savitalote2021@bolgger.com

Savitalote लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Savitalote लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

मुली

मुली 
जन्म घे तू
कुणाच्याही पाठीमागे
बहीण म्हणून 
ताई म्हणून 
युगाची प्रगती म्हणून 
मुली
जन्म घे तू
जिजाऊ म्हणून 
सावित्री रमाई म्हणून
महाकाली सरस्वती म्हणून 
मुली 
जन्म घे तू
हातात पाळण्याची दोरी घेऊन
बंदिवान दिशा तोडून 
सभ्यतेची शिकवण घेऊन
मुली
जन्म घे तू 
पाय खेचणारा 
या समाजव्यवस्थेत
भारतीय संस्कृतीची उत्तराधिकारी म्हणून
मुली
 जन्म घे तू
शिक्षणाची दारे स्वबळावर उघडून 
रखरखत्या निखाऱ्यावर पावले ठेवीत
लेक होय सावित्रीची
मुली 
जन्म घे तू
बंधनातून मुक्त होऊन 
संस्काराचे धडे घेत 
जुनाट चालीरीतींना मोडून 
नवयुगाची पाऊलखुणा ठेवत 
संस्काराची झालर होऊन 
मुली 
जन्म घे तू
ज्ञानेश्वराची मुक्ताई म्हणून 
ज्योतिबाची सावित्री म्हणून 
भिमाची रमाई म्हणून 
झाशीची राणी म्हणून
संस्कार सभ्यतेची नवयुगाचे प्रगतीची दारे होऊन 
मुली 
जन्म घे तू
कुणाच्याही पाठीमागे 
पण 
प्रगतीचे वारे वाहू दे 
स्वतःकडे संरक्षणाकडे आणि समाजाकडे

सविता तुकाराम लोटे

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...