savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०२३

**मुखवटा **

         जगण्याच्या या प्रवासामध्ये आपल्याला अनेकदा नकळत का होईना काही मुखवटे घालून जगावे लागते. कारण त्यामुळे आपण आपली सुरक्षितता निर्माण करीत असतो.
        मुखवटा म्हटले की रितेपणा आलाच पण मुखवटा कधी सत्य बोलते तर कधी असत्य. मुखवटा एक आडवी भिंत असते आपल्या भावनांवर घातलेली.
        याच भावविश्वातून व भावसंदर्भातील ही कविता. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. 
       मुखवटा हा प्रत्येक व्यक्ती घालून जगत असतो. त्या संदर्भातली ही कविता...!! धन्यवाद❤❤☹️😂

***मुखवटा ***

नवीन वेगवेगळ्या वाटेवर 
नवीन वेगवेगळे मुखवटे 
भाव वेगळे तरी 
शब्दांचा डाव मात्र एकच 
मागे लपलेले अंतकरणाच्या 
हिरावून घेतलेला शिल्लक मुखवटा 

मुखवटा बदलवत नाही आव्हाने 
मुखवटा बदलवत नाही आपलाच खोटेपणा 
मुखवटा बदलत नाही अविश्वास 
नवीन मुखवट्यावर जुने सत्य 
आडवी असलेली 
उरणारा प्रत्येक क्षणाला 

हिरावून घेणारा एक क्षण उरलेला 
असतो मुखवटाआड उरणारे नाहीच 
नाही मात्र जमाखर्च जास्तच आहे 
मुखवटाच्या आड वेगळ्या वाटेवर 
डोक्यातील अर्धवट सत्याचा पसारा 

गुपिते खुलावे असे वाटतात 
मन उतावळी होते 
पापणीच्या आड चिंब भिजलेल्या 
थरथराट मुखवटा कठीण प्रवास असतो 
उगाच सरळ झालेला निकामी 
होऊन आरशात आव्हाने 
मात्र तितके शिल्लक असतात 

गच्च भरलेला प्रश्नांची शिदोरी घेऊन 
पण शांत मुखवटे वेगवेगळे 
नवीन वेगवेगळ्या वाटेवर 
नवीन वेगवेगळे मुखवटे

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹



💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💔💔💔


       In this journey of living, we often have to live with some masks, even if we don't know it.  Because that is how we create our security.
 It is said that the mask is boring, but sometimes the mask speaks the truth and sometimes it is a lie.  A mask is a horizontal wall placed over our emotions.
      This poem is from this emotional world and related to emotions.  Don't forget to like and share if you like.  The poem is handwritten and composed.
     A mask is what every person lives by wearing.  This poem in that context...!!  thank ❤❤❤😂☹️😂☹️💔💕💕💕💕💕💕💕❤❤❤❤❤❤


***Mask***

 New on different paths
 New different masks
 Prices are different though
 But the plot of words is the same
 Hidden behind the heart
 Balance mask taken away

 The mask does not change the challenges
 A mask does not change your own falseness
 Disbelief does not change the mask
 An old truth in a new mask
 horizontal
 Every remaining moment

 A moment left to seize
 There is no one behind the mask
 No, but the deposit is high
 On a different path behind the mask
 Spreading half-truths in the head

 Secrets want to be revealed
 The mind was in a hurry
 Wet under the eyelids
 Trembling is a difficult journey to   mask
 A very straightforward failure
 Challenges in the mirror
 But there are so many left

 With a barrage of questions
 But calm masks are different
 New on different paths
 New different masks

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
       The blog is my home of words.  I express my feelings in such a way that I can understand.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to the threshold of God, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

 


 *****************************************************************************

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...