savitalote2021@bolgger.com

शनिवार, ९ जुलै, २०२२

* विठ्ठल ***

*** विठ्ठल ***

वारी भक्तीची समाधानच्या 
प्रत्येक पावलांवर  चालणारी 
वारी भक्तीची विश्वासाच्या पावला 
पावले समाधानी मनी 
होऊन चालणारी 
वारी जन्माचे सार्थक 
समाधानच्या रोपट्याला 
पानाफुलांची बहर 
विठ्ठलाच्या दर्शनाने 
वारी भक्तीची 
समाधानाच्या पावलांवर...!!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

          आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 





**** रूप विठ्ठलाचे****

    

      आषाढ एकादशी म्हणजे भक्तीचा सोहळा. भक्तीला कुठेच मर्यादा नसते ही सांगणारी संत परंपरा आणि ती शिकवण वारीच्या स्वरूपात पंढरपूरला विठ्ठल दर्शनापर्यंत संपते.  चालू होतो एक नवीन प्रवास वर्षानी वर्ष पिढ्यांनी पिढ्या जन्मोजन्मी ..म्हणून आषाढ एकादशी विशिष्ट महत्त्व आहे.
       वारी म्हणजे सर्वस्व, वारी म्हणजे भक्तीचे अलौकिक असे स्वरूप होय. आषाढ एकादशी निमित्त लिहिलेली ही कविता विठ्ठल रुक्माई चरणी ...!!
  आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.. धन्यवाद!!

 
**** रूप विठ्ठलाचे****

विठ्ठल भेटी जाई 
टिळा गोपीचंदन गळ्यात तुळशीची माळ 
हाती पताका भगवी 
भक्तीचा सोहळा सजे 
पंढरपुरी...

प्रेमाचा वर्षाव सोहळा भक्तीचा 
विश्वासाचा.... 
नाचत गाजत जाती 
वारी संगे....

दर्शनाची भूक विठ्ठलाची 
भक्तीचे रूप अनेक...
विठ्ठल श्वासा आम्हा
आम्ही जीव तुझे विसरून 
देहभान मग्न होऊन 
भक्तीच्या रूपात 

शांत हृदयाशी मज ठेव 
आता माझा मी न राहीले 
आता फक्त तुझाच 
जन्मोजन्मी .....

अर्पण हा देह माझा 
विठ्ठल - रुक्माई संगे 
आता रोजच आषाढी एकादशी 
मुखी मनी जयघोष 
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 
विठ्ठल भेटी जाई गोपीचंदनाचा 
टिळा कपाळी...!!!

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ...!!
  

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...