savitalote2021@bolgger.com

सामाजिक कविता प्रासंगिक कविता विरह कविता स्त्री कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक कविता प्रासंगिक कविता विरह कविता स्त्री कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २० एप्रिल, २०२१

बळी

        बळी 
अजूनही तळहातावरील 
मेंदीच्या सुगंध दरवळत 
हळदीचा रंगही पिवळाच
हिरवा चुडा पायातील जोडवी
सांगत आहेत तीची कहाणी
किती सोसले असेल 
त्या नाजुक देहाने
गोरेपान शरीर झाले आहे 
अंधारातील गुढ रहस्य
काय झाले असेल 
हत्या की आत्महत्या हे ही 
कळत नाही तिच्याकडे पाहून 
चेहऱ्यावरील हसरी मुद्रा 
काहीच सांगत नाही 
तरीही पण सांगून जाती
मेहंदी भरल्या हातावरील खुणा 
हळदी भरल्या अंगाची व्यथा 
फुडलेल्या चुडयांची कहानी 
आणि काळयाक्षार जोडव्यांनी
न बोलता सांगून दिले 
पुन्हा एक बळी स्त्रीचा 
न संपणाऱ्या प्रथेसाठी!!!!
            सविता तुकाराम लोटे 

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...