विश्वास
गुंतला जातात त्या आठवणी
धागे विणले जातात स्मृतीत
बंधने अडकवली जातात स्वप्नात
नवज्योति पांघरून येते
मुक्तपणे विश्वासावर....
अन हुकूमशहा बनवते
अविश्वासाने...
हळूच मुक्तपणे
नात्यांच्या गोतावळ्यात...
विश्वास आयुष्याचा सुखद प्रवास विश्वास आयुष्याचा आधारस्तंभ विश्वास हळवी वाट आपलेपणाची आणि जगण्याची वाट सुकर करण्याची.... विश्वासाला पाय असतात की नाही माहीत नाही पण विश्वासावर सर्व जग टिकलेले आहे. विश्वास चुकीचा असेल तर कसा असेल? विश्वास म्हणजे जीवन... विश्वास म्हणजे आवाज...विश्वास म्हणजे आपले अस्तित्व...विश्वास म्हणजे धैर्य ...विश्वास म्हणजे आपलेपणा... विश्वास म्हणजे विश्व!
पण खरंच हा विश्वास मान्य केला जातो का विश्वास ढासळण्यामागे तो व्यक्ती कारणीभूत नसतो तर त्याच्या आजूबाजूची माणसे; गोतावळा असतो. विश्वासात जिंकण्याची लढाई नसते. हळव्या क्षणाला विश्वासावर अवलंबून राहतो बेधुंदपणे!! पण गोतावळा विश्वासाला कनभर थांबू शकते. विश्वास आसवांचा निरोप घेऊन पुसले जाते. विश्वास नको वाटत, चूक केली; क्षणात लक्षात येते. आता मात्र बदललेली परिस्थिती असते... अविश्वासाची उत्कटता इतकी असते की नकळत विचारात शून्यता येऊन जाते, मन पेटविले जाते.
विटांनी बांधावी घरे
विश्वासाने बांधावे मायेने
कल्पनेने बांधावे मनविकास
आणि अविश्वासाने बांधावे
आत्मविश्वास निरंतर!!!
विश्वासाचा चेहरा ओळखावा
आयुष्याचे गाणे गातांना
हो खरच विश्वासाचे चेहरे ओळखावे लागते मनात विश्वास फुले निर्माण करताना यादी याआधी आलेला अनुभव उलगडावा लागेल खात्री वाटत नाही. कुणावर विश्वास ठेवता येईल का? एकमेकांचे वैचारिक मतभेदांमुळे वा भाषेमुळे मिटेल का? विश्वासातील आत्मविश्वास! पूर्णविराम येईल का? अविश्वासाने...गोतावळांच्या स्वार्थी प्रयत्नाने ! अविश्वासाचा वनवा पेटला ..मातीत चिखल झाला. डांबरी रस्ता अविश्वासाने गरम झाला मग आताकाय? झाले सर्व! तर काय? विश्वास अविश्वासाची लढाई सतत विचारात मेंदूत आणि श्वासात!
तडजोड करायची ; अविश्वासा बरोबर? आयुष्य घृणेत घालवायचे अविश्वासाला आपल्यात ठेवून आत्मविश्वास नष्ट करायचा पावलोपावली खडकावर फक्त डोके द्यायचे आपला विश्वास आहे म्हणून.... नयनाला सतत पदर लावायचे आपल्या विश्वास आहे म्हणून ...पाठीवर सतरा ओझी घेऊन चालायचे आपला विश्वास आहे म्हणून. निखारे पेटतील कधीतरी या विश्वासावर; त्या तेही आपल्याला हवे असलेले निखारे भेटतील का कि उदासपण, आतला गुंतलेले श्वास. वळणावळणावर आपल्याला तो विश्वास दाखवत राहील.
कालचा खेळ ...आजचा खेळ... उद्याचा खेळ... विश्वासाच्या उसन्या नात्यावर नावावर. अविश्वासाचा गोतावळा श्रावणी स्वरात! असे वाटून जाते ,विश्वास नसलेल्या व्यक्ती वर आपण मुक्त पणे शब्द सुमने कसे उधळू शकतो? अविश्वासाच्या गर्दीतही आपण ते सराईत ॲक्टर सारखे चेहऱ्यावर मेकअप कसा लावू शकतो. आसवे शब्द विचार शक्ती नात्यांच्या विश्वासाच्या दलाला बरोबर कसे संवाद शेअर करू शकतो. साऱ्या गाठी रंगहीन व्हावे गीताने बेसुर गुणगुणावे सागरी तुफान लाटेबरोबर. एकाच दमात... दाखवावी पायरी अविश्वासाची पण
हळूच,चुकून,रेंगाळत,एकांतात.
