कवितेत विद्रोह हा मूक स्वरूपात आहे. अस्तित्व विषयक प्रश्न निर्माण झाल्यानंतर जगण्याचे एक जाणीव नवीन वाटेला आशावाद निर्माण करणारी कविता. अस्पृश्यतेचे चटके, जुगारणाऱ्या एका वडिलांची एका बापाची गोष्ट...!!
(माझे बाबा एम एस सी बी मध्ये होते. ते काम त्याकाळी इतके जीवघेणे होते ही कल्पनाही करू शकत नाही. अशा कामाला माझ्या बाबांनी जीव लावला फक्त अस्पृश्यतेचे चट्टे सहन न करण्यासाठी...!!💕)
हा बाप दलित समाजामध्ये पावलोपावली दिसून येतो. कारण वेदनेचे वर्तुळ अजूनही पूर्ण झाले नाही. दुःखाचे काटेरी कुंपण अजूनही दूर झाले नाही आणि हे कुंपण तोडण्यासाठी आपल्याला शहराकडले वाट धरावी लागते.
कालबाह्य व्यवहार अजूनही अस्तित्वाच्या व्यवहारांमध्ये एकमेकांशी हात घट्ट धरून आहे.ते हात तोडण्यासाठी हे दुष्टचक्र तोडण्यासाठी एका बापाला त्या गलिच्छ वस्तीचा सामना करावा लागतो पण तिथे व्यक्तीचे शोषण नाही.
शारीरिक शोषण नाही. भावनिक शोषण नाही तिथे आहे फक्त मानवता. मानव मुक्तीच्या चळवळीसाठी शहराकडे वळलेली ही पिढी आम्ही इकडे का वळलो हे शब्दबद्ध करण्याचा माझा छोटासा प्रयत्न....!!
कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका सुख असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा .....!!
धन्यवाद💕💕💕😂!!
***** अस्पृश्यतेचे चटके *****
वेदना शमविण्यासाठी पित राहिला दारू
पण गावाकडली वाट धरली नाही त्याने
पंख छाटले जाईल या भीतीने
शिव्याशापाचे ग्रहण नसलेला समाजव्यवस्थेपुढे
हतबल होईल माझ्या मुली म्हणून
कष्ट करीत राहिला गलिच्छ वस्तीत
त्याने सहन केले होते अस्पृश्यतेचे चटके
यशाच्या शिखरावर असतानाही
तुक्याचा कधी तुकाराम झाला नाही
या हरामखोर परंपरेने
पावलोपावली जळणाऱ्या या विध्वंसक प्रवृत्तीने म्हणून बाप गेला नाही गावात
तिथल्या सुख-समृद्धी वर नांगर फिरविले
तो राहिला गलिच्छ वस्तीत
पण 'तुकाराम', होऊन
तुकारामाचा कधी भाऊ झाला
कधी साहेब झाला कळलेच नाही
संघर्षाच्या प्रत्येक विद्रोहाला आयुष्याची माणुसकीचे गणित लावत गेला
कारण त्याने पाहिले होते स्वतःच्या बापाला नारायण हरिजन होता
हरिजनाचा महार झाला
महारचा बौद्ध झाला तरी
पाठीमागचा नाऱ्या सुटला नाही
ती शिवीगाळ सुटली नाही
तो विद्रोह संपला कायद्याने तरी
तो कधी नारायण झाला नाही
नाऱ्याचा बाप कशाच राहिला
तो कधीच बौद्ध झाला नाही
त्याने दीक्षा घेतली असली तरी
कशाचा काशिनाथ झाला नाही
गावात काशिनाथ चा बाप
कधी अनंता झाला नाही
तो अंतू माहऱ्याच राहिला
परंपरेची ही माळ कुठेतरी तुटायला हवी
म्हणून बापाने पेरले शब्दात विद्रोह
आपल्या भाषाशैलीत
शिक्षणाची वाजवली तुतारी
स्वातंत्र्याचे मुक्त रान मोकळे करत
स्वतःच्या पिल्ल्यांना मुक्त भरारी घेण्यासाठी
पण त्यांनी शिकविले त्यांनाही विद्रोहाची भाषा क्रांतीची भाषा संघर्षाची भाषा समजूतदारपणाची भाषा
आपुलकीची भाषा मावळलेल्या सूर्याची भाषा उभी केली एक परंपरा
बाबासाहेबांची गौतम बुद्धांची शाहू फुले यांची सावित्री माहित करून दिली भिंतीच्या फोटोत आणि विद्रोह पेरला संस्कारात
आता तो विद्रोह शांत होत नाही
ही पावले गावाकडे जात नाही
गावाकडली संस्कृती आता आम्हाला माहीत नाही पण .....!!
