savitalote2021@bolgger.com

प्रेम कविता सामाजिक कविता विरह कविता स्त्री कविता सकारात्मक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता सामाजिक कविता विरह कविता स्त्री कविता सकारात्मक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ४ मे, २०२१

तुझी सोबत हवी

----------तुझी सोबत हवी -
तुझी सोबत हवी 
भावनेच्या मोहरलेल्या 
स्तब्ध पावलांना 
चालविण्यासाठी..... 
अफाट सागर किनारी 
अडथळ्यांना मात करी 
ओळखीच्या खुणा रस्त्यावरी 
चाललेला; 
हातात हात 
बरोबर वळणावरील 
पाऊलठसावरी शांत!
अभिमानाने....
रेतीतील नाजूकपणाने
सुखद 
स्थिर.... 
फुललेल्या 
मनशांत
भरलेला शब्द साखळीने
तुझ्या पावलांची सोबत 
माझ्या पावलांच्या सोबतीला 
श्वास रोखून 
हात हातात ठेवून 
तुझी सोबत हवी
पाऊलखुणांवर !!!!
      सविता तुकाराम लोटे 
-------------------------

राहूनच गेले ( प्रेम कविता )

एक प्रेयसी आपल्या प्रियकराच्या मेसेज साठी वाट बघते आहे पण तो मेसेज आल्यानंतर त्याच्याकडून नात्यात मर्यादा आहे याची आठवण करून देणारी ही कविता...