दवबिंदू पाणी नसते पण त्याला ओलावा असतो त्या ओलाव्याने ओलेपणाचा भास असतो. आभास हे आपल्या भावनेवर अवलंबून असते सगळी पहाट झाली त्या शांत न व किरणांच्या साक्षीने उगवत असते नवरुप घेऊन पण तो ओलावा दिवस सरता सरता कमी होत जातो आणि उतारता उतारता तो हो ओलावा आपले अस्तित्व आपले जग परत शुभ्र पहाट घेऊन येते.
ओसरणार्या धुक्यात काय शोधायचे असते माहित नाही पण ते शुभ्रपहाट काहीतरी नवीन काही आपल्याला देऊन जाते. नवीन स्वप्न ओंजळीत भरतांना आत्मविश्वास आणि नवीन स्वप्न मनात रूजवितांना शक्ति!
सगळं हवं तसं होत नसते हे खरे, असेल. एक ओंजळ ज्या जमत राहतात नवविश्वासाचे स्वप्न पहाटेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताना पहाट कितीही धुक्यात भरलेली असलेली असली तरी धुक्यातून साक्षीने ती मनाला ओलावा देत राहते.
नाजूक हळुवार ...अमर्याद
झुलत्या फांदीवर आपले संपूर्ण हलत्या स्वप्नांचे हलते सामर्थ्य सुवर्ण स्वप्नाने आपल्या डोळ्यात साठवित असतो एका फांदीवर आपले सामर्थ्य दाखवित अस तो पण खरंच त्या एका फांदीवर सामर्थ्य असते की ते भ्रम असते डोळ्याचे निर्जीव भावआपल्याला दिसतात त्या निर्जीव ओलावा त्या दवबिंदुं सारखे नसतात एका फांदीवरून प्रवास होऊ शकत नाही जणू ते प्रवास एका चौकटीत लागू नये त्याला दवबिंदू च्या ओलावा असावा जरी वसंताचा बहर नसला तरी!
एका फांदीवर चौकट न करता!!!
सविता तुकाराम लोटे
----------------------------------