savitalote2021@bolgger.com

ललित लेख ललित बंध मराठी लेख मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ललित लेख ललित बंध मराठी लेख मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

नम्रपणे आयुष्या स्थान द्या.

    
"....नम्रपणे आयुष्या स्थान द्या.",


       कधी कधी चालता चालता संस्कारांवरही लक्ष द्यावे. कारण ते सांभाळले नाही तर सावली ही तुमची साथ देणार नाही.
      चांदणे, रुजलेले असले तरी काळोख मात्र सोबतच असतो स्वतः उधळलेल्या गुणांचे;म्हणून जरा जपून.नवीन वर्ष चालू झाले जुने मरणा लागून गेले असे समजू नका.
      कर्मा हे कधीही आपला हिशोब चुकू देत नाही. म्हणून चुका कमीत कमी होतील याकडे लक्ष द्या आणि नवीन वर्ष उल्हासाने जल्लोषाने  मनसोक्त जगा सांभाळता येईल इतके संस्कार सांभाळून आपल्या चुकांकडे पाठ न करता त्यातून काहीतरी शिकून समोर चुका होणार नाही याकडे लक्ष मात्र द्यावे लागेल.
      मनगटात ताकद कितीही असली तरी परिस्थिती बदलली की हवेने हलणारे पानही चक्रीवादळ वाटते म्हणून चढत्या शिखराला आणि उतरता पायवाटेला तितकेच नम्रपणे आयुष्या स्थान द्या.

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

 
======================================!=!!!!!!!!=!!!===!=====!!!=!!!!!!

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...