------ शब्द ------
शब्द काय जादू करतात
लिहितांना...
जीवनातील आयुष्यातील पाने
इंद्रधनुष्यसारखी अर्थपूर्ण
खरंच
शब्द काय जादू करतात
लिहितांना...
जीवनाला अर्थ देऊन
परिपूर्ण दिशेने
पाऊल ठेवतात
शब्दसाक्षीने
खरंच
शब्द काय जादू करतात
लिहितांना...
रोज नवीन शब्दांची गुंफण
आणि मनातील अलगद भावना
मांडण्याची ताकद
खरंच
शब्द काय जादू करतात
लिहितांना...
व्यक्त केलेले विचार आपले
परिस्थितीला स्वतःला आपल्याला
आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे
सामर्थ्य मंत्रमुग्धपणे
खरंच
शब्द काय जादू करतात
लिहितांना...
माझे माझ्यापर्यंत
पोहोचविते शब्दआठवणीत
माझे शब्द मनस्वी ठेवून
कायमस्वरूपी !!!!!
------- सविता तुकाराम लोटे -------
/////////////////////////////////////////////