दिवसाला शब्द असावे की
येणाऱ्या क्षणाला सोबत करावे की
क्षणाला हातात धरावे
शब्दांच्या फुललेल्या माळेमध्ये
शब्दांनाच शब्द करून
खरंच शब्द किती महत्वपूर्ण करून जातात ज्या शब्दाने आपण इतरांची मने जिंकू शकतो त्याच शब्दाने मने तोडू शकतो. कुठेच नाही सहजता कुठेच नाही वाटते तिथेही नाही आणि असेही वाटते तेथेही नाही.
शब्द मनाला किती वेदना देतात आणि मनाला मनाला वेदना देणाऱ्या शब्दांची सतत सात असते काही शब्द जे मनाला बळ देणारे नक्की असतात... काही क्षण त्या शब्दांसाठी असतात
नक्कीच! शब्दांमध्ये शक्ती असते. पण ती शक्ती कशी वापरायची हे त्या क्षणामुळे आपल्याला कळते. खरंच आपण आपले शब्द मोजून मापून खर्च करू शकत नाही पण आपल्या व्यवहारांमध्ये ते दिसावे असे वाटत राहते. शब्दाला जरी शक्ती असली तरी ती आपल्या वरील आपल्या क्षणाला ती साथ देत असते.
शब्द हे आपले असतात शब्द हे आपल्यातील संस्काराचे प्रतीक असतात शब्द हे आपल्यातील हसूचे कारण असते... शब्द हे आपल्या यशाचे प्रतीक असते शब्द हे आपल्यातील आपल्या व्यक्तिमत्त्वाचे बळ असते.
म्हणून शब्द व्यवहारात वापरतांना स्वतःला सावरावे सहज... क्षणाला ...जवळ करीत ,"हसून"!!!
शब्दशक्ति ही आपली शक्ति
संस्काराचे प्रतिक
शब्दसावली ती !
सविता तुकाराम लोटे
-------------------------------