देह व्यापार करणाऱ्या बाजाराच्या स्त्रियांच्या हतबल झालेल्या, पोटासाठी व्यभिचारांचा बाजारात बसलेल्या शोषित स्त्रियांच्या भावविश्वातून घेतलेली ही भावना. कविता स्वरचित आहे.
माणसांच्या चेहऱ्यावरील
अनोळखी भाव
अनोळख्या हसूबरोबर
अनोळख्या बाजारात
विणलेल्या धाग्यात
रंग बदले भाव बदले
सावली मात्र एकच
मुखवट्याआड चढवलेली
अदृश्य भावना
प्रतिबिंब त्यात जपलेली
उत्तरांशिवाय
अनोळख्या बाजारात
विणलेल्या धाग्यात
जुनीच ओळखीची माणसे
नवीन गिफ्ट पेपर परिधान
व्यभिचारांचा बाजारात
सुगंध देहबोलींचा
पांढराशुभ्र रातराणी
दरवळत, दिशाहीन
भावनेच्या ...दिशाहीन बाजार
टिचभर पोटासाठी
सौंदर्य चढविलेल्या
अनोळखी बाजारात
विणलेल्या धाग्यात
सुटलेला भटकत चाललेला
जीवनाचा तुटलेला धागा
अनोळखी बाजारात
विणलेला धागा
✍️🏻©️सविता तुकाराम लोटे
©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- विणलेला धागा
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
*************************************