savitalote2021@bolgger.com

स्त्री कविता विरह कवितासामाजिक कविता आयुष्य कविताव्यथा कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्त्री कविता विरह कवितासामाजिक कविता आयुष्य कविताव्यथा कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२

माझीच वात ***

      ही कविता स्त्री विश्वातील स्त्रियांची आहे.ती नेहमीच दुसऱ्याला प्रकाश देत राहते पण एक वेळ अशी येते तिला तिचे अस्तित्व नष्ट होत आहे असे जाणवते. तेव्हा ती एक पाऊल मागे जावे असा विचार करते पण ती स्त्री असते तिला त्याच प्रकाशाबरोबर जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो.
           त्या भावविश्वातून ही कविता रचलेली आहे. कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!


****माझीच वात ***

वातीचा प्रकाश अधिकच होत होता 
तेव्हा तिला वाटले मागे सरावे 
एक पाऊल... 
पण क्षणात तिच्याही लक्षात आले 
एक एक पाऊल मागे जाणे 
म्हणजे आयुष्य नष्ट करणे 
तेव्हा तिनेच निर्णय घेतला 
तेलाच्या मैत्रीपेक्षा 
आपलेच अस्तित्व महत्त्वाचे 
म्हणूनच तिने त्याच प्रकाशाबरोबर 
मैत्री केली 
अधिक प्रकाशमय होत 
जळतच प्रकाश देत
आपल्याच अवतीभवती 
अंधार ठेवून 
हसतच...!💕

✍️®️©️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया म्हणजे आपल्या येण्याची जाणीव होय. कमेंट बॉक्समध्ये आपल मत जरूर नोंदवा.धन्यवाद...!!!



This poem is about women in the world of women. She always gives light to others but there comes a time when she feels that her existence is disappearing.  So she thinks to take a step back but being a woman she has to decide to go with the same light.
 This poem is composed from that spirit.  The poem is self-written and composed.  If you like, don't forget to like and share...!



 ****my opinion***

 The light of the wick was getting brighter
 Then she thought to practice backwards
 one step...
 But in a moment she also noticed
 Take a step back
 It means destroying life
 Then she made the decision
 than the friendship of oil
 Our own existence is important
 That's why she with the same light
 made friends
 becoming more luminous
 Giving light while burning
 Around us
 Keeping it dark
 Just smiling...!💕

 ✍️®️©️Savita Suryakanta Tukaram Lote

 Don't forget to like and share if you like.  Your reaction is your sense of arrival.  Be sure to write your opinion in the comment box. Thank you...!!!


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
🌹🌹🌹🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁...!!!!!!

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...