"संस्कार प्रेमाचे फक्त माझे"
आजकाल तुझ्याकडे शब्द जास्त
हसविल्यासारखे करताना कधी
निशब्द करून जातो... प्रेम संस्कारांना
संस्कार शब्दही नेहमीच मनाला आत्मविश्वास निर्माण करून देत असता शब्द संस्कार हे एका शस्त्र सारखे आहे ते वापरले तर कुणी आत्मविश्वासाने कोणत्याही समस्यांना समोर जात तर कधी हे शब्द आत्मविश्वास नष्ट करतात; नेहमी असे वाटत राहते. शब्द ही लेखणी पेक्षाही धारदार आहे.
लिहिताना लेखणी कुठेतरी पूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम देत जाते. बोलत असलेले शब्द कुठेही पूर्णविराम स्वल्पविराम.... घेत नाही आणि इथेच घात होतो मग ते प्रेमळ शब्द असोत की नकारात्मक शब्द असो घात तर होणारच...!!!
जीवनात प्रकाश असतो... अशक्य असे काहीच नाही तरी पण काही वेळा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपल्याही नकळत आयुष्यात घडून जातात... घडत असतात. अशावेळी अबोल शब्द बळ देण्याचे काम करतात. सहनशीलता म्हणजे काय ??या प्रश्नाचे उत्तर अशावेळी मिळतात. आयुष्यात रुसवे-फुगवे खूप असतात पण ते का असतात? हे माहीतच नसते.
शब्द मौन होतात अशा वेळी..!! मुके झालेले शब्द आणि मुके झालेल्या भावना सोबत अंतरीचे भाव दिव्यासारखे जळत... हळुवारपणे,अंधारात. प्रेम हा शब्द खूप पवित्र आहे. तरीपण या शब्दाचा उपयोग करून काही लोक त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतात.
संस्कारांची भाषा करावी की नाही हे कळतच नाही तरीही मनात आलेले शब्द हे कागदावर उतरवावे असे सतत वाटुन जाते. संस्कार संस्कार म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तरही कधी मिळाले नाही कारण प्रत्येकांच्या घरातले संस्कार हे वेगवेगळे असते. अनुभवाने आलेले संस्कार वेगवेगळे असतात. व्यक्तिपरत्वे संस्कार वेगळे असतात. आधुनिक सामाजिक सहरचने नुसार संस्कार वेगवेगळे असतात.
संस्कार आनंदाचे ...संस्कार दुःखांचे... संस्कार प्रेमभावनेचे... प्रेमाची व्याख्या करणे कठीण आहे त्याही पेक्षा कठीण आहे संस्कार प्रेमाची व्याख्या करणे. कारण प्रेम हे जरी दाखविण्याची गोष्ट असली तरी ती न दाखविता ही अनुभवता येते... करता येते. पण प्रेम या भावनेवर काही लोक स्वतःच्या स्वार्थी महत्वकांक्षा पूर्ण करून घेतात आणि त्या करता करता इतका समोर निघून जातात की त्यांना कळतच नाही. आपल्या आजूबाजूला असलेले व्यक्तींवर याचा काय परिणाम होत असते. फक्त स्वतः स्वतः आणि स्वतः प्रेम फक्त स्वतःवर प्रेम फक्त स्वार्थ वर स्वतःच्या प्रेम फक्त संपत्तीवर प्रेम फक्त स्वतःच्या आनंदावर प्रेम फक्त इतरांना दुःख देणार या शब्दांवर प्रेम फक्त स्वतःच्या स्वार्थी विचारांवर अशा प्रेमसंस्कारांना काय उपमा द्यावे कळत नाही.
कारण व्यक्तिपरत्वे प्रेम संस्कार वेगवेगळे असतात. असे जरी म्हटले तरी पण व्यक्तीमध्ये या भावना निर्माण होतात कशासाठी निर्माण होतात.आपले संस्कार इतके कमकुवत का होतात? आपले संस्कार प्राचीन काळापासून चालत आलेले आणि स्वातंत्र्यानंतर मिळालेले एक नवीन संस्कार ते म्हणजे संविधान तरीही व्यक्ती त्या संस्काराचा उपयोग फक्त स्वतःपुरता करतो का?