माणुसकीची भाषा मात्र माहीत आहे
अजूनही, कारण माझ्या बापाने पाहिले आणि सहन केले होते अस्पृश्याचे चटके
तीन पिढ्यांचे दुःख म्हणून बाप गावाकडे गेला नाही त्या सुख समृद्धीकडे गेला नाही
फक्त शिक्षणाच्या क्रांतीसाठी
स्वतःच्या स्वाभिमानासाठी
स्वतःच्या अभिमानासाठी
स्वतःच्या स्वप्नासाठी
समाजाच्या अस्मितेसाठी
बाबासाहेबांच्या स्वप्नासाठी...!💕
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना मनातील विद्रोहाला परिस्थितीला साधे सरळ शब्दात निवडुंगाच्या काट्यासारखे टोचत असले तरी गुलाबाच्या फुलासारखे नाजूक भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤
==========================================================
Rebellion in poetry is in silent form. A poem that creates optimism for a new path, a sense of living after existential questions arise. A father's story of untouchability, a gambling father...!!
This father is often seen in Dalit society. Because the circle of pain is still not complete. The barbed fence of suffering is still not removed and we have to wait for the city to break this fence.
Outdated practices are still holding hands with each other in the practices of existence. To break that vicious cycle, a father has to face that dirty abode but there is no exploitation of the individual.
No physical abuse. There is no emotional abuse, only humanity. My small attempt to articulate why we this generation turned to the city for the movement of human liberation....!!
The poem is handwritten and composed if you like it don't forget to like and share if you like it then let me know in the comment box...!!
Thank you💕💕💕😂!!
***** Untouchability *****
My father knew that the pillar of untouchability continued to climb
Drink alcohol to ease the pain
But he did not wait for the village
Afraid that the wings will be clipped
Before the social system that does not accept cursing
Desperate as my daughter
Worked hard in a dirty neighborhood
He had suffered the blows of untouchability
Even at the peak of success
You have never had Tukaram
By this bastard tradition
Father did not go to the village because of this destructive tendency that was burning slowly
The plow turned on the happiness and prosperity there
He lived in a dirty neighborhood
But 'Tukaram', becoming
Tukarama ever had a brother
I don't know when he became a sir
Humanity of life was applied to every revolt of the struggle
Because he saw that his own father was a Narayan Harijan
The Harijans were defeated
Even if the Mahar became a Buddhist
The back slogan did not go away
That abuse did not go away
That revolt ended with the law though
He never became Narayana
Naraya's father remained
He never became a Buddhist
Although he has been initiated
Nothing happened
Kashinath's father in the village
There was never infinity
He remained alone
This chain of tradition should be broken somewhere
So father sowed rebellion in words
In your language style
The trumpet of education
Unleashing the open fields of freedom
To have free range of own chicks
But he also taught them the language of revolt, the language of revolution, the language of struggle, the language of understanding
The language of affection is the language of the setting sun, a tradition raised
Babasaheb's Gautam Buddha's Shahu Phule's Savitri was known in the photo on the wall and rebellion was sown in Sanskar
Now that rebellion is not calmed down
These steps do not go to the village
We don't know the village culture now but...!!
However, the language of humanity is known
Still, because my father had seen and endured the blows of untouchability
Because of the suffering of three generations, the father did not go to the village, he did not go to the happiness and prosperity
Just for the revolution of education
For his own self-respect
For his own pride
For your own dream
For community identity
For Babasaheb's dream...!💕
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
The blog is my home of words. I express my feelings in such a way. Welcome to this God threshold of Shabda Swaras. If you have come to the threshold of God, here you will find satisfaction and your countless pains, rebellion in your mind, the situation in simple words like a prickly prickle of a cactus, but a delicate feeling like a rose flower will find words.