चांदण्याच्या प्रकाशापेक्षा काजव्यांचा आधार घ्यावा वाटते.पहाटेच्या प्रकाशाचा अंदाज चुकला... मनातील सौंदर्याचा अंदाज चुकला... स्वतः केलेल्या संस्काराचा अंदाज चुकला ...भूतकाळातील आठवणी सोबत घेऊन, पहाट किरणांची चाहूल आपली वाटली; अलगद! स्पर्श... परत विश्वासाचा.
आयुष्याचे सारे गणित विश्वासावर प्रत्येक व्यक्ती कुणा ना कुणावर विश्वास ठेवत असतो, जिवापाड!! आणि त्याच भविष्य घडवीत असतो आणि त्यात हाच अविश्वासात परिवर्तित झाला तर वर्तमान खराब करून सोडतो. तुटलेल्या मनाला पापण्यांचा आधार तेवढा घ्यावा लागतो. घरटे उदास, पंख तुटलेले, शब्द नसलेले...आकाशात रिकामेपण मनात रिकामे ; सारे कसे कूर वणवा पेटलेला. दिशाहीन!
विश्वास कस्तुरीमृगासारखा! नक्षत्र फुललेल्या पांढऱ्याशुभ्र रांगे सारख्या डोळ्यांनी वेचायचे आणि आतलं मनाने त्याला बिलगायचे. सह्याद्रीच्या कड्या जितके सत्य आहे तितकेच अविश्वासाची लढाई सुद्धा सत्य आहे भरलेल्या वादळांची गर्दी नेहमीच हरविली जाते विश्वासाने.
विश्वासाच्या मागे धावावे लागते अविश्वास मागे टाकत विश्वास हरवतो तर अविश्वास हरल्यानंतर जगण्याचे बळ देते अविश्वासाने काही पाने कोरी होतात पण विश्वासाने ते चांगल्या संस्काराचे दर्शन घडवीत असतात विझलेल्या क्षणांना ओले करण्याचे सामर्थ त्यात असते गळून पडलेल्या पानांचे भविष्य काय असे हे माहित आहे त्या पालापाचोळ्याचे एक अनामिक सुंदर असते त्यांची एक भाषा असते गळले काळाबरोबर पण जखमा त्यात होत नाही जखमेचे भय उरत नाही. सुखाच्या हव्या हव्यासाच्या रांगेमध्ये नसतात कारण त्यांना माहित आहे घेऊन ताजे येईल निसर्गचक्र.
कदाचित त्यांच्याही पेक्षा सुंदर रूपाने अलगद मिटतात. रान फुलवतात मिठीत घेतात हिरव्यागार शालूने गळलेल्या क्षणांना विसरून फक्त त्यांना देणे माहित असते वर्षानुवर्ष उरणे माहीतच नसते गळलेल्या पानांचे पालापाचोळा झाला तरी खताच्या रूपाच नवसंजीवनी देतात काळा मातेला विश्वासाने फसवत नाही ते गळलेले क्षण रूप आकाशाच्या निळाभोर छताखाली अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास ठेवला जातो संकट असो वा नसो विश्वासू व्यक्तीवर अविश्वास दाखवू शकत नाही दुःख उरते दुःख सरते दुःख संपते दुःख नष्ट करते दुःख समाप्तीच्या वाटेवर जाते पण विश्वास घात हा कधी संपत नाही उरत नाही सरत नाही नष्ट होत नाही सरडासारखा रंग बदलत असतो चेहऱ्यावरची रेषही न बदलता किस्मत से कम या जादा नही मिलता या अविर्भावात शब्द साखळी शारीरिक हावभाव बहुदा त्यांना वाटत असेल मी तो नव्हेच पण हे विसरत जातात बहुधा अनेक गेले अनेक आले पण विश्वासघातेचा या वणव्यात कुणीही टिकू शकत नाही वादळ हरते अश्रू खोटे होतात वैभवाची श्रीमंती अधिक होत जाते शब्दांची वीण काळीज चिरत उनाड शब्द मनमोकळ्या पद्धतीने सर्वदूर जात असतात तसे मी तो नव्हे च्या भूमिकेत विश्वासघात सर्वदूर पसरवत असतो
पणतीच्या उजेडातील साचलेल्या काजळा सारखा.