निसर्गाने सर्वांना एकच नियम दिला आहे. संविधानाने सर्वाना एकच नियम दिला आहे. प्राचीन संस्कृतीने रूढी प्रथा परंपरेने एकच नियम दिलेला आहे. प्रेमभावना ही अशीच आहे ती क्षणात निर्माण होते. एखाद्या व्यक्तीवर प्रेम निर्माण होणे नैसर्गिक भावना असते. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम असते ती व्यक्ती जर मनात काहीतरी स्वार्थी भावना ठेवून प्रेम करत असेल तर काही दिवस सहज शक्य होते पण ती निरंतर चालणारी प्रक्रिया नाही... ते कधी तरी सामोरे येणारच आणि मनात निर्माण झालेले प्रेम संस्कार क्षणात विरून जाणार!!
फक्त त्या नात्याला ओढाताण सहन करावी लागते. मानसिक धक्का बसतो. तो वेगळाच आणि आपण फसवले गेलो आहोत याचं दुःख निराळेच..! पण हे माहीत होण्याकरिता खूप वेळ निघून गेलेला असतो. खूप स्वप्न निघून गेलेली असताना. खूप व्यक्तींचे आयुष्य त्यामुळे थांबले जातात.खूप क्षणांचा हिशोब त्या व्यक्तीला कधीच देता येत नाही.
कारण त्याच्या त्या क्षणाच्या प्रेमाने खूप काही व्यक्तींचे आयुष्य त्या क्षणापासून थांबलेले असतात. खूप काही व्यक्तींचे स्वप्न धूळखात बसतात फक्त एका चुकीच्या निर्णयामुळे आंधळ्या प्रेमाच्या मागे लागल्यामुळे त्यालाही कुठे माहीत असते.
आपले प्रेम हे वापरून घेतले जात आहे...फक्त स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी हे सत्य समोर येईल तेव्हा खूप वेळ निघून गेलेली असते. म्हणुन प्रेम संस्कार हे अशा कोणत्याही क्षणासाठी बांधून ठेवू नका.
आयुष्य हे खूप खडतर प्रवासात जात असते. समोरचा क्षण काय घेऊन येईल हे कोणत्याही व्यक्तीला माहित नसते. कारण निसर्ग नियम प्रत्येकांना एकच आहे.
आयुष्याच्या प्रत्येक क्षणांसाठी एकच आहे. हे कमकुवत व्यक्ती प्रेमात आंधळे झालेली व्यक्ती हे सर्व सहन करतो पण कुठवर याही गोष्टीकडे जो स्वार्थीपणा ने प्रेम करतो. त्याला कळायला हवे त्याच्यावर जे संस्कार झाले असेल तर त्याला कळणारही नाही.
कदाचित कळेल ही पण वळणार नाही कारण आधीच्या पिढीने जे संस्कार त्याच्यावर केले गेले आणि त्यांनी स्वतः जे स्वतःवर संस्कार केले यामुळे तो त्या संस्कारा बरोबरच चालत राहील असे म्हणावे लागेल.
प्रेम करताना डोळसपणा असावा. प्रेम संस्कार मनावर जरूर करावे प्रेम खूप सुंदर कल्पना आहे... खूप सुंदर संकल्पना आहे... खूप सुंदर संरचना आहे... खूप सुंदर मनाला प्रफुल्लित करणारी भावना आहे.... खूप सुंदर मनाला सुगंधीत करणारी नाजूक प्रेम भावना आहे .....
प्रेम संस्कार मनाला जगण्याचे बळ देत असते. प्रेम संस्कार मनाला अशा आयुष्याच्या वळणावर घेऊन जाते तिथे सर्व काही खूप सुगंधित फुललेले टवटवीत असे फुले असते.प्रेम हे कुणीही कुणावरही करावे पण ते करताना इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी मात्र प्रेम संस्कारांना करावे लागले.
कधी एकतर्फी प्रेम करू नका. प्रेम ही भावना खूप सुंदर आहे ती मिळविता येत नाही... ती मिळविली जात नाही आणि कदाचित एखाद्या वेळ मिळविले जात असे तर ते टिकू शकत नाही. खोटारडेपणा हा एक ना एक दिवस येतच असतो मग तो कोणत्याही स्वरूपात का असेना पण तो येतोच...!! हा नियम सर्वच नात्यांना लागू आहे. कारण निसर्ग नियम हा सर्व सजीव निर्जीव यांना एकच आहे.
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- संस्कार प्रेमाचे फक्त माझे
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका
Thank you...!!
*************************************