शेतकरी मात्र भाव मिळत नाही म्हणून 
दुःखी.....
             ही कविता स्वलखित आहे
आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
                 -------------

           ***** शेतकरीराजा ****

तापलेल्या सूर्याच्या साक्षीने मातीला सुगंध
येण्याआधीच समृद्ध केले जाते आपल्या
घामाने धरणी मातेला आभाळाच्या साक्षीने
विश्रांती काही क्षणांची आणि बरसतो पाऊस
सरींसोबत लगबग चालू बळीराजाची...
उगवतीचे धान्य लाख मोलाचे जीवनापेक्षा ही
जपली जाते हिरवेगार पीक रक्ताच्या घामाने
डोंगर उपसली जातात पावलोपावली
मातीतून उगवते सोने ...


धान्य रूपात संपूर्ण जगासाठी व्यवस्था केली
जाते पोटापाण्याची कुठेही कमी पडत नाही
कष्टाला हिशोब नसतो रात्र दिवस तास आणि
सुट्टीचा ... कष्टाचे डोंगर उपसता उपसता
या व्यवस्थेचा बळीच पडतो हाच शेतकरी
अर्थव्यवस्थेच्या बजेटमध्ये आणि विचारांमध्ये
पोट भरणारा शेतकरी तेल मिठाच्या
भाकरीवर अर्धपोटी, समाधानाचे चित्र फक्त
जाहिरातबाजी आणि कागदी घोड्यात !


आधारस्तंभ शेतकरी देशाचा उगवता
सूर्यासरखा पण अर्धपोटी उपाशी कुठे तर
संपूर्ण उपाशी न्याय मिळेल का कधी त्यांना
कृषिप्रधान देशात विकास वाटेवर
तळागाळातील शेतकरी येईल  का??
नवीन तंत्रज्ञान औद्योगिकरणाच्या आणि
देशाच्या बजेट मुख्य प्रवाहात!!
न्याय मिळेल का वर्षानुवर्ष बँकेच्या वाऱ्या
नवीन कर्जासाठी आणि ठेवीसाठी
फक्त स्वतःचे श्वास संपेल का संघर्ष कधीतरी

कष्टाच्या हाताने मातीत नखशिखांत
भिजलेल्या शेतकरी राजाचे सोने उगवणार्‍या
मातीत उगवेल का कधी समृद्ध शेतकऱ्यांचे
पिक कृषीदेशात संपेल का कधी नापिकीतून
होणाऱ्या आत्महत्या संपेल का कधी
कर्जबाजारीपणाचे जीवन त्यांच्याही वाट्याला
येईल का कधी सुखीसमाधान ऐश्वर्याची
जीवन ......

जो उगवतो पेरतो तोच विकासाच्या
वाटेपासून फेकला जातो दूर कुठेतरी
अडगळीत कृषिप्रधान देशात
उगवत्या सूर्याबरोबर आणि मावळतीच्या
सूर्याबरोबर स्वप्नही विरेल का
समृद्ध आनंदी बळीराजाचे येईल का सत्ता
बळीराजाची कधीतरी कृषिप्रधान देशात 
हसऱ्या शेतकरी होण्यासाठी!!


         ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ** शेतकरीराजा ****
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


*******----------------------******


माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...