विश्वास मोहक स्मित ...विश्वास उमलतो भविष्य...विश्वास शुभ्र चांदणे... विश्वास स्वप्न सु मनामध्ये चिंब भिजलेले क्षण विश्वास विझता दिवाचा प्रकाश विश्वास माय सावली सावली विश्वास मुक्त वाणी... विश्वास ओल्या मातीचा सुवास विश्वास रणरणत्या वाळवंटात पाणी विश्वास चिंब न्हाऊन गेलेले जीवन..... विश्वास सप्तरंग विश्वास भिजलेली रात्र आणि दिवस विश्वास बंधन विश्वास काळ्याभोर आकाशात ढगांची गर्दी शांत व उजेड लेली विश्वास पानावरील दवबिंदूची अस्तित्व विश्वास ऊन सावली खेळ.
जन्मांतरीची गाठ असे
अंधारातील पायवाटेवरती
सोबत;पत्त्यांचा खेळ
हातात मुक वाणी आणि
माणुसकीचे झरे
विश्वास ज्याचा त्याचा! किंमत मात्र अविश्वास सहन करणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. अविश्वास म्हणजे दुःख अविश्वास म्हणजे न केलेल्या चुकीची शिक्षा आयुष्याच्या प्रत्येक पानावर काजळ ...जीवनाच्या प्रत्येक वाटेवर दगड काटे आणि अडचणी भूकंप पुस्तक आयुष्याचं अधांतरी पश्चातापाची सीडी ही अशीच वाटत राहते अविश्वास विश्वासघात दूर जात नाही.
अमूल्य वेळ मात्र दूर जातो गमवलेले क्षण
स्वतःची असतात वेळ मात्र निघून गेलेली असते. जपून ठेवलेले नाते निरर्थक होऊन जाते ते कोणतेही असले तरी प्रत्येक क्षण आनंदी जगायचा असतो, पण ?परत प्रश्न! आनंद आणि विश्वासघाती व्यक्तीबरोबर या जीवघेण्या प्रवासात जो व्यक्ती विश्वासघात सहन करतो त्यालाच माहित असते.विश्वासघाताचे गणित वजाबाकी गुणाकार भागाकार.
सागराला माहीत नसते
त्याची विशालता आणि
उधानलेले रुप लाटांचे सौंदर्य
रंगमंचाला माहीत नसते
हदय जीवन असते कलाकारांचे
डोळ्यांच्या पापण्याला माहित नसते
पुसायला आलेल्या हातांचा
स्पर्श...
झोपेचे सोंग घेऊन जगणाऱ्या
विचारांना माहित नसते
विश्वासाचे खरे सूत्र
अविश्वासाचे कटू सत्य
आकारहीन शून्य
बेगडी...
विश्वास अविश्वासाच्या या खेळामध्ये हरत कोण असेल तर तो निस्वार्थ व्यक्ती. मृत्यूलाही लाजवेल असे विश्वासघाती व्यक्ती असतात. विश्वास अलगत मनात रुजवून विश्वास घात करतात .भावनेचा हळव्या शब्दांचा स्वप्न वेलींचा चंचल मनाला स्वप्नाच्या महत्त्वाकांक्षेचा संधीसाधू लोक असतात. विश्वासघातातील त्यांचे रूप ओळखता आले पाहिजे आणि ते रूप स्वतः न होण्याच्या आटोकाट प्रयत्न मात्र करावा लागेल. स्व मनाचा आणि स्वसंस्काराचा गैरफायदा घेऊ घ्यायचे नाही . विश्वास कोणत्याही कुशीत असला तरी कारण विश्वास अविश्वासात फक्त बारीक रेखा असते ती न दिसणारी! स्वावलंबी...स्वतःभोवती गुंफलेली.
24.4.2021
सविता तुकाराम लोटे