savitalote2021@bolgger.com

सोमवार, १२ जुलै, २०२१

सूप

   स्त्री स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आजही सुशिक्षित समजल्या जाणार्‍या समाजामध्ये नवीन प्रकारचे स्त्रियांना बंदिस्त केले जाते.              कधी कर्तव्याच्या नावाने तर कधी सुसंस्काराच्या नावाने....  स्त्रियांच्या याच भावनिक विचारांवर लिहिलेली ही कविता.

            कविता स्वलिखित आहे.


           *** सूप ***





बांगड्यांच्या आवाजात 
नाचत होते धान्य सुपासोबत 
आणि समोर जात होते
बारीक दाणे आणि कचऱ्यातील पाने 

मी उभी हातात
स्वच्छ धान्याची टोपली 
नजरेत भरेल इतकी 
स्वच्छ दानेदार...  

मग उचलले; पाऊल, 
स्वच्छ माझ्यासाठी....
स्वतःला दाणेदार बनविण्यासाठी 
संघर्षाची माळ हातापायात 

पण फेकले गेले पुन्हा 
त्याच सुपात...
स्वच्छतेसाठी पीठात 
विचारसंस्काराच्या दळलेल्या 

मी अजून आत सुपाचा 
स्वच्छतेसाठी त्यांच्या माणुसकीच्या 
मी अजूनही आत 
सुखाच्या बाहेर दळलेल्या 

पीठासारखे बाहेर
मग काय 
सुखातही पातळ कणिक 
दुःखातही पातळ कणिक 

मस्त चाललया आता 
सुपात आत -बाहेर करत 
बांगड्यांच्या सुरेल आवाजात 
सुगंधी मोगरासोबत 

मी उभी! 
स्वच्छ धान्याची टोपली ...


                ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  ** सूप ***

          आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

**************************************************************************

** पाऊस आताचा **

             निसर्गचक्रातील एक सुंदर ऋतु पावसाळा कुणाला हवा असतो तर कुणाला नको असतं पाउस आणि आठवणी यांचा रम्य सोहळा चालू असतो कधी हवा हवा वाटतो कधी नको नको वाटतं त्या भावनेतून लिहिलेली ही कविता कविता स्वलखित आहे. 
   आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


*** पाऊस आताचा ***

चिंब भिजलेले थेंबगुच्छ 
झेलताना रेंगाळत राहती 
ओला स्पर्श...
गारवांच्या आणि क्षणात 
आपलेसे करून जातो 
नको नकोसा वाटणारा 
यंदाचा पाऊस 
आठवणीच्या थेंब आठवणीमध्ये 
रेंगाळतो ओल्या 
आतुर मनात 
ऋणानुबंध ....
पाऊस यंदाचा !!

         ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  *** पाऊस आताचा ***


अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका
Thank you

----------------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...