savitalote2021@bolgger.com

आयुष्य कविता प्रेम कविता सकारात्मक कविता स्वरचित कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आयुष्य कविता प्रेम कविता सकारात्मक कविता स्वरचित कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ९ मे, २०२२

.....ठरलेलाच होता मार्ग .....

       जीवनाच्या डायरीवर काही गोष्टी हा ठरलेलाच असतात असे वाटते आणि काही गोष्टी या सतत सतत एकाच वर्तुळामध्ये फिरत राहता. आपली इच्छा नसतानाही एखाद्या गोष्टीला चकवा लागतो या दंतकथेनुसार....
      याच विचारमंथनातून ही कविता रचलेली आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...."ठरलेलाच होता मार्ग..!"

.....ठरलेलाच होता मार्ग .....

मार्ग माझा ठरला होता 
चकवा सारखे चालले होते 
मनात ठरवावे असे काहीच नव्हते 
नयनातील दवबिंदू तितके 
आयुष्याच्या पानांवर सांडले होते 
मार्ग माझा ठरला होता...

वर्तुळासारखे फिरत होते 
अंधारातही खुणा दिसत होता 
निघावे वाटत होते 
पायवाटेवर जावे वाटत होते  
मन चकवासारखे परत चालले होते 
मार्ग माझा ठरला होता...

परतीची वाट शोधावी 
पायवाटेला आपली नेहमीची पायवाट 
करावी चकवा थांबवावा स्वखुशीने किंवा त्याच्याही नकळत त्याला 
फसवून... 
तेवढी वाट समोर दिसेल  
म्हणून पण 
मनाचा मार्ग ठरलाच होता 
चकवा सारखेच चालले होते 
सतत दवबिंदूच्या 
सोबतीने...!!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- ...ठरलेलाच होता मार्ग ...

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .



माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...