savitalote2021@bolgger.com

प्रेम कविता सकारात्मक कविता aayushavar kavita आयुष्य मराठी कविता निसर्ग कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता सकारात्मक कविता aayushavar kavita आयुष्य मराठी कविता निसर्ग कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

माझे रस्ते

////   माझे रस्ते  ////

रोज नव्याने हा पाऊस 
मला नव्याने भेटतो 
चिंब भिजलेल्या शब्दांसोबत 
नव्याने शब्द भिजलेले देतो 
कागदावर ✍️उतरतांना 

नव्याने लिहितो गारवा शब्दांचा 
भाव भावनांचा सरबत्तीमध्ये 
पाऊस भरे नवीन अक्षरे 
कोऱ्या कागदांवर✍️🏻

आठवणीचे चित्र सोबत धारा 
बाहेरील पाऊस💚 झाडा-पानांवर 
हसते मी नव्याने नयनातील 
पावसासोबत कोसळणार्‍या 
धारेसोबत... 

माझे रस्ते हुंदके होतात 
शुभ्र दुःखांच्या सरीवर चालताना 
पाणी पाणी झालेल्या वातावरण 
पहाटेच्या शुभ्र गावा पोहोचेपर्यंत 
...हा पाऊस💦 हसूनच म्हणतो 

माझे रस्ते तुझे रस्ते एकच 
होतात रोज नव्याने 
चिंब भिजताना....
शुभ्र सकाळच्या सुखाद 
गारव्यात💕💕💕!!!!!!

             ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ***   माझे रस्ते  ***

           अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you !!

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...