.
//// आठवते मला ////
आठवते मला
तुझे हसणे
माझे हसणे
कातरवेळी झालेली
ती भेट
आठवते मला
निसर्गरम्य वातावरणामध्ये
घालविलेले मनसोक्त
क्षण
आठवते मला
ढगाळलेल्या मावळतीच्या
सावलीसोबत
विरह मतभेदाचे
आठवते मला
माझ्या तुझ्यातील रेशीमबंध
आठवणींसोबत
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-*** आठवते मला ***
